settings icon
share icon
प्रश्नः

आत्मा विश्वासणाऱ्यास कधी सोडून जाईल का?

उत्तरः


सरळ शब्दात सांगायचे तर नाही, पवित्र आत्मा खर्या विश्वासणाऱ्यास कधीही सोडणार नाही. हे नवीन कराराच्या वेगवेगळ्या परिच्छेदांमधून दिसून आले आहे. उदाहरणार्थ, रोम 8:9 आम्हाला सांगते, “जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही” या वचनात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की जर एखाद्यात पवित्र आत्म्याचे अंतर्गत वास्तव्य नसेल तर ती व्यक्ती तारण पावलेली नाही. म्हणून, जर पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यास सोडून गेला असेल तर त्या व्यक्तीने ख्रिस्ताबरोबर तारणारा नातेसंबंध गमावला असेल. तरीही ख्रिस्ती व्यक्तीच्या शाश्वत सुरक्षेबद्दल बायबल जे शिकवते त्याच्या हे विपरीत आहे. दुसरे वचन जे विश्वासणार्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या स्थायी उपस्थितीबद्दल बोलते, ते वचन आहे योहान 14:16. येथे येशू म्हणतो की पिता दुसरा कैवारी देईल अशासाठी की ”त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा रहावे.“ मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.

पवित्र आत्मा विश्वासणाऱ्या सोडणार नाही हे सत्य इफिस. 1:12-14 मध्ये दिसून येते जेथे असे म्हटलेले आहे की पवित्र आत्म्याचा विश्वासणाऱ्यावर ”शिक्का“ मारण्यात आला आहे, ”देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.“ आत्म्याचा शिक्का मारण्याचे चित्र मालकी आणि स्वामीत्व दर्शविते. परमेश्वराने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे आणि तो आपले अभिवचन पूर्ण करील याची हमी म्हणून त्याने सुटकेच्या दिवसापर्यंत विश्वासणाऱ्यात वास्तव्य करण्यासाठी पवित्र आत्मा पाठविला आहे. जसे आपण कार किंवा घराची अग्रीम रक्कम देऊ करतो, त्याचप्रमाणे देवाने विश्वासणार्यांमध्ये वास्तव्य करण्यासाठी पवित्र आत्मा पाठविण्याद्वारे त्याच्यासोबत त्यांच्या भविष्यातील नात्याची अग्रीम रक्कम सर्व विश्वासणार्यांस दिली आहे. सर्व विश्वासणार्यांवर शिक्का मारण्यात आला आहे हे सत्य 2 करिंथ. 1:22 आणि इफिस. 4:30 मध्ये सुद्धा दिसून येते.

ख्रिस्ताच्या मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण यापूर्वी, लोकांसोबत पवित्र आत्म्याचे ”ये आणि जा“ असे नाते होते. पवित्र आत्मा राजा शौलामध्ये वस्ती करीत होता, पण तो त्याच्यापासून निघून गेला (1 शमूएल 16:14). त्याऐवजी देवाचा आत्मा दाविदावर आला (1 शमूएल 16:13). बथशेबासोबत व्यभिचार केल्यानंतर, दाविदाला भीती होती की पवित्र आत्मा त्याजपासून काढून घेतला जाईल (स्तोत्र 51:11). पवित्र आत्म्याने निवासमंडपासाठी आवश्यक वस्तू निर्माण करण्यासाठी योग्यता देण्याकरिता बसलेलला सामथ्र्य दिले (निर्गम 31:2-5), परंतु याचे वर्णन स्थायी नाते म्हणून करण्यात आलेले नाही. येशूच्या स्वर्गारोहणानंतर हे सर्वकाही पार बदलून गेले. पेंटेकास्टच्या दिवशी सुरूवात करून, पवित्र आत्मा विश्वासणार्यांमध्ये स्थायी वास्तव्य करू लागला (प्रे. कृत्ये 2). पवित्र आत्म्याचे स्थायी वास्तव्य सदासर्वदा आमच्यासोबत असेल आणि तो आम्हास कधीही सोडणार नाही या देवाच्या अभिवचनाची परिपूर्णता आहे.

पवित्र आत्मा कधीही विश्वासणार्यांस सोडणार नाही, परंतु हे शक्य आहे की आपली पापे “पवित्र आत्म्यास विझवू” शकतात (1 थेस्सल. 5:11) किंवा “पवित्र आत्म्याला खिन्न” (इफिस 4:30) करू शकतात. देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधामध्ये पापाचे नेहमीच परिणाम असतात. ख्रिस्तामध्ये परमेश्वरासोबत असलेला आपला नातेसंबंध सुरक्षित असला, तरीही आपल्या जीवनातील अपवित्र पापामुळे आपण देवाबरोबरच्या आपल्या सहभागितेत अडथळा आणू शकतो आणि आपल्या जीवनात पवित्र आत्म्याच्या कार्यास प्रभावीपणे विझवू शकतो. म्हणूनच आपल्या पापांची कबुली देणे इतके महत्त्वाचे आहे कारण देव “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (1 योहान 1:9). म्हणून, पवित्र आत्मा आपल्याला कधीच सोडणार नाही, परंतु त्याच्या उपस्थितीचे फायदे आणि आनंद खरं तर आपल्यापासून दूर जाऊ शकतात.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आत्मा विश्वासणाऱ्यास कधी सोडून जाईल का?
© Copyright Got Questions Ministries