settings icon
share icon
प्रश्नः

जुन्या करारातील ईश्वर नवीन करारातील ईश्वरापेक्षा भिन्न का?

उत्तरः


हा प्रश्नाच्या अगदी हृदय स्थानी जुना आणि नवीन करारात विदित केलेल्या परमेश्वराच्या रुपाबद्दल एक मूलभूत गैरसमज आहे. काही लोक म्हणतात "जुना करार ईश्वराच्या क्रोधाचे प्रतिनिधित्व करतो, तर नवीन करारमध्ये ईश्वर प्रीतीचे वर्णन आहे." बायबल स्वत: ईश्वराचा पुरोगामी प्रकटीकरण आहे आणि ऐतिहासिक घटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या संपूर्ण इतिहासाच्या संबंधातून गैरसमज वाढले असू शकते. तथापि, आपण जेंव्हा जुना आणि नवीन करार दोन्ही वाचतो तेव्हा, हे उघड होते की त्यातील ईश्वर हे वेगवेगळे नाही तर ईश्वराचे क्रोध आणि त्याचे प्रेम हे दोन्ही करारामध्ये प्रकट होतात.

उदाहरणार्थ, संपूर्ण जुन्या करारात, ईश्वर", दयाळू आणि कृपाळू ईश्वर, सहनशील, न रागावणारा प्रेम आणि विश्वासाचा सागर " असल्याचे (निर्गम 34: 6; क्रमांक 14:18; अनुवाद 4:31; नहेम्या 9: 17; स्तोत्र 86: 5, 15; 108: 4; 145: 8; जोएल 2:13) घोषित केले आहे. पण नवीन करारात , देवाच्या प्रेम आणि दया याची पूर्ण आणि खरी अभिव्यक्ती झाली आहे आणि म्हणूनच म्हटले आहे की "देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाला दिला आणि म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल" (योहान 3:16). जुन्या करारात आपणास दिसून येते की ईश्वर इस्राएलला त्याच प्रकारे वागवतो ज्या प्रकारे एक प्रेमळ पिता मुलाला वागवतो. जेंव्हा त्यांनी जाणूनबुजून पाप केले आणि मूर्तीची पूजा करण्यास सुरुवात केली, तेव्हा ईश्वराने त्यांना शिक्षा दिली. पण, प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्या मूर्तिपूजेचा पश्चात्ताप केला तेंव्हा त्यांची सुटका केली. याच प्रकारे नवीन करारात ईश्वर ख्रिस्ती लोकांशी व्यवहार करतू. उदाहरणार्थ, इब्री लोकांस 12: 6 संते ", तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना शिस्त लावतो आणि ज्याला तो मुलगा म्हणून स्वीकारतो त्याला शिक्षा करतो."

त्याचप्रकारे, आपण संपूर्ण जुन्या करारात बघतो की ईश्वराने पापावर कसा संताप ओतला आहे. त्याचप्रमाणे, नवीन करारात आम्ही बघतो की पापी आणि दुष्ट लोकांवर ईश्वर कसा रागावलेला आहे कारण ते “पाप करून सत्य दाबून ठेवतात अशा सर्व लोकांवर संतापाचा वर्षाव करतो" (रोम 1:18). त्यामुळे, हे स्पष्ट आहे की जुना करारतला ईश्वर नवीन करारातील ईश्वरापेक्षा भिन्न नाही. त्याच्या स्वभावाने ईश्वर अक्षय (न बदलणारा) आहे. पवित्र शास्त्रातील काही परिच्छेदा मध्ये त्याच्या स्वभावाचे एखादा पैलू इतर पैलू पेक्षा अधिक प्रकट झाला असेल, पण स्वत: ईश्वर बदलत नाही.

आम्ही जस जसे बायबल वाचू आणि अभ्यास करू लागतो आम्हाला कळते की ईश्वर तो ईश्वरच आणि तो जुन्या आणि नवीन करारात सारखाच आहे. जरी बायबल करून 40 पेक्षा अधिक लेखकांनी अंदाजे 1500 वर्षांच्या कालावधीसाठी दोन (किंवा शक्यतो तीन) खंड वर लिहिलेले 66 वैयक्तिक पुस्तके, तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे, तरी देखील त्यामध्ये विरोधाभास नसून सुरवातीपासून शेवटपर्यंत ते एक समग्र पुस्तक आहे. खरोखर, बायबल हे ईश्वराचे लोकांना प्रेम पत्र आहे. ईश्वराचे त्याच्या सृष्टीबद्दल, विशेष म्हणून मानव जातीसाठी प्रेम हे पवित्र ग्रंधातून स्पष्ट होते. संपूर्ण बायबल मध्ये ईश्वर प्रेमळपणे आणि दयाळूपणे लोकांना स्वत:सोबत एक खास नातेसंबंध जोडण्यासाठी आवाहन करतो, त्यांची लायकी आहे म्हणून नव्हे तर तो कृपाळू आणि दयाळू ईश्वर असून त्याच्या अंगी प्रेम, सत्य, सहनशीलता मुबलक आहे असा तो परमेश्वर आहे. मात्र जर का कुणी त्याची आज्ञा मोडत असेल व त्याची प्रार्थना करीत नसेल तर तो एक कडक न्यायधीश सुद्धा आहे जर आपण त्याच्या ऐवजी माणसाने निर्मिती केलेल्या मूर्तींची पूजा केली तर (रोम अध्याय 1).

ईश्वराच्या नीतिमान आणि पवित्र स्वभावामुळे , सर्व पाप-भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यात घडणाऱ्या सर्वांशी न्याय केला जाईल. पण त्याच्या असीम प्रेमा खातर त्याने पापापासून मुक्ती साठी किंमत मोजून व पापी मनुष्य त्याच्या क्रोधापासून मुक्त होऊ शकतो. आम्ही 1 योहान 4:10 या वचनांत हे आश्चर्यकारक सत्य पाहू शकतो: " हे प्रेम आहे: आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली आणि आपल्या पापांचे क्षालन म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले आहे." जुना करारात, ईश्वराने यज्ञासंबंधी प्रणाली उभी केली त्यात पापाचे शुद्धीकरण केल्या जाऊ शकते . तथापि, ही यज्ञासंबंधी प्रणाली फक्त तात्पुरत्या स्वरुपाची होती आणि येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी आणि पुढे त्याला वधस्तंभावर ठार मारण्याच्या घटनेचे भाकीत होते ज्या मार्फत लोकांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित होनार होते. जुन्या करारात तारणहाराबद्दल पूर्णपणे आश्वासन दिले होते ते नवीन करार प्रकट झाले आहे. फक्त जुना करारामध्ये ईश्वराचे प्रेम आणि अंतिम अभिव्यक्ती, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला पाठवण्याची सोय ती पूर्णपणे नवीन करारात सर्व वैभवासह प्रकट होते. जुना आणि नवीन करार दोन्ही आम्हाला "मोक्ष प्राप्ती साठी सुज्ञ करण्यासाठी" देण्यात आले आहे (2 तीमथ्य 3:15). जेंव्हा आम्ही लक्षपूर्वक करारांचा अभ्यास करतो, तेंव्हा हे स्पष्ट होते की ईश्वर " बदलणाऱ्या छाया सारखा सरकत नाही" (याकोब 1:17).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

जुन्या करारातील ईश्वर नवीन करारातील ईश्वरापेक्षा भिन्न का?
© Copyright Got Questions Ministries