settings icon
share icon
प्रश्नः

येशू तारण देतो याचा अर्थ काय आहे?

उत्तरः


येशू तारण देतो” ही बम्पर स्टिकर्स, क्रीडास्पर्धेतील मधील चिन्हावरील आणि अगदी लहान विमानांनी आकाशात ओढल्या जाणार्‍या बॅनरवरीलसुद्धा लोकप्रिय घोषवाक्य आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की “येशू तारण देतो” हा वाक्यांश पाहणारे फक्त काहीजण त्याचा अर्थ काय हे पूर्णपणे आणि खरोखर समजतात. या दोन शब्दांमध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती आणि सत्य आहे.

येशू तारण देतो, पण येशू कोण आहे?

बहुतेक लोकांना हे समजते की येशू अंदाजे 2000 वर्षांपूर्वी इस्रायलमध्ये राहणारा एक मनुष्य होता. अक्षरशः जगातील प्रत्येक धर्म हा येशूला एक चांगला शिक्षक आणि/किंवा संदेष्टा मानतो. आणि या गोष्टी येशूबद्दल निश्चितपणे सत्य असल्या तरीसुद्धा येशू खरोखर कोण आहे हे त्यांना समजत नाही किंवा येशू कसा व का वाचवितो हे देखील ते स्पष्ट करीत नाहीत. येशू मानवी स्वरुपात देव आहे (योहान 1:1,14) येशू देव आहे, खरा माणूस म्हणून पृथ्वीवर आलेला (1 योहान 4:2). देव आम्हाला वाचवण्यासाठी येशूच्या व्यक्तित्वामध्ये मनुष्य बनला. हा पुढील प्रश्न उत्पन्न करतो: आपणास तारण प्राप्त करण्याची गरज का आहे?

येशू वाचवितो, परंतु आपणास तारण प्राप्त करण्याची गरज का आहे?

बायबल घोषित करते की आतापर्यंत जगणार्‍या प्रत्येक मानवाने पाप केले आहे (उपदेशक 7:20; रोम. 3:23). पाप करणे म्हणजे विचार, शब्द किंवा कृतीत असे काही करणे आहे, जे देवाच्या परिपूर्ण आणि पवित्र स्वरूपाचा विरोध करते. आमच्या पापामुळे, आपण सर्व जण देवाकडून न्यायासाठी पात्र आहोत (योहान 3:18, 36). देव पूर्णपणे न्यायी आहे, म्हणून तो पाप आणि वाईटाला शिक्षेवाचून सोडत नाही. देव अनंत आणि सनातन आहे आणि शेवटी सर्व पाप देवाविरूद्ध आहे (स्तोत्र 51:4)), म्हणून फक्त अनंत आणि सार्वकालिक शिक्षा पुरेशी आहे. अनंतकाळचा मृत्यू हीच केवळ पापाची पुरेशी शिक्षा आहे. म्हणूनच आम्हाला तारणाची गरज आहे.

येशू तारण देतो, पण तो कसे तारण देतो?

कारण आम्ही सनातन देवाविरूद्ध पाप केले आहे, एकतर मर्यादित व्यक्तीने (आपल्या) अनंत काळासाठी आपल्या पापांची भरपाई केली पाहिजे, किंवा सनातन व्यक्तीने (येशू) आपल्या पापांसाठी एकदाच किंमत चुकवावी. याशिवाय दुसरा पर्याय नाही. येशू आमच्या जागी मरून आम्हास तारण देतो. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वात, परमेश्वराने आमच्यासाठी स्वतःला बलिदान दिले आणि केवळ अनंत आणि सार्वकालिक दंड भरून त्याने भरपाई केली, जे केवळ त्याच करता येणे शक्य होेते (2 करिंथ. 5:21; 1 योहान 2:2). आपल्या पापाचा योग्य परिणाम म्हणजे एक भयंकर शाश्वत नाश, त्यापासून वाचविण्यासाठी आम्ही पात्र असलेली शिक्षा येशू घेतो. आमच्यावर त्याच्या अमर्याद प्रेमामुळे, येशूने आपला प्राण दिला (योहान 15:13), आम्ही दंड कमविला, पण तो आम्हाला चुकता करता येईना, पण त्याची भरपाई येशूने केली. त्यानंतर येशू मरणातून जिवंत झाला आणि त्याने हे सिद्ध केले की त्याच्या मृत्यूची शिक्षा आपल्या पापांसाठी पुरेशी आहे (1 करिंथ. 15).

येशू तारण देतो, पण तो कोणास तारण देतो?

येशू त्याच्या तारणाची भेट स्वीकार करणार्‍या सर्वांस वाचवितो. त्यांच्या पापाची किंमत म्हणून जे केवळ त्याच्या बलिदानावर पूर्णपणे विश्वास ठेवतात त्या सर्वांना येशू तारण देतो (योहान 3:16; प्रेषितांची कृत्ये 16:31). येशूचे बलिदान सर्व मानवजातीच्या पापांसाठी पुरेसे पुरेसे होते, परंतु येशू केवळ अशाच लोकांचे तारण करतो जे त्याच्या सर्वात मौल्यवान कृपादानाचा स्वीकार करतात (योहान 1:12).

येशू तारण देतो याचा अर्थ काय आहे हे जर आपणास समजते, आणि आपण आपला वैयक्तिक तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू इच्छित असाल तर आपणास पुढील गोष्टी समजल्या आहेत आणि आपण त्यावर विश्वास ठेवत आहात याची खात्री करा आणि विश्वासाचे कृत्य म्हणून खालील गोष्टी देवाला सांगा. “देवा, मला माहित आहे की मी पापी आहे आणि मला हे माहित आहे की माझ्या पापामुळे मी कायमचा तुझ्यापासून विभक्त होण्यास पात्र आहे. जरी मी तुझ्या प्रेमास पात्र नाही, तरीही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे माझ्या पापांसाठी बलिदान केल्याबद्दल धन्यवाद. माझा असा विश्वास आहे की येशू माझ्या पापांसाठी मरण पावला आणि माझे तारण करण्यासाठी त्याच्यावरच माझा विश्वास आहे. येथून पुढे, पाप करण्याऐवजी माझे आयुष्य तुझ्यासाठी जगण्यात मला मदत कर. आपण प्रदान केलेल्या अद्भुत तारणासाठी कृतज्ञतेने माझे उर्वरित आयुष्य जगण्यास मला मदत कर. येशू, मला तारण दिल्याबद्दल धन्यवाद!”

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशू तारण देतो याचा अर्थ काय आहे?
© Copyright Got Questions Ministries