यहूदी आणि अरब/मुसलमान एकमेकांचा हेवा का करतात?


प्रश्नः यहूदी आणि अरब/मुसलमान एकमेकांचा हेवा का करतात?

उत्तरः
पहिले म्हणजे, हे समजून घेणे महत्वाचे आहे की सर्व अरब लोक मुसलमान नाहीत, आणि सर्व मुसलमान अरब नाहीत. बहुसंख्य अरबी लोक मुसलमान असले, तरीही अनेक गैरमुसलमान अरबीही आहेत. याशिवाय, इंडोनेशिया आणि मलेशिया यासारख्या क्षेत्रात अरब मुसलमानांपेक्षा गैरअरब मुसलमान अधिक आहेत. दुसरे म्हणजे, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की सर्वच अरबी यहूद्यांचा हेवा करीत नाही, आणि सर्वच मुसलमान यहूद्यांचा हेवा करीत नाही, आणि सर्वच यहूदी अरब व मुसलमानांचा हेवा करीत नाही. आपण लोकांस सांचेबंद करण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, सामान्यतः म्हटल्यास, अरबी आणि मुसलमान यांस यहूदी लोकांविषयी तिटकारा आणि अविश्वास आहे, अथवा या उलट.

जर ह्या शत्रूत्वासाठी बायबलमध्ये स्पष्ट स्पष्टीकरण असेल, तर ती गोष्ट मागे अब्राहामापर्यत जाते. यहूदी अब्राहामाचा पुत्र इसहाक याची संतती आहेत. अरब अब्राहामाचा मुलगा इश्माएल याचे वंशज आहेत. इश्माएल हा गुलाम स्त्रीचा मुलगा होता (उत्पत्ति 16:1-16) आणि इसहाक हा कराराचा पुत्र होता ज्याला अब्राहामाचे आशीर्वाद वारश्याने मिळणार होते (उत्पत्ति 21:1-3), स्पष्टपणे दोघा मुलांत थोडेफार शत्रूत्व राहणारच होते. इश्माएलाने इसहाकाचा उपहास केला याचा परिणाम म्हणून (उत्पत्ति 21:9), साराने अब्राहामास सागून हागार व इश्माएल यांस पाठवून दिले (उत्पत्ति 21:11-21). शक्य आहे की यामुळे इश्माएलाच्या अंतःकरणात इसहाकाविषयी आणखीच तिरस्कार निर्माण झाला. एका देवदूताने हागारेस हे भविष्य सांगितले की इश्माएल "त्याच्या सर्व भावांशी शत्रूत्व राखील" (उत्पत्ति 16:11-12).

इस्लाम धर्माने, ज्याचे बहुसंख्य अरब पालन करतात, त्यांनी हे शत्रूत्व आणखी दृढ केले. कुरानात यहूद्यांसंबंधी थोडी फार विरोधी शिकवण दिलेली आहे. एके ठिकाणी ते मुसलमानांस असे शिकविते की त्यांनी यहूदी लोकांशी भावाप्रमाणे वागावे आणि दुसर्या ठिकाणी ते मुसलमानांस आज्ञा देते की त्यांनी इस्लाम धर्म स्वीकार न करणार्या यहूदी लोकांवर आक्रमण करावे. तसेच कुरान एका संघर्षाचा परिचय करून देते की अब्राहामाचा पुत्र हा खरोखर कराराचा पुत्र होता किंवा नाही. इब्री पवित्र शास्त्र म्हणते की हा पुत्र इसहाक होता. कुरान म्हणते की हा पुत्र इश्माएल होता. कुरान शिकविते की अब्राहामाने इश्माएलास प्रभुला लगभग अर्पण केले होते, इसहाकास नाही (जे उत्पत्ति 22 च्या विरुद्ध आहे). कराराचा पुत्र कोण होता याविषयीचा वाद आजही या शत्रूत्वास वाढवीत आहे.

तथापि, इसहाक आणि इश्माएल यांच्यातील कटुत्वाचे जुने मूळ आज यहूदी आणि अरबी लोकांतील शत्रूत्वाचे कारण स्पष्ट करीत नाही. खरे म्हणजे, मध्यपूर्व इतिहासाच्या हजारो वर्षांत, यहूदी आणि अरबी लोक तुलनात्मक दृष्ट्या एकमेकांशी समेटाने व एकमेकांची उपेक्षा करीत जगले आहेत. ह्या शत्रूत्वाचे मुख्य कारण आधुनिक काळातील आहे. दुसर्या जागतिक युद्धानंतर, जेव्हा संयुक्त राष्ट्राने इस्राएलाच्या भूमीचा एक भाग यहूदी लोकांस दिला, त्यावेळी त्या देशात मुख्यत्वेकरून अरबी लोकांचे (पैलेस्टिनियन) वास्तव्य होते. बहुसंख्य अरब लोकांनी त्या भूमीवर कब्जा करणार्या इस्राएल राष्ट्राविरुद्ध आवेशाने निषेध केला. अरब राष्ट्रांनी एकजुट होऊन इस्राएली लोकांस त्या देशातून हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात इस्राएलवर आक्रमण केले, पण त्यांचा पाडाव झाला. तेव्हा पासून, इस्राएल आणि त्याच्या अरब शेजार्यांत मोठे वैमनस्य आहे. इस्राएल एका लहानशा जमीनीच्या तुकड्यावर राहतो आणि त्याच्या अवतीभवती फार मोठी अरब राष्ट्रे आहेत जसे जाॅर्डन, सीरिया, सौदी अरेबिया, इराक आणि इजिप्त. आमचे मत हे आहे की, बायबलच्या दृष्टीने पाहता, इस्राएलास राष्ट्र म्हणून राहण्याचा हक्क आहे. त्याच वेळी, आमचे असे ठाम मत आहे की इस्राएलाने त्याच्या अरब शेजार्यांशी समेट करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्याविषयी आदर व्यक्त करावा. स्तोत्रसंहिता 122:6 घोषणा करते, "यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीति करणार्यांचे कल्याण असो."

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
यहूदी आणि अरब/मुसलमान एकमेकांचा हेवा का करतात?