settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती लोकांनी शब्बाथाचे पालन करावे अशी परमेश्वराची मागणी आहे का?

उत्तरः


कलस्सै 2:16-17 मध्ये, प्रेषित पौल घोषणा करतो, “तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणार्‍या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वतःला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.” तसेच, रोम 14:5 सांगते, “कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.” ही वचने स्पष्ट करतात की ख्रिस्ती व्यक्तीसाठी, शब्बाथाचे पालन करणे आत्मिक स्वातंत्र्याची बाब आहे, परमेश्वराची आज्ञा नाही. शब्बाथाचे पालन हा एक विषय आहे ज्याविषयी देवाचे वचन आम्हाला शिकविते की आम्ही एकमेकांस दोष देता कामा नये. शब्बाथाचे पालन करणे ही अशी बात आहे ज्याविषयी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या स्वतःच्या मनात पूर्ण खात्री असण्याची गरज आहे.

प्रेषितांच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या अध्यायात पहिले ख्रिस्ती प्रामुख्याने यहूदी होते. येशू ख्रिस्ताद्वारे परराष्ट्रीयांना तारणाची भेट मिळण्यास सुरवात झाली तेव्हा यहूदी ख्रिस्तींची कोंडी झाली. यहूदी ख्रिस्तींना मोशेच्या नियमशास्त्राचे व यहूदी परंपरेचे कोणते भाग पालन करण्यास सांगितले पाहिजेत? प्रेषितांनी यरूशलेम परिषदेत येऊन त्याविषयी चर्चा केली (प्रे. कृत्ये 15) निर्णय असा होता की, “तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा” (प्रेषितांची कृत्ये 15:19-20). गैरयहूदी विश्वासणार्यांस शब्बाथ-पालन करण्याची आज्ञा देणे जरूरी नाही असे प्रेषितांना वाटले. कारण ती विदेशी लोकांवर विश्वास ठेवण्यास आवश्यक होती. ख्रिस्ती लोकांनी शब्बाथ दिवस पाळण्याची देवाची आज्ञा असती तर प्रेषितांनी शब्बाथ पाळण्याचा समावेश करण्याकडे दुर्लक्ष केले असते हे अकल्पनीय आहे.

शब्बाथ पाळण्याच्या चर्चेत एक सामान्य त्रुटी म्हणजे शब्बाथ हा उपासना करण्याचा दिवस होता. सेवन्थ डे एडव्हेंटिस्ट्ससारखे गट असे मानतात की शनिवारी, शब्बाथ दिवशी, मंडळीची उपासना आयोजित केली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. शब्बाथ आज्ञा अशी नव्हती. शब्बाथ आज्ञा ही होती की शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये (निर्गम 20:8-11). होय, जुना करार, नवीन करार आणि आधुनिक काळातील यहूदी लोक शनिवारचा दिवस उपासनेचा दिवस म्हणून वापरतात, परंतु हा शब्बाथ आज्ञेचा सार नाही. प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात जेव्हा जेव्हा एखादी सभा शब्बाथ दिवशी असल्याचे सांगितले गेले आहे तेव्हा तेव्हा ती ख्रिस्ती विश्वासणार्यांची नव्हे तर यहूद्यांची बैठक आहे.

प्रारंभिक ख्रिस्ती कधी एकत्र येत? प्रेषितांची कृत्ये 2:46-47 उत्तर देते, “ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.” जर ख्रिस्ती लोकांचा नियमितपणे भेटावयाचा असा एखादा दिवस असेल तर तो म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस (आमचा रविवार) होता, शब्बाथ दिवस नव्हता (आपला शनिवार) (प्रे. कृत्ये 20:7; 1 करिंथ 16:2). रविवारी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सन्मानार्थ, सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी रविवार “ख्रिश्चन शब्बाथ” म्हणून नव्हे तर विशेषतः येशू ख्रिस्ताची उपासना करण्याचा दिवस म्हणून पाळला.

शनिवारी, यहूदी शब्बाथाच्या दिवशी उपासना करण्यात काही चुकीचे आहे का? मुळीच नाही! आपण दररोज परमेश्वराची उपासना केली पाहिजे, केवळ शनिवारी किंवा रविवारी नाही! आज अनेक मंडळ्या शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवशी उपासना घेतात. ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे (रोम 8:21; 2 करिंथ 3:17; गलती 5:1). ख्रिस्ती व्यक्तीने शब्बाथाचे पालन केले पाहिजे का, अर्थात शनिवारी काम न करणे?

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीस असे करावयास प्रेरणा मिळाल्याचे वाटल्यास, होय, (रोम 14:5). तथापि, ज्यांनी शब्बाथ पाळण्याचा सराव केला आहे त्यांनी शब्बाथ पाळत नसलेल्यांचा न्याय करू नये (कलस्सै 2:16). शिवाय, जे शब्बाथाचे पालन करीत नाहीत त्यांनी अडखळण (1 करिंथ 8:9) बनणे टाळावे. गलती 5:13-15 या संपूर्ण प्रकरणाचा सारांश देते: “बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.”

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती लोकांनी शब्बाथाचे पालन करावे अशी परमेश्वराची मागणी आहे का?
© Copyright Got Questions Ministries