settings icon
share icon
प्रश्नः

सैतान स्वर्गातून कसा, का आणि केव्हा पडतो?

उत्तरः


स्वर्गातून सैतानाच्या पडण्याचे वर्णन प्रतीकात्मकरित्या यशया 14:12-14 आणि यहेज्केल 28:12-18 या वचनांत करण्यात आले आहे. हे दोन परिच्छेद विशेषतः बॅबिलोन आणि सोरच्या राजांचा उल्लेख करतात, त्याचवेळी ते या राजांच्या मागे असलेल्या आत्मिक सामर्थ्याचा अर्थात सैतानाचा उल्लेखही करतात. या परिच्छेदांत सैतान का पडला याचे वर्णन करण्यात आले आहे, परंतु ते पतन केव्हा घडले हे ते निश्चितपणे सांगत नाहीत. आपल्या हे माहित आहे ते: पृथ्वीच्या उतपत्तीपूर्वी देवदूतांची निर्मिती केली गेली (ईयोब 38:4-7) बागेत आदाम आणि हव्वेची परीक्षा करण्यापूर्वी सैतानाचे पतन झाले (उत्पत्ति 3:1-14) म्हणूनच, देवदूतांच्या निर्मितीनंतर आणि एदेन बागेत आदाम आणि हव्वेला मोहात पाडण्यापूर्वी सैतानाचे पतन झाले. बागेत आदाम आणि हव्वेला परीक्षा पाडण्याच्या काही तासांपूर्वी, दिवसांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी सैतानाचे पतन झाले, असे पवित्र शास्त्रात निश्चितपणे सांगण्यात आले नाही.

ईयोबाचे पुस्तक आपल्याला सांगते, त्या वेळी सैतानाला अजूनही स्वर्गात आणि देवाच्या सिंहासनापर्यंत जागा होती, “एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडूनफिरून आलो आहे” (ईयोब 1:6-7). स्पष्टपणे त्या वेळी, सैतान अजूनही स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये मुक्तपणे फिरत होता, देवाशी प्रत्यक्षपणे बोलू शकत होता आणि त्याच्या कामांबद्दल उत्तर देत होता. देवाने हा प्रवेश बंद केला आहे की नाही हा चर्चेचा विषय आहे. काहीजण म्हणतात की ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळी सैतानाचा स्वर्गात प्रवेश बंद झाला. इतरांचा असा विश्वास आहे की सैतानाचा स्वर्गातील प्रवेश शेवटच्या स्वर्गातील युद्धाच्या शेवटी होईल.

सैतान स्वर्गातून का पडला? सैतान गर्विष्ठपणामुळे पडला. त्याला देवाची सेवा नको, देव बनण्याची इच्छा होती. यशया 28:12-15 मधील बरीच “मी ...” विधानांकडे लक्ष द्या. यहेज्केल 28:12-15 मध्ये सैतान एक अतिशय सुंदर देवदूत आहे. सैतान कदाचित सर्व देवदूतांपेक्षा श्रेष्ठ होता, अभिषिक्त करुब, देवाच्या सर्व सृष्टींपैकी सर्वात सुंदर, परंतु तो त्याच्या स्थितीत समाधानी नव्हता. त्याऐवजी सैतानाने देव बनण्याची इच्छा केली आणि मुख्यतः “देवाला त्याच्या सिंहासनावरून काढून टाकण्याची” आणि विश्वाचे राज्य ताब्यात घ्यावे अशी त्याची इच्छा होती. सैतानाला देव व्हायचे होते आणि विशेष म्हणजे, एदेन बागेत सैतानाने आदाम आणि हव्वेला याच मोहात पाडले (उत्पत्ति 3:1-5). सैतान स्वर्गातून कसा खाली पडला? खरे म्हणजे, पडला हे अचूक वर्णन नाही. देवाने सैतानाला स्वर्गातून बाहेर फेकले असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल (यशया 14:15; यहेज्केल 28:16-17). सैतान स्वर्गातून पडला नाही; त्याऐवजी सैतानाला ढकलण्यात आले.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सैतान स्वर्गातून कसा, का आणि केव्हा पडतो?
© Copyright Got Questions Ministries