settings icon
share icon
प्रश्नः

येशूला शुक्रवारी वधस्तंभावर खिळले गेले होते का?

उत्तरः


येशूला कोणत्या दिवशी वधस्तंभावर खिळले होते ते बायबल स्पष्टपणे सांगत नाही. बहुतांश लोक शुक्रवार आणि बुधवारी ही घटना झाली असे मानतात. पण काही जण, शुक्रवार आणि बुधवारी यांचे एक संश्लेषण वापरून तो गुरुवारच असेल असा वादावाद करतात.

येशूने बायबलच्या मत्तय12:40 मध्ये विषद केले आहे, " योना नावाचा माणूस तीन दिवस एका मोठ्या माश्याच्या पोटात तीन रात्री होता तसेच मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील ." जे लोक शुक्रवारी हि घटना झाली होती हे असे मानतात त्यांना वाटते की तीन दिवस राहणे हे शक्य आहे. पहिल्या शतकातील यहुदी मता नुसार, दिवसाचा एक भाग दिवस मानला जात होता. येशू शुक्रवार, शनिवारी, आणि रविवारच्या भागामध्ये थडग्यात असल्यामुळे तो तीन दिवस थडग्यात होता असे मानले जाते. शुक्रवारचा मुख्य वितर्क मार्क 15:42 मध्ये दिलेला आहे ज्यामध्ये दिलेले आहे की येशू वधस्तंभावर खिळले गेले होते तो "शब्बाथच्या दिवसा आधी." होता तर साप्ताहिक शब्बाथ म्हणजेच शनिवार, म्हणून शुक्रवार हा दिवस वधस्तंभाचा ठरतो. शुक्रवारचा आणखी एक युक्तिवाद म्हणजे मत्तय 16:21 आणि लूक 9:22 अध्याय; ज्यामध्ये लिहिले आहे की येशू तिसऱ्या दिवशी जागून उठेल म्हणून, त्याला पूर्ण तीन दिवस आणि रात्री थडग्यामध्ये असणे आवश्यक नाही. पण काही अनुवाद हे अध्याय साठी "तिसऱ्या दिवशी" चा वापर करताना आढळतात, सर्व नाही, आणि सर्वच "तिसऱ्या दिवशी" असा अनुवाद करणे हे सर्वोत्तम आहे या गोष्टीशी सहमत आहेत . शिवाय, मार्क 8:31 म्हणते येशू तीन दिवसा "नंतर" उठविला जाईल.

गुरुवारचा युक्तिवाद करणारे मानतात की शुक्रवारी सायंकाळी पासून येशूचे दफन आणि रविवारच्या सकाळ पर्यंत बरेच प्रसंग घडलेत (वीस घटना). यामध्ये विशेष समस्या अशी की शुक्रवार आणि रविवारी दरम्यान केवळ शनिवारच पूर्ण दिवस आहे, जो ज्यूलोकांच्या शब्बाथाचा दिवस होता. अतिरिक्त किंवा दोन दिवस ती समस्या काढून टाकते. समजा: तुम्ही सोमवारी संध्याकाळी पासून एक मित्र पाहिले नाही. आणि त्याला फक्त गुरुवारी सकाळीच पाहिले आणि तुम्ही म्हणता, ' "मी तुला तीन दिवसांत कधी पाहिले नाही" जरी ते तांत्रिकदृष्ट्या फक्त 60 तास (2.5 दिवस) केले होते. जर येशूला गुरुवारी वधस्तंभावर खिळले होते तर, हे उदाहरण दाखवते की ते तीन दिवसाचे कसे मानले जाऊ शकते.

बुधवारी मतप्रवाहाचे लोक आठवड्याच्या दोन शब्बाथ दिवसाकडे लक्ष आकर्षित करतात. प्रथम एक (एक सुळावर चढण्याच्या संध्याकाळी जी घडली ती) ([मार्क 15:42; लूक 23: 52-54],महिलांनी मसाले खरेदी केले आणि त्यांनी शब्बाथ दिवसानंतर खरेदी केले (मार्क 16: 1) . बुधवारी मतप्रवाहाचे लोक "शब्बाथ" वल्हांडण सण होते (लेवीय 16: 29-31, 23: 24-32, 39 जेथे सातवा दिवस आठवड्याचा पवित्र दिवस नाही त्याला शब्बाथ म्हणून उल्लेख केले आहे). दुसऱ्या शब्बाथाचा आठवड्यात सामान्य साप्ताहिक शब्बाथाचा दिवस होता. लक्षात ठेवा की लूक 23:56 ज्या महिलांनी पहिल्या शब्बाथ दिवसी मसाले खरेदी केले होते ते परत आले आणि मसाले तयार केले, नंतर "शब्बाथच्या दिवशी विसावा घेतला." या युक्तिवादानुसार ते शब्बाथ नंतर मसाले खरेदी करू शकत नव्हते , शब्बाथ पूर्वी मसाले तयार करू शकत होते – जर का दोन शब्बाथ दिवस सलग आले नसते. दोन-शब्बाथ दिवसाच्या मतानुसार जर येशूला गुरुवारी वधस्तंभावर खिळले होते, तर उच्च पवित्र शब्बाथ (वल्हांडण सण) गुरुवारी सुर्यास्तच्या वेळी सुरु झाला असता आणि शुक्रवारी सुर्यास्त ला संपला असतात म्हणजेच येथे साप्ताहिक शब्बाथ किंवा शनिवारच्या सुरुवातीला. पहिल्या शब्बाथ (वल्हांडण सण) नंतर मसाले खरेदी करणे चा अर्थ असा झाला असता कि त्यांनी ते शनिवारी खरेदी केले आणि शब्बाथ सोडत होते.

त्यामुळे बुधवारी दृष्टिकोन नुसार, एकच स्पष्टीकरण जे बायबलचे महिला आणि मसाले संबंधित स्पष्टीकरणाचे उल्लंघन करीत नाही आणि मत्तय 12:40 चे शब्दशः अर्थबोध देतो ते म्हणजे येशूला बुधवारी वधस्तंभावर खिळले होते ते आहे. शब्बाथ उच्च पवित्र दिवस (वल्हांडण सण) गुरुवारी आला होता, महिलांनी शुक्रवारी (की नंतर) मसाले खरेदी केले आणि परत गेले आणि त्याच दिवशी मसाले तयार केले, साप्ताहिक शब्बाथ म्हणजेच शनिवारी विश्रांती घेतली , नंतर मसाले थडग्यावर आणले तेंव्हा सकाळ झाली होती आणि दिवस होता रविवार. येशू ला बुधवार रोजी सूर्यास्तानंतर जवळ दफन करण्यात आले. ज्यू कॅलेंडर प्रमाणे गुरुवारी रात्री (रात्र एक), गुरुवार, दिवस (दिवस एक), शुक्रवारी रात्री (रात्र दोन), शुक्रवार दिवस (दिवस दोन), शनिवारी रात्री (रात्र तीन), शनिवारी दिवस (दिवस तीन) आहे. आम्ही त्याच्या उठण्याची नक्की वेळ माहीत नाही, परंतु आम्हाला एक माहिती आहे की तो रविवारी सूर्योद्यापूर्वी उठला. तो लवकर यहूदी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तानंतर शनिवारी संध्याकाळी उठू शकला असता. पूर्णपणे दिवस उजाळण्या आधी, थडगे रिक्त दिसले आणि तेंव्हा नुकताच सुर्योदय (2 मार्क 16) झाला होता (योहान 20: 1).

बुधवारी मत प्रवाहाशी संभाव्य समस्या म्हणजे इमाउस ला जातांना येशूच्या पुनरुत्थानानंतर (लूक 24:13) "त्याच दिवशी" त्याचे शिष्य त्याच्या सोबत चालत गेले. येशूचे शिष्य जे (24:21) येशूला ओळखु शकले नाही त्याला ते वधस्तंभा बद्दल सांगतात "आज या गोष्टीला तीन दिवस झाले आहेत" (24:22) असे ते म्हणतात. बुधवार ते रविवार चार दिवस होतात. एक शक्य स्पष्टीकरण असे कि ख्रिस्ताच्या दाफानानंतर तीन दिवस म्हणून गणना केली जाऊ शकते जो ज्यूच्या गुरुवारी सुरु होवून आणि गुरुवारी ते रविवार सायंकाळी पासून मोजल्या जात आहे.

भव्य गोष्टीच्या योजनेत, आठवड्याच्या कोणत्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळले गेले होते हे महत्वाचे नाही. जर ती गोष्ट अतिशय महत्त्वाची असती, तर ईश्वराने स्पष्टपणे दिवस आणि कालावधी सांगितले असते. महत्वाचे हे आहे की त्याच्या मृत्यू नंतर देखील तो शारीरिक मरणातून उठला आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे तो मरण पावला कारण त्यांने सर्व पापी लोकांची शिक्षा स्वतः स्वीकारली. योहान 3:16 आणि 3:36 दोन्ही सांगतात कि जर येशुमध्ये श्रद्धा ठेवल्यास अनंतकाळचे जीवन जगता येईल! हे तितकेच खरे आहे मग त्याला बुधवार, गुरुवार, किंवा शुक्रवारी वधस्तंभावर खिळले असो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशूला शुक्रवारी वधस्तंभावर खिळले गेले होते का?
© Copyright Got Questions Ministries