settings icon
share icon
प्रश्नः

परमेश्वर अजूनही आमच्याशी बोलतो का?

उत्तरः


बायबल मध्ये असे नोंदविलेले आहे की परमेश्वर अनेक वेळा लोकांना ऐकू येईल अशा रीतीने बोलत असे (निर्गम 3:14; यहोशवा 1: 1; शास्ते 6:18; 1 शमुवेल 3:11, 2 शमुवेल 2: 1; ईयोब 40: 1; यशया 7: 3; यिर्मया 1: 7; प्रेषितांची कृत्ये 8:26; 9: 15-हा फक्त एक लहान नमूना आहे). परमेश्वर ऐकू येईल अशा रीतीने आज देखील एखाद्या व्यक्तीशी बोलू शकत नाही याबद्दल बायबलात एकही कारण नाही. शेकडो वेळा बायबलने ईश्वरीय बोलण्याची नोंद केली आहे, आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की ते मानवी इतिहासाच्या 4000 वर्षांत झाले आहे. ईश्वर ऐकू येईल अशा रीतीने बोलने अपवाद नाही तर नियम आहे. बायबल ने नोंदविलेल्या ईश्वरीय बोलण्याच्या घटनेत , हे स्पष्ट नाही की तो एक ऐकू येईल असा आवाज होता, एक अंतर मनातील आवाज होता किंवा मानसिक कल्पना होती.

ईश्वर आज देखील लोकांशी बोलतो. प्रथम, परमेश्वर त्याच्या वचनाच्या माध्यमातून आमच्याशी बोलतो (2 तीमथ्य 3: 16-17). यशया 55:11, आम्हाला सांगते, " माझ्या तोंडातून बाहेर पडणारे माझे शब्द असे आहे: ते माझ्याकडे रिकामे परत येणार नाही, आणि मी त्यांना ज्या इच्छित उद्देशासाठी पाठविलेले आहे ते साध्य करतील", बायबल हे देवाचे वचन आहे, आम्हाला पापापासून वाचविण्यासाठी आवश्यक आहे सर्वकाही ज्ञान देते आणि एक चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास मदत करते. दुसरा पेत्र 1: 3 घोषित करतो, "येशूच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला जीवन जगण्यासाठी आणि ईश्वरभक्ती साठी गरज असलेली प्रत्येक गोष्ट देण्यात आली आहे."

अर्थात तो आपल्या परिस्थितीचे आयोजन करून आमचे मार्गदर्शन करू शकतो - परमेश्वर घटनेच्या माध्यमातून आपल्याशी 'बोलणी "करू शकतो. आणि ईश्वर आपल्याला आपल्या विवेकाच्या (1 पेत्र 3:16 5 1 तीमथ्य 1) माध्यमातून चांगले काय आणि वाईट काय याची योग्य पारख करण्यास मदत करू शकतो. परमेश्वर त्याच्या विचाराशी आपल्या मनातल्या प्रक्रिया जुड्वण्याच्या प्रक्रियेत आहे (रोम 12: 2). परमेश्वर आपल्या जीवनातील घटनेच्या माध्यमातून आम्हाला थेट आम्हाला बदलू शकतो व आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला मदत करण्यास परवानगी देतो (याकोब 1: 2-5; इब्री लोकांस 12: 5-11). प्रथम पेत्र 1: 6-7 आम्हाला स्मरण करून देते, "तुम्ही खूप यातना सहन केल्या असतील खूप परीक्षा दिल्या असतील मात्र आता सर्व प्रकारच्या दु: ख विसरा आणि आनंद घ्या. कारण त्या परीक्षा आपली श्रद्धा पारख करण्यासाठी होत्या आणि त्या आपल्या सोन्या पेक्षा देखील जास्त किमतीचे होते आणि तुम्हाला तुमचा शुद्ध अस्सल विश्वास सिद्ध करता आला आणि येशू ख्रिस्त जेंव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्हास स्तुति, गौरव व सन्मान मिळेल. "

परमेश्वर कधी कधी लोकांना ऐकू येईल अशा रीतीने बोलू शकतो. परंतु काही लोक वारंवार दावा करतात म्हणून ते अत्यंत संशयास्पद वाटते. पुन्हा एकदा, अगदी बायबलमध्ये देखील परमेश्वर ऐकू येईल अशा रीतीने बोलण्याला अपवाद मानले गेले आहे आणि ते सामान्य नाही. जर कोणी दावा करत असेल की ईश्वर त्याचाशी बोलतो किंवा बोलला तर नेहमी तो काय बोलतो त्याचा बायबल काय म्हणते त्याशी तुलना करा. जर ईश्वराला आज बोलायचे असेल, तर त्याचे शब्द त्याने बायबल (2 तीमथ्य 3: 16-17) मध्ये काय म्हटले आहे त्याच्याशी सुसंगत असेल. कारण परमेश्वर स्वतःच्या विरुद्ध प्रतिपादन करणार नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

परमेश्वर अजूनही आमच्याशी बोलतो का?
© Copyright Got Questions Ministries