settings icon
share icon
प्रश्नः

मत्तय आणि लूकमध्ये येशूची वंशावळी वेगळी का आहे?

उत्तरः


येशूची वंशावळ पवित्र शास्त्रात दोन ठिकाणी दिली आहे: मत्तय 1 आणि लूक 3:23-38. मत्तय येशूपासून अब्राहामापर्यंत वंशावळीचा शोध घेते. येशूपासून आदामापर्यंत वंशावळीचा अहवाल लूक लिहितो. तथापि, मत्तय आणि लूक पूर्णपणे भिन्न वंशावळी मांडत आहेत यावर विश्वास ठेवण्याचे चांगले कारण आहे. उदाहरणार्थ, मत्तय योसेफाच्या पित्यास याकोब (मत्तय 1:16) हे नाव देतो, तर लूक योसेफाच्या पित्यास एली (लूक 3:23) हे नाव देतो. मत्तयने दावीदाचा मुलगा शलमोन (मत्तय 1:6) वरून वंशाचा माग लावला, तर लूकने दावीदाचा मुलगा नाथान (लूक 3:31) याच्याद्वारे वंश शोधून काढला. वास्तविक म्हणजे, दावीद आणि येशू यांच्या वंशावळींमध्ये फक्त दोनच नावे सामन्य आहेत शल्तिएल आणि जरुब्बाबेल (मत्तय 1:12; लूक 3:27).

बायबलमधील त्रुटी पुरावा म्हणून काही या मतभेदांकडे लक्ष वेधतात. तथापि, यहूदी लोक विशेषतः वंशावळींच्या तपशील राखून ठेवण्याबाबत अत्यंत दक्षता बाळगत. मत्तय आणि लूक एकाच वंशाच्या दोन पूर्णपणे परस्परविरोधी वंशावळी तयार करू शकतील हे अकल्पनीय आहे. पुन्हा दावीदापासून येशूपर्यंत, वंशावळी पूर्णपणे भिन्न आहेत. अगदी शल्तीएल आणि जरुब्बाबेलचा संदर्भ देखील समान नावांच्या भिन्न व्यक्तींचा उल्लेख असू शकतो. मत्तयने शल्तीएलचा पिता यखन्या आणि लूकने शल्तीएलच्या पित्यास नेरी हे नाव दिले. शल्तीएल नावाच्या व्यक्तीने त्या नावांच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रकाशात आपल्या मुलाचे नाव जरुब्बाबेल ठेवले (एज्रा आणि नहेम्याची पुस्तके पहा) ही सामान्य गोष्ट असेल.

चर्चचा इतिहासकार यूसेबियस याने दिलेले एक स्पष्टीकरण म्हणजे मत्तय प्राथमिक किंवा जीवशास्त्रीय वंशावळीचा विषय शोधत आहे तर लूकने “देवरविवाह” केल्याची घटना लक्षात घेत आहे. जर एखादा मुलगा मुलास जन्म न देता मेला, तर त्या भावाचे विधवेशी लग्न करण्याची आणि जनमास येणाऱ्या मुलास मृत व्यक्तीचे नाव देण्याची परंपरा होती. युसेबियसच्या सिद्धांतानुसार, मल्खी (लूक 3:24) आणि मत्तान (मत्तय 1:15) यांचे वेगवेगळ्या वेळी एकाच स्त्रीशी लग्न झाले होते (परंपरेनुसार तिचे नाव एस्था होतेे). यामुळे एली (लूक 3:23) आणि याकोब (मत्तय १रू१रू15) सावत्र भाऊ होतील. त्यानंतर हेली मुलगा न होताच मरण पावला आणि म्हणूनच त्याचा (सावत्र) भाऊ याकोबा याने एलीच्या विधवेशी लग्न केले जिने योसेफाला जन्म दिला. यामुळे जोसेफ कायदेशीररित्या “एलीचा मुलगा” आणि जीवशास्त्रानुसार “याकोबाचा मुलगा” होईल. अशाप्रकारे, मत्तय आणि लूक दोघेही एक समान वंशावळीची नोंद (योसेफची) नोंदवित आहेत, परंतु लूक कायदेशीर वंशाचे अनुसरण करतो तर मत्तय जीवशास्त्रानुसार अनुसरण करतो.

आज बहुतेक पुराणमतवादी बायबल अभ्यासक वेगळा दृष्टिकोन बाळगतात, म्हणजे लूक मरीयेची वंशावळ नोंद करतो आणि मत्तय योसेफाची वंशावळ नोंद करीत आहे. मत्तय दाविदाचा मुलगा शलमोन याच्यामार्फत योसेफाच्या (येशूचे कायदेशीर वडील) घराण्याचा माग घेत आहे, तर लूक दाविदाचा मुलगा नाथान याच्याद्वारे मरीयेच्या (येशूच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या) वंशावळीचे अनुसरण करीत आहे. “जावई” असा ग्रीक शब्द नसल्याने, योसेफाला एलीची मुलगी मरीया हिच्याशी लग्न केल्यामुळे “एलीचा मुलगा” असे संबोधले जात असे. मरीया किंवा योसेफ यांच्या वंशातून येशू दाविदाचा वंशज आहे आणि म्हणूनच तो ख्रिस्त होण्यासाठी पात्र आहे. आईच्या बाजूने वंशावळीचा मागोवा घेणे एक विलक्षण गोष्ट आहे, परंतु हा कुमारिकेद्वारे जन्म होता. लूकचे स्पष्टीकरण असे आहे की येशू योसेफाचा मुलगा होता, “असे समजत” (लूक 3:23).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मत्तय आणि लूकमध्ये येशूची वंशावळी वेगळी का आहे?
© Copyright Got Questions Ministries