settings icon
share icon
प्रश्नः

येशू शाकाहारी होते काय? ख्रिस्ती लोकांनी शाकाहारी असावे काय?

उत्तरः


येशू शाकाहारी नव्हते. पवित्र शास्त्रामध्ये येशूने मासे (लूक 24:42-43) आणि कोकरू (लूक 22:8-15) खाल्ल्याची नोंद केली आहे. येशूने चमत्कारिकरित्या गर्दीला मासे आणि भाकरी दिली, आणि जर तो शाकाहारी असेल तर हि त्याच्यासाठी एक विचित्र गोष्ट असती (मत्तय 14:17-21). प्रेषित पेत्राला दिलेल्या दृष्टान्तात येशूने सर्व खाद्यपदार्थ स्वच्छ असल्याचे घोषित केले, ज्यामध्ये प्राण्यांचा समावेश आहे (प्रेषित 10:10-15). नोहाच्या काळातील पूरानंतर, देवाने मानवतेला मांस खाण्याची परवानगी दिली (उत्पत्ति 9:2-3). देवाने ही परवानगी कधीही रद्द केली नाही.

त्यासह, ख्रिस्ती शाकाहारी असण्यात काहीच गैर नाही. पवित्र शास्त्र आपल्याला मांस खाण्याची आज्ञा देत नाही. मांस खाण्यापासून दूर राहण्यात काहीच गैर नाही. . पवित्र शास्त्र काय म्हणते ते म्हणजे आपण या समस्येबद्दल आपल्या समजुतींना इतर लोकांवर जबरदस्ती करू नये किंवा ते काय खातात किंवा काय खात नाहीत याचा निर्णय घेऊ नये. रोमकरांस पत्र 14:2-3 आपल्याला सांगते, “एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणार्‍याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्‍याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे.”

पुन्हा, देवाने मानवतेला पूरानंतर मांस खाण्याची परवानगी दिली (उत्पत्ति 9:3). जुन्या कराराच्या नियमांमध्ये, इस्रायल राष्ट्राला काही खाद्यपदार्थ न खाण्याची आज्ञा देण्यात आली होती (लेवीय 11:1-47), पण मांस खाण्याविरुद्ध कधीही आदेश नव्हता. येशूने सर्व प्रकारच्या मांसासह सर्व पदार्थ स्वच्छ असल्याचे घोषित केले (मार्क 7:19) कोणत्याही गोष्टीप्रमाणे, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाने त्याला काय खावे यासाठी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण जे काही खाण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत आपण ते प्रदान केल्याबद्दल त्याचे आभार मानतो तो देवाला मान्य आहे (1 थेस्सल 5:18). “म्हणून तुम्ही खा किंवा प्या किंवा जे काही कराल ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा” (1 करिंथ 10:31).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशू शाकाहारी होते काय? ख्रिस्ती लोकांनी शाकाहारी असावे काय?
© Copyright Got Questions Ministries