settings icon
share icon
प्रश्नः

यहूदी धर्म काय आहे आणि यहूदी लोक काय मानतात?

उत्तरः


यहुदी धर्म म्हणजे काय, आणि यहूदी कोण किंवा काय आहे? यहुदी धर्म फक्त एक धर्म आहे का? ही एक सांस्कृतिक ओळख आहे की फक्त वांशिक गट आहे? यहुदी लोक एक कुळ आहेत की ते एक राष्ट्र आहेत? यहुदी लोक कशावर विश्वास ठेवतात आणि ते सर्व एकाच गोष्टींवर विश्वास ठेवतात काय?

“यहुदी” च्या शब्दकोष परिभाषांमध्ये “यहुदाच्या वंशाचा सदस्य,” “एक इस्राएली”, “ई. स. पू. 6व्या शतकापासून इ.स. पहिल्या शतकापर्यंत पॅलेस्टाईनमध्ये अस्तित्वात असलेल्या राष्ट्राचा सदस्य,” “प्राचीन यहुदी लोकांच्या वंशावळीतील किंवा ज्यांच्या पूर्वजांचे धर्मांतरन होईन झालेली पिढी”, आणि “ज्याचा धर्म यहूदी धर्म आहे” यांचा समावेश होतो.

रब्बीनिकल यहुदी धर्मानुसार, ज्याची आई यहुदी आहे किंवा ज्याने औपचारिकपणे यहुदी धर्म स्वीकारला आहे असा व्यक्ती यहुदी आहे. लेवीय 24:10 मध्ये अनेकदा हा विश्वास विश्वासार्ह आहे असे म्हटले जाते, जरी तोराह या परंपरेला पाठिंबा दर्शवित नाही. काही रब्बी लोक म्हणतात की त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष विश्वास असलेल्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. हे रब्बी आपल्याला सांगतात की यहुदी लोकांना यहूदी समजले जावे म्हणून यहुदी कायद्यांचा आणि चालीरितींचा अनुयायी असण्याची गरज नाही. खरं तर, वरील रब्बीनिकल स्पष्टीकरणानुसार एखाला यहुदी व्यक्ती देवावर विश्वास न ठेवता देखील यहुदी असू शकतो

इतर रब्बी लोक हे स्पष्ट करतात की जोपर्यंत तोराच्या आज्ञेचे पालन केले जात नाही आणि जोपर्यंत मायमनोइड्सच्या (रब्बी मोशे बेन मेमन, जो मध्ययुगीन एक महान यहुदी विद्वानांपैकी एक आहे) “विश्वासाची तेरा तत्त्वे” स्वीकारत नाही तोपर्यंत तो यहूदी होऊ शकत नाही. जरी ही व्यक्ती “जैविक” यहुदी असू शकते, तरी त्याचा यहुदी धर्माशी कोणतेही वास्तविक संबंध नाही.

पवित्र शास्त्रातील पहिली पाच पुस्तके तोराह म्हटले जाते त्यामध्ये, उत्पत्ति 14:13 मध्ये असे समजले जाते की सामान्यतः पहिला यहूदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्रामाचे वर्णन “इब्री” असे होते. “यहुदी” हे नाव यहूदाच्या नावावरून आले. तो याकोबाच्या बारा मुलांपैकी एक होता आणि इस्राएलमधील बारा वंशांपैकी एक आहे. वरवर पाहता “यहुदी” हे नाव फक्त मूळच्या यहुदातील वंशाचेच होते, परंतु शलमोन (1 राजे 12) च्या कारकिर्दीनंतर त्याचे राज्य विभागले गेले तेव्हा या शब्दाचा उल्लेख यहुदाच्या राज्यातील लोकांसाठी करण्यात आला आणि यामध्ये यहुदा, बन्यामीन आणि लेवी या कुळांचा सामवेश होता. आज बहुतेकांचा असा विश्वास आहे की कोणतीही व्यक्ती जी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या वंशाची असल्यास तो मूळ गोत्रातील कोणत्या वंशाचा आहे याची पर्वा न करता त्यास यहुदी समजले पाहिजे.

मग, यहुदी लोकांचा काय विश्वास आहे आणि यहुदी धर्माच्या मूलभूत आज्ञा काय आहेत? आज जगात यहुदी धर्माचे पाच मुख्य प्रकार किंवा पंथ आहेत. ते ऑर्थोडॉक्स, पुराणमतवादी, सुधारित, पुनर्रचनावादी आणि मानवतावादी आहेत. प्रत्येक गटातील विश्वास आणि आवश्यकता भिन्न आहेत; तथापि, यहुदी धर्माच्या पारंपारिक विश्वासांच्या छोट्या यादीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींचा देव निर्माणकर्ता आहे; तो एक, अविनाशी (शरीराशिवाय) आहे आणि विश्वाचा परिपूर्ण राज्यकर्ता म्हणूनच त्याची उपासना केली पाहिजे.

ईब्री पवित्र शास्त्राची पहिली पाच पुस्तके देवाने मोशेला दिली. भविष्यात ती बदलली जाणार नाहीत अथवा त्यामध्ये वाढ केली जाणार नाही.

संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने यहूदी लोकांशी संवाद साधला.

देव मानवांच्या कार्यावर नजर ठेवतो; तो चांगल्या कर्मांसाठी प्रतिफळ देतो आणि वाईटाला शिक्षा करतो.

जरी ख्रिस्ती लोकांचा विश्वास बहुतेक यहुदी लोकांप्रमाणेच ईब्री शास्त्रांवर ठेवला आहे, तरी त्यांच्या विश्वासामध्ये बरेच फरक आहेतः यहूदी सामान्यत: कृती आणि वागणूक यांना प्राथमिक महत्त्व देतात; विश्वास कृतीतून प्रकट होतो. पुराणमतवादी ख्रिस्ती लोकांसाठी असलेले हा संघर्ष ज्यांच्यासाठी विश्वासास प्राथमिक महत्त्व आहे आणि कृती त्या विश्वासाचा परिणाम आहे.

ख्रिस्ती लोकांचा पापाचे मूळ ((येदेनच्या बागेमध्ये देवाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यावर सर्व लोकांनी आदाम आणि हव्वा यांच्या पापाचा वारसा मिळाला आहे असा विश्वास) हा सिद्धांत यहुदी विश्वास स्वीकारत नाही.

यहुदी धर्म जगाची अंतर्निहित चांगुलपणा आणि तिचे लोक देवाची निर्मिती म्हणून पुष्टी करतात.

यहुदी विश्वासणारे आपले जीवन पवित्र करण्यास आणि मिट्झवॉथ (दैवी आज्ञा) पूर्ण करून देवाच्या जवळ येण्यास सक्षम आहेत.

कोणत्याही तारणहारांची आवश्यकता नाही किंवा कोणीही मध्यस्थ म्हणून उपलब्ध नाही.

लेविय व इतर पुस्तकांत आढळलेल्या 613 आज्ञा यहुदी लोकांच्या जीवनातील सर्व गोष्टींचे नियमन करतात. निर्गम 20:1-17 आणि आणि अनुवाद 5:6-21 मध्ये वर्णन केलेल्या दहा आज्ञा नियमांचे थोडक्यात सारांश आहेत.

मसीहा (देवाचा अभिषिक्त) भविष्यात येऊन यहूदी लोकांना पुन्हा एकदा इस्राएलच्या भूमीमध्ये एकत्र करील. त्यावेळी मृतांचे सामान्य पुनरुत्थान होईल. ई.स. 70 मध्ये रोमी लोकांनी नष्ट केलेली यरुशलेम मंदिर पुन्हा बांधले जाईल.

येशूविषयीच्या विश्वासामध्ये बरेच फरक आहेत. काही लोक त्याला एक महान नैतिक शिक्षक म्हणून पाहतात. इतर त्याला खोटा संदेष्टा किंवा ख्रिस्ती धर्माची मूर्ति म्हणून पाहतात. यहुदी धर्माचे काही पंथ मूर्तीचे नाव सांगण्यास मनाई केल्यामुळे त्याचे नाव देखील सांगणार नाहीत.

यहुदी लोकांना सहसा देवाचे निवडलेले लोक म्हणून संबोधले जाते. याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही प्रकारे इतर गटांपेक्षा श्रेष्ठ मानले जातील. निर्गम 19:5 सारख्या पवित्र शास्त्रामधील वचनांमध्ये असे म्हटले आहे की, तोराह प्राप्त करण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी, फक्त देवाची उपासना करण्यासाठी, शब्बाथ दिवशी विसावा घेण्यासाठी आणि सण साजरे करण्यासाठी देवाने इस्राएलची निवड केली आहे. यहुद्यांना इतरांपेक्षा श्रेष्ठ म्हणून निवडले गेले नाही; ते फक्त यहूदीतर लोकांकरिता प्रकाश होण्यासाठी व सर्व राष्ट्रांकरिता आशीर्वादाचे म्हणून निवडले गेले आहेत.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

यहूदी धर्म काय आहे आणि यहूदी लोक काय मानतात?
© Copyright Got Questions Ministries