settings icon
share icon
प्रश्नः

कराराचे देवपरिज्ञान शास्त्र काय आहे आणि ते पवित्र शास्त्रीय आहे काय?

उत्तरः


कराराचे देवपरिज्ञान शास्त्र हे पवित्र शास्त्रातील वचनांचा अर्थ लावण्याची एक चौकट असल्याने 0सिद्धांताच्या क्रमबद्ध संचयाच्या अर्था इतके ‘देवपरिज्ञान शास्त्र’ नाही. हे सहसा पवित्र शास्त्राच्या दुसऱ्या व्याख्यात्मक चौकटीच्या विरुद्ध आहे, ज्याला ‘कालखंड देवपरिज्ञान शास्त्र’ अर्थात डिस्पन्सेशन थिओलॉजी किंवा ‘कालखंडनिय व्यवस्थापन’ अर्थात डिस्पन्सेशनलीसम असे म्हणतात. सध्या अमेरिकेतील सुवार्ताप्रसारामध्ये कालखंडनिय व्यवस्थापन ही पवित्र शास्त्रातील वचनाच्या स्पष्टीकरणाची पद्धत सर्वात लोकप्रिय आहे, आणि हि 19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरु झालेली ते 21 व्या शतकापर्यंत अशीच आहे. यामुळे, सुधारण काळापासून कराराचे देवपरिज्ञान शास्त्र हे प्रोटेस्टंटिझम पंथासाठी बहुमताचा वृतांत आहे, आणि ही अशी पद्धत आहे जिला अधिक सुधारित किंवा कॅल्व्हनिस्टिक पंथांकडून अधिक पसंती देण्यात आली आहे.

येथे कालखंडनिय व्यवस्थापन पावित शास्त्राचा उलघडा ‘कालखंडाच्या’ सात शृंखलेत (मुख्यता) करते, (एक कालखंड अर्थात ए डिस्पन्सेशन म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात पापमुक्त करण्याच्या इतिहासात मनुष्य आणि सृष्टीशी व्यवहार करण्यासाठी देवाने वापरलेला विशिष्ट घटक होय.), कराराचे देवपरिज्ञान शास्त्र शास्त-वचनांना कराराच्या जाळीतून पाहते. कराराचे देवपरिज्ञान शास्त्र दोन करारावरील अधिकाराची व्याख्या करते: कार्याचा करार अर्थात द कवनन्ट ऑफ वर्क (सी डब्ल्यू) आणि कृपेचा करार अर्थात द कवनन्ट ऑफ ग्रेस (सी जी). तिसऱ्या कराराचा उल्लेख कधीकधी सोडविण्याचा करार अर्थात द कवनन्ट ऑफ रिडम्शन (सी आर) असा केला जातो, जे इतर दोन कराराच्या आगाऊचे आहे. आपण या करारांची क्रमाने चर्चा करू. लक्षात ठेवण्याची महत्वाची बाब म्हणजे या विविध करारांचे पवित्र शास्त्रात वर्णन कलेले आहे (उदा. नोहा, अब्राहाम, मोशे, दावीद यांच्याशी केलेले करार आणि नवीन करार) हे एकतर कार्याचा करार किंवा कृपेचा करार याची सिद्धता दर्शवितात.

कराराचे देवपरिज्ञान शास्त्र यातील विविध करारांचे विस्तृत परीक्षण करण्यास सुरुवात सोडविण्याच्या कराराने करूया, जे तार्किकदृष्ट्या इतर दोन करारांपूर्वीचे आहे. कराराच्या देवपरिज्ञान शास्त्रानुसार सोडविण्याचा करार अर्थात सीआर त्रेक्यातील तीन व्यक्तींमध्ये प्रायश्चित्त करण्यासाठी निवडलेला, आणि निवडलेल्या व्यक्तींच्या निवडक गटाला तारण आणि अनंतकाळच्या जीवनात जतन करण्यासाठी केलेला करार आहे. एक लोकप्रिय देवपरिज्ञान शास्त्र-पाळक यांनी सोडविण्याच्या करारात असे म्हटले आहे कि, “स्वर्गीय पिता स्वतःच्या पुत्रासाठी वधू निवडतो.” सोडविण्याचा करार अर्थात सीआर याचा पवित्र शास्त्रात स्पष्टपणे उल्लेख नसला तरी पवित्र शास्त्रात तारणाच्या योजनेच्या शाश्वत स्वरूपाचे वर्णन केले आहे (इफिसकरांस पत्र 1:3-14; 3:11; 2 थेस्सलनीकाकरांस पत्र 2:13; 2 तीमथ्याला पत्र 1:9; याकोबाचे पत्र 2:5; 1 पेत्र 1:2). शिवाय, पित्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने येशू अनेकदा त्यांच्या कार्यांचा उल्लेख करीत होते (योहान 5:3, 43; 6:38-40; 17:4-12). निवडून घेतलेल्या लोकांचे तारण होणे ही सृष्टीच्या सुरुवातीपासूनच देवाची इच्छा होती यावर शंका घेता येणार नाही; सोडविण्याचा करार अर्थात सीआर केवळ या सार्वकालिक योजनेस कराराच्या भाषेत औपचारिक करतो.

सोडविण्याच्या ऐतिहासिक दृष्टीकोनातून, कार्याचा करार हा पवित्र शास्त्रात आढळणारा पहिला करार आहे. जेव्हा देवाने मनुष्य निर्माण केला तेव्हा त्याने त्याला एदेन बागेत ठेवले आणि एक सोपी आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील” (उत्पत्ति 2:16-17). आपण या आज्ञेमधील अंतर्भूत असलेली करारातील भाषा पाहू शकतो. देव आदामाला बागेत ठेवतो आणि जोपर्यंत तो देवाच्या आज्ञा पाळतो तोपर्यंत त्याला आणि त्याच्या वंशजांना चिरंतन जीवनाची प्रतिज्ञा आहे. आज्ञाधारक राहण्याचे बक्षीस म्हणजे जीवन आणि अवज्ञेची शिक्षा ही मृत्यू होय. ही कराराची भाषा आहे.

काही विद्वान कार्यांच्या करारामध्ये सुझेरेन-वासल करार नावाचे एक रूप पाहतात. या प्रकारच्या करारांमध्ये सुझरेन (म्हणजे राजा किंवा शासक) वासल (म्हणजे, विषय) यांना कराराच्या अटी देऊ करत असे. सुसेरिन वासलच्या आदराच्या बदल्यात आशीर्वाद आणि संरक्षण प्रदान करी. कार्याच्या कराराच्या बाबतीत, देव (सुजरेन) कराराच्या अटींचे पालन करण्याच्या बदल्यात (म्हणजे, झाडावरुन खाऊ नका) मानवजातीला अनंतकाळचे जीवन आणि आशीर्वाद देऊ करतो (मानव जातीचा प्रमुख म्हणून आदाम प्रतिनिधित्व केलेला वासल असा आहे). इस्राएलला मोशेद्वारे जुना करार देताना आपणही अशीच एक रचना पाहतो. इस्राएल लोकांनी सीनाय येथे देवाबरोबर करार केला. देवाने वचन दिलेली जमीन पुनर्रचना केलेले एदेन (दुधा-मधाचा प्रवाह वाहणारा प्रदेश) देईल आणि कराराच्या अटींचे इस्राएलच्या आज्ञापालनच्या बदल्यात सर्व शत्रूंपासून संरक्षण आणि आशीर्वाद देईल. कराराच्या उल्लंघनाची शिक्षा म्हणजे प्रदेशातून काढून टाकण्यात आले (हे इ.स.पू. 722 मध्ये उत्तरी राज्याच्या पाडावात आणि इ.स.पू. 586 मध्ये दक्षिण राज्याच्या पाडावात घडले).

जेव्हा आदाम कार्यांचा करार पाळण्यात अयशस्वी ठरला तेव्हा देवाने तिसरा करार स्थापन केला, ज्याला कृपेचा करार म्हणतात. कृपेचा करार अर्थात सीजी मध्ये देव पापी लोकांना (जे कार्यांचा करार अर्थात सिडब्ल्यू जगण्यात अयशस्वी होते) मुक्तपणे येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे अनंतकाळचे जीवन आणि तारण प्रदान करतो. उत्पत्ति 3:15 मध्ये देव जेव्हा “स्त्रीच्या संततीविषयी” भविष्यवाणी करतो तेव्हा आम्हाला सीजीची तरतूद दिसून येते. कार्यांचा करार हा सशर्त असून आज्ञाधारक राहणाऱ्यास आशीर्वाद देण्याचे आणि आज्ञांचे उल्लंघन करणाऱ्यास शाप देण्याचे वचन देतो, कृपेचा करार अशर्त आहे आणि तो देवाच्या कृपेच्या आधारावर मुक्तपणे दिला जातो. सीजी प्राचीन जमीन-अनुदान करारांचे रूप घेतो, ज्यामध्ये राजा एखाद्या प्रापकाला भेट म्हणून जमीन देतो,ज्यामध्ये कोणताही गुंता नाही. एक असा विश्वास म्हणजे कृपेच्या कराराची अट आहे असा एखादा तर्क करू शकतो. पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या बिनशर्त कृपा प्राप्तकर्त्यांना शेवटपर्यंत विश्वासू राहण्याची पुष्कळशी उत्तेजने आहेत, तर खऱ्या अर्थाने विश्वास टिकवणे ही सीजीची एक अट आहे. परंतु विश्वास जतन करणे देखील देवाची एक देणगी आहे असे पवित्र शास्त्र शिकविते (इफिसकरांस पत्र 2:8-9).

पवित्र शास्त्रामध्ये व्यक्तींबरोबर देवाने केलेल्या अनेक बिनशर्त करारांमध्ये कृपाचा करार प्रकट होतो. देवाने अब्राहामाशी केलेला करार (त्याचा देव होण्यासाठी आणि अब्राहम व त्याचे वंशज त्याचे लोक होण्यासाठी) हा सीजीचा विस्तार आहे. दाविदाशी करार (हा दावीदाचा वंशज नेहमी राजा म्हणून राज्य करील) हा देखील सीजीचा विस्तार आहे. शेवटी, नवीन करार हा सीजीचा अंतिम अभिव्यक्ति आहे कारण देव आपल्या अंतःकरणावर आपला नियम लिहितो आणि आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा करतो. या विविध जुन्या करारांकडे पाहताना आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते कि त्या सर्वांना त्यांची पूर्णता ख्रिस्त येशूमध्ये आहे. सर्व राष्ट्रांना आशीर्वाद देण्याचे अब्राहामाला दिले अभिवचन ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले. दाविदाच्या घराण्यातील राजा देवाच्या लोकांवर सार्वकालिकपणे राज्य करील हे देखील ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले, आणि ख्रिस्तामध्ये नवीन करार तर नक्कीच पूर्ण झाला आहे. अगदी जुन्या करारातही सीजीची चिन्हे दिसतात,कारण जुन्या करारातील सर्व यज्ञ आणि विधी आपला महान मुख्य याजक आपल्या ख्रिस्ताच्या तारणाच्या कार्यांकडे निर्देशित करतात (इब्री लोकांस पत्र 8–10). म्हणूनच येशू डोंगरावरील प्रवचनात असे म्हणू शकतात की ते नियम रद्द करण्यासाठी नाही तर तो पूर्ण करण्यासाठी आले आहेत (मत्तय 5:17).

जेव्हा देव आपल्या लोकांना त्यांच्या वारंवार केलेल्या पापाच्या योग्यतेचा न्याय करण्यापासून वाचवतो तेव्हा आपण जुन्या करारामध्ये देखील सीजी ची कृती पाहू शकतो. जरी मोशेच्या करारातील अटी (सीडब्ल्यू च्या अनुप्रयोगाने) त्याच्या आज्ञा न मानल्याबद्दल इस्राएलाला देवाने दिलेल्या निर्णयाची कबुली दिली असली तरीसुद्धा देव आपल्या कराराच्या लोकांशी संयमाने वागतो. हे सामान्यत: “देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली” या वाक्यांशासह सलग्न आहे (2 राजे 13:23; स्तोत्रसंहिता 105; यशया 29:22;41:8); कृपेचा करार पूर्ण करण्याचे देवाचे वचन (जे परीभाशेनुसार एकतर्फी करार आहे) बहुतेक वेळा कार्याचा करार अंमलात आणण्याच्या त्याचा अधिकार ओलांडून जाते.

हे कराराचे देवपरिज्ञान शास्त्र आणि कराराच्या चष्म्याद्वारे पवित्र शास्त्राचे कसे वर्णन करते याचे एक संक्षिप्त वर्णन आहे. कराराच्या देवपरिज्ञान शास्त्राच्या संदर्भात कधीकधी असा प्रश्न उद्भवतो की असो किंवा नसो सीजी सीडब्ल्यू ला पूरक आहे किंवा त्याची जागा घेते. दुसऱ्या शब्दांत, जुना करार अप्रचलित असल्याने सीडब्ल्यू अप्रचलित आहे काय? (इब्री लोकांस पत्र 8:13), जुना (मोशेचा) करार, सीडब्ल्यूचा उपयोजित असताना, सीडब्ल्यूचा नाही. पुन्हा, सीडब्ल्यू परत एदेनाच्या मार्गावर जातो जेथे देव आज्ञापालनास जीवन आणि अशीर्वात तर अवज्ञास शिक्षा आणि मृत्यचे वचन देतो. सीडब्ल्यू पुढील दहा आज्ञांमध्ये विस्तृतपणे वर्णन केला आहे, जेथे देव आज्ञापालनास जीवन आणि अशीर्वाद तर अवज्ञास शिक्षा आणि मृत्यचे वचन देतो. जुना करार हा नैतिक नियमात नमूद केलेल्या दहा आज्ञांपेक्षा अधिक आहे. जुन्या करारात देवाची उपासना संबंधित नियम व कायद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ईश्वरशासित व राजशाहीच्या काळात इस्राएल राष्ट्रावर राज्य करणारा नागरी कायदा समाविष्ट आहे. जुन्या करारातील मसिहा जो येशू ख्रिस्त याच्या येण्याने जुन्या कराराचा प्रकार आणि आकडेवारी पूर्ण झाली ज्यामुळे जुन्या करारातील अनेक पैलू अप्रचलित झाले (पुन्हा इब्री लोकांस पत्र 8-10 पहा). जुना करार "प्रकार आणि सावली" यांचे प्रतिनिधित्व करतो तर ख्रिस्त "गुणाचे" (कलस्सैकर 2:17) प्रतिनिधित्व करतो. पुन्हा, ख्रिस्त नियम पूर्ण करण्यासाठी आला (मत्तय 5:17). जसे पौल म्हणतो, “देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.” (2करिंथकरांस पत्र 1:20).

तथापि, हे नैतिक नियमात नमूद केलेल्या कार्यांचा करार रद्द करत नाही. देवाने जुन्या करारामध्ये त्याच्या लोकांकडून पावित्र्याची मागणी केली होती (लेवीय 11:44) आणि नवीन करारामध्येही त्याने त्याच्या लोकांकडून पावित्र्याची मागणी केली आहे (1 पेत्र 1:16). याप्रमाणे, आपण अद्याप सीडब्ल्यूच्या अटी पूर्ण करण्यास बांधील आहोत. चांगली बातमी अशी आहे की शेवटचा आदाम आणि आपला करार प्रमुख, येशू ख्रिस्त यांनी सीडब्ल्यूच्या मागण्यांचे अचूक पालन केले आणि त्या न्यायीपणामुळेच देव निवडलेल्या लोकांना सीजी वाढवू शकतो. रोमकरांस पत्र 5:12-21 मानवजातीच्या दोन ‘सांघिक’ प्रमुखांमधील परिस्थितीचे वर्णन करते. आदामने बागेमध्ये मानवी जातीचे प्रतिनिधित्व केले आणि सीडब्ल्यू राखण्यास अयशस्वी ठरला ज्यामुळे त्याने आणि त्याच्या वंशजांनी पाप आणि मृत्यू मध्ये उडी मारली. येशू ख्रिस्त मनुष्याचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिला, अरण्यातील त्याच्या परीक्षेतून ते कलवरी पर्यंत त्याने सीडब्ल्यू पूर्णतः पूर्ण केला. म्हणूनच पौल म्हणू शकतो, “कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील” (1करिंथकरांस पत्र 15:22).

शेवटी, कराराचे देवपरिज्ञान शास्त्र शास्त्रवचनांना सीडब्ल्यू किंवा सीजी चे प्रकटीकरण म्हणून पाहते. सोडवण्याच्या इतिहासाची संपूर्ण कहाणी ख्रिस्तामध्ये त्याच्या उत्कर्षांमधून संपूर्णपणे देव सीजीला त्याच्या नुकत्याच झालेल्या अवस्थेतून (उत्पत्ति 3;15) प्रकट करीत असताना पाहिली जाऊ शकते. कराराचे देवपरिज्ञान शास्त्र हा शास्त्रवचनाकडे पाहण्याचा एक अतिशय ख्रिस्त केंद्रित मार्ग आहे, कारण हा जुन्या कराराला ख्रिस्ताचे अभिवचन म्हणून आणि नवीन कराराला ख्रिस्तामधील पूर्णता असे पाहतो. काही लोक कराराच्या देवपरिज्ञान शास्त्राला ‘बदलीचे देवपरिज्ञान शास्त्र’ अर्थात रिप्लेसमेंट थिओलॉजी असे दोष लावतात (म्हणजे, सभा इस्त्राएलची जागा घेते). हे सत्याहून पुढे जाऊ शकत नाही. कालखंडनिय व्यवस्थापन विपरीत, कराराचे देवपरिज्ञान शास्त्र इस्राएल आणि सभा यांमध्ये तीव्र फरक पाहत नाही. इस्राएलने जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांची स्थापना केली आणि सभेने (जी यहुदी आणि गैर-यहुदी पासून बनली आहे) नवीन करारामध्ये देवाच्या लोकांची स्थापना करीत आहे (इफिसकरांस पत्र 2:11-20). सभा इस्राएलची जागा घेत नाही; सभा इस्त्राएल आहे आणि इस्राएल सभा आहे (गलतीकरांस पत्र 6:16). जे लोक अब्राहामासारखाच विश्वास ठेवतात ते देवाच्या कराराचा भाग आहेत (गलतीकरांस पत्र 3:25-29).

कराराच्या देवपरिज्ञान शास्त्राबद्दल आणखीन पुष्कळ बाबी सांगता येतील, परंतु लक्षात ठेवण्याची महत्वाची बाब म्हणजे पवित्र शास्त्र समजून घेण्यासाठी कराराचे देवपरिज्ञान शास्त्र ही एक व्याख्यात्मक कमर आहे. जसे आपण पाहिले आहे, हीच पवित्र शास्त्र वाचण्यासाठी केवळ भाषांतर करणारी मदत नाही. कराराचे देवपरिज्ञान शास्त्र अर्थात कवनन्ट थिओलॉजी आणि कालखंडनिय व्यवस्थापन अर्थात डिस्पन्सेशनलीसम यामध्ये बरेच फरक आहेत आणि काहीवेळा काही ते दुय्यम सिद्धांतांबद्दल विरुद्ध निष्कर्ष काढतात, परंतु दोघे हि ख्रिस्ती विश्वासाच्या आवश्यक गोष्टींचे पालन करतात: तारण हे फक्त कृपेनेच, फक्त विश्वासाद्वारेच आणि फक्त ख्रिस्तामध्येच, आणि गौरव फक्त देवालाच!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

कराराचे देवपरिज्ञान शास्त्र काय आहे आणि ते पवित्र शास्त्रीय आहे काय?
© Copyright Got Questions Ministries