settings icon
share icon
प्रश्नः

पवित्रशास्त्र डायनासोअर विषयी काय सांगते?

उत्तरः


“दिवस” या शब्दासाठी इब्री शब्दाचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि उत्पत्तीमध्ये ज्या संदर्भात तो आढळला आहे तो आपल्याला या निष्कर्षांपर्यंत नेतो की, “दिवस” म्हणजे प्रत्यक्षात 24-तासांचा काळ. इब्री शब्द योम याचे इंग्रजीमध्ये “दिवस” असे भाषांतर केले आहे ज्याचा अर्थ एकापेक्षा अधिक गोष्टी. याचा संदर्भ 24 तासांच्या वेळेच्या कालावधीशी येतो, तितका वेळ पृथ्वी तिच्या अक्षाभोवती फिरण्यास घेते (उदाहरणार्थ, “एक दिवसामध्ये 24 तास असतात”). हे पहाट आणि संध्याकाळ यांच्यादरम्यान असलेल्या सूर्यप्रकाशाच्या कालावधीला संदर्भित करू शकते (उदाहरणार्थ, “हे दिवसा खूप गरम होते परंतु रात्रीच्या वेळी थोडे थंड होते”). आणि हे अनिश्चित वेळेच्या कालावधीला देखील संदर्भित करू शकते (उदाहरणार्थ माझ्या आजोबांच्या काळी...”). उत्पत्ती 7:11 मध्ये याचा उपयोग 24 तासांच्या कालावधीला संदर्भित करण्यासाठी केला. उत्पत्ती 1:16 मध्ये याचा उपयोग पहाट आणि संध्याकाळ यांच्या दरम्यानच्या कालावधीला संदर्भित करण्यासाठी केला आहे. उत्पत्ती 2:4 मध्ये याचा उपयोग वेळेच्या अनिश्चित कालावधीला संदर्भित करण्यासाठी केला गेला. म्हणून, उत्पत्ती 1:5-2:2 मध्ये जेंव्हा त्याचा उपयोग क्रमवाचक संख्यासह एकत्रित केला (उदाहरणार्थ, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस, आणि सातवा दिवस) तेंव्हा त्याचा अर्थ काय होतो? हे सर्व 24-तासांचे कालावधी आहेत किंवा काहीतरी वेगळे आहे काय? योम याचा उपयोग इथे जसा केला आहे त्याचा अर्थ वेळेचा अनिश्चित कालावधी असा होतो काय?

ज्यामध्ये आपल्याला शब्द सापडतात अशा संदर्भांचे सरळ निरीक्षण करून आणि वचनामध्ये दुसरीकडे त्याचा उपयोग कसा केला आहे याचा संदर्भ घेऊन उत्पत्ती 1:5-2:2 मध्ये योम चा अर्थ कसा लावला आहे ते आपण निश्चित करू शकतो. असे करण्याने आपण वचनाला स्वतः त्याचा अर्थ लावण्याची परवानगी देतो. इब्री शब्द योम याचा जुन्या करारामध्ये 2301 वेळा उपयोग करण्यात आला आहे. उत्पत्ती 1 च्या बाहेर, योम अधिक संखेमध्ये आहे (410 वेळा उपयोग केला आहे), हे नेहमी सामान्य दिवसाला सूचित करते, म्हणजेच 24-तासांचा कालावधी असा आहे. “संध्याकाळ” आणि “सकाळ” हे शब्द एकत्रितपणे (38 वेळा) नेहमी सामान्य दिवसाला सूचित करतात. योम + “संध्याकाळ” किंवा “सकाळ” (23 वेळा) हे नेहमी सामान्य दिवसाला सूचित करतात. योम + “रात्र” (52 वेळा) हे नेहमी सामान्य दिवसाला सूचित करतात.

उत्पत्ती 1:5-2:2 मध्ये योम या शब्दाचा उपयोग ज्या संदर्भात केला आहे, तो प्रत्येक दिवसाचे वर्णन “संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली” असे करून हे स्पष्ट करतो की, उत्पत्तीच्या लेखकाला 24-तासांचा कालावधी असे म्हणायचे होते. “संध्याकाळ” आणि “सकाळ” यांच्या संदर्भाला काही अर्थ नाही जोपर्यंत ते प्रत्यक्षात 24-तासांच्या दिवसाला संदर्भित करत नाहीत. जेंव्हा 1800 च्या शतकात वैज्ञानिक समुदायामध्ये नमुना बदल झाला, आणि पृथ्वीच्या गाळासंबंधीच्या थराच्या स्तराचा पुन्हा अर्थ लावला गेला तोपर्यंत उत्पत्ती 1:5-2:2 मधील दिवसाचा लावलेला अर्थ हाच आदर्श होता. याउलट पूर्वी नोहाच्या पुराचा पुरावा म्हणून खडकांच्या थराचा अर्थ लावला जात होता, पुराला वैज्ञानिक समुदायाने बाहेर फेकले आणि अतिशय जुन्या पृथ्वीचा पुरावा म्हणून खडकांच्या थरांचा पुन्हा अर्थ लावण्यात आला. मग काही चांगल्या अर्थपूर्ण परंतु अतिशय चुकीच्या ख्रिस्ती लोकांनी या नवीन पूर-विरोधी, पवित्र शास्त्र-विरोधी लावलेल्या अर्थाचा उत्पत्तीच्या अहवालाबरोबर मेळ घालण्याचा प्रयत्न योम या शब्दाचा अफाट, वेळेचा अनिश्चित कालावधी असा पुन्हा अर्थ लावून केला.

सत्य हे आहे की अनेक जुन्या पृथ्वीचे लावलेले अर्थ हे चुकीच्या समजांवर अवलंबून आहेत हे माहित आहे. परंतु आपण वैज्ञानिक लोकांच्या हट्टी संकुचित मानसिकतेचा प्रभाव पवित्र शास्त्र कसे वाचतो यावर पडू द्यायचा नाही. निर्गम 20:9-11 अनुसार, देवाने जगाची निर्मिती करण्यासाठी प्रत्यक्षात सहा दिवसांचा उपयोग मनुष्याच्या कामाच्या आठवड्यासाठी आदर्श देण्यासाठी केला: सहा दिवस काम, एक दिवस विश्रांती. निश्चितपणे जर देवाची इच्छा असती तर त्याने सर्व काही एक क्षणात निर्माण केले असते. परंतु त्याने आपल्याला (सहाव्या दिवशी) बनवण्याच्या आधीच त्याच्या विचारांमध्ये ठेवले होते आणि तो आपल्याला अनुसरण करण्यास उदाहरण देऊ इच्छित होता.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

उत्पत्तीचा 1 ला अधिकार म्हणजे प्रत्यक्षात 24 तासांचा दिवस आहे काय?
© Copyright Got Questions Ministries