settings icon
share icon
प्रश्नः

प्रभूची प्रार्थना काय आहे आणि ती प्रार्थना आम्ही करावी काय?

उत्तरः


प्रभूची प्रार्थना ती प्रार्थना आहे जी प्रभू येशूने मत्तय 6:9-13 मध्ये आणि लूक 11:2-4 मध्ये येशूने आपल्या शिष्यांस शिकविली. मत्तय 6:9-13 म्हणते, "ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना कराः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांस दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणें आम्हांस सोड; आणि आम्हांस परीक्षेत आणूं नको; तर आम्हांस वाइटापासून सोडीव." कित्येक लोकांची अशी चुकीची समजूत आहे की प्रभूची प्रार्थना अशी प्रार्थना आहे जी आम्ही शब्दशः बोलली पाहिजे. काही लोक प्रभूच्या प्रार्थनेस जादूचे सूत्र म्हणून उपयोग करतात, जणू काही शब्दामध्ये देवाचे विशिष्ट सामर्थ्य अथवा प्रभाव असावा.

बायबल याविपरीत शिकविते. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा देवाला आमच्या शब्दांपेक्षा जास्त रूची आमच्या अंतःकरणात असते. "तू तर जेव्हां जेव्हां प्रार्थना करितोस, तेव्हा तेव्हा आपल्या खोलींत जा, व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करितां तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते" (मत्तय 6ः6-7). प्रार्थनेत, केवळ मुखपाठ केलेल्या शब्दांची पुनरावृत्ती न करता, आम्ही आपली अंतःकरणे देवासमोर ओतली पाहिजेत (फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7).

प्रभुची प्रार्थना कशी प्रार्थना करावी याचे उदाहरण, नमूना म्हणून समजून घेतली पाहिजे. ती आम्हास असे "घटक" देते जे प्रार्थनेत गेले पाहिजेत. त्याचे विभाजन असे होते. "आमच्या स्वर्गातील पित्या" आम्हास शिकवीत आहे की आमच्या प्रार्थना आम्ही कोणास संबोधित कराव्या — पित्यास. "तुझे नाव पवित्र मानिले जावो" आम्हास देवाची उपासना करावयास, आणि तो जो आहे त्याबद्दल त्याची स्तुति करावयास सांगते. "तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो" हा वाक्यप्रयोग आम्हास या गोष्टीची आठवण करून देतो की आम्हास आमच्या जीवनात आणि जगात देवाच्या योजनेसाठी प्रार्थना करावयाची आहे, आमच्या स्वतःच्या योजनेसाठी नाही. देवाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आपली नाही. "आमची रोजची भाकर आज आम्हांस दे" यात आम्हास ज्या गोष्टींची गरज आहे त्या मागण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. "जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणें आम्हांस सोड" आम्हास आठवण करून देते की आम्ही आपली पापे देवाजवळ कबूल करावी आणि त्यांच्यापासूच फिरावे, आणि जशी देवाने आम्हास क्षमा केली आहे तशी आम्ही इतरांस क्षमा करावी. प्रभुच्या प्रार्थनेचे समापन, "आम्हांस परीक्षेत आणूं नको; तर आम्हांस वाइटापासून सोडीव" ही पापावर विजय मिळविण्यासाठी मदतीची आणि सैतानाच्या हल्ल्यापासून संरक्षण लाभावे म्हणून विनंती आहे.

म्हणून, पुन्हा, प्रभूची प्रार्थना अशी प्रार्थना नाही की आम्ही मुखपाठ करावी आणि देवापुढे परत तिची पुनरावृत्ती करावी. आम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे त्याचे ते फक्त एक उदाहरण आहे. प्रभूची प्रार्थना मुखपाठ करण्यात काही चुकीचे आहे का? अर्थात नाही! देवासमोर प्रभूची प्रार्थना करण्यात काही चुकीचे आहे काय? नाही जर आपले अंतःकरण त्यात असेल आणि मनापासून ते शब्द बोलत असाल तर. लक्षात ठेवा, प्रार्थनेत, आम्ही ज्या विशिष्ट शब्दांचा उपयोग करतो त्यांच्यापेक्षा आम्ही त्याच्याशी जो संवाद घालतो आणि अंतःकरणापासून त्याच्याशी जे बोलतो त्याची त्याला जास्त आवड आहे. "कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील."

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रभूची प्रार्थना काय आहे आणि ती प्रार्थना आम्ही करावी काय?
© Copyright Got Questions Ministries