आपण जेव्हा पाप करतो तेव्हा प्रभु देव आपल्याला केंव्हा, का आणि कशी शिस्त लावतात?


प्रश्नः आपण जेव्हा पाप करतो तेव्हा प्रभु देव आपल्याला केंव्हा, का आणि कशी शिस्त लावतात?

उत्तरः
प्रभूंची शिस्त हि अनेकदा विश्वासी लोकांच्या जीवनातील दुर्लक्षित केलेली बाब आहे. आपली परिस्थिती हि आपल्या पापाचे दुष्परिणाम आहे आणि त्या पापासाठी देवाच्या प्रेमळ आणि दयाळू शिस्तीचा एक भाग आहे हे न समजून घेता आपण पुष्कळदा तक्रारी करत असतो. हे स्व-केंद्रित अज्ञान पापाच्या सवयींच्या जीवनाच्या निर्मितीस हातभार लावू शकते जे आणखीन महान शिस्तीस आमंत्रण आहे.

शिस्त ही थंड मनाची शिक्षा आहे असे गोंधळून जाण्याचे कारण नाही. प्रभूंची शिस्त कि त्यांच्या आपल्यावरील प्रेमाचा आणि आपण सर्वजण पवित्र असावे या त्यांच्या इच्छेला प्रतिसाद आहे. “माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” (नीतिसूत्रे 3:11-12; इब्रीलोकांस पत्र 12:5-11 देखील पाहा). आपण पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यासाठी देव परीक्षा, सताव, भीती इत्यादींचा उपयोग करतो. देवाच्या शिस्तीचा परिणाम म्हणजे त्याच्यावर दृढ विश्वास आणि नवा नातेसंबंध होय (याकोबाचे पत्र 1:2-4), ज्यामुळे पापाची आपणावरील पकड नष्ट होते.

प्रभूंची शिस्त आपल्यासाठी फायादेमंतच कार्य करते जेणेकरून आपल्या जीवनात त्याचे गौरव व्हावे. आपण पवित्रतेचे जीवन प्रदर्शित करावे अशी देवाची इच्छा आहे, असे जीवन ज्याने देवाने आपल्याला दिलेले नवीन स्वरूप प्रतिबिंबित केले जाते: “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे कि, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे” (1 पेत्र 1:14-16).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आपण जेव्हा पाप करतो तेव्हा प्रभु देव आपल्याला केंव्हा, का आणि कशी शिस्त लावतात?