settings icon
share icon
प्रश्नः

का सर्व ख्रिस्ती ढोंगी आहेत?

उत्तरः


कदाचित, “ढोंगी” या आरोपाच्या तुलनेत इतर कोणताच आरोप अधिक सक्रीय नाही. “दुर्दैवाने, काहींना त्यांच्या नजरेत हे योग्य वाटते की सर्वच ख्रिस्ती ढोंगी आहेत. “ढोंगी” या शब्दाला इंग्रजीमध्ये समृद्ध वारसा आहे. हा शब्द आपल्याकडे ल्याटीन शब्द हिपोक्रिसिस अर्थात hypocrisies ज्याचा अर्थ “अभिनय करणे, ढोंग करणे” असा होतो. यापुढे, हा शब्द शास्त्रीय आणि नवीन करार ग्रीक या दोन्हींमध्ये आढळतो आणि तिथे देखील त्याच्या अभिनय करणे, भासवणे याच संकल्पना आहेत.

अशा प्रकारे प्रभू येशूने या शब्दाचा उपयोग केला. उदाहरणार्थ, जेंव्हा ख्रिस्ताने प्रार्थना, उपवास, आणि दानधर्म यांचे महत्त्व सांगितले, तेंव्हा त्याने आपल्याला ढोंगीपणाची काही उदाहरणे देऊन निराश केले (मत्तय 6:2, 5, 16). लांबलचक सार्वजनिक प्रार्थना करून, दुसऱ्या लोकांच्या लक्षात येईल की ते उपवास करत आहेत अशा उपायांना करून, आणि मंदीर आणि गरिबांना भेटवस्तू देऊन ते देवाशी बाहेरून जोडलेले आहेत हे त्यांनी प्रकट केले. जरी परुश्यांनी धार्मिक सदाचाराच्या सार्वजनिक उदाहरणांमध्ये त्यांची नाट्यमय भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली, तरी हृदयाच्या आंतरिक जगतात जिथे खरा सदाचार असतो तेथे ते अतिशय अपयशी ठरले (मत्तय 23:13-33; मार्क 7:20-23).

येशूने त्याच्या शिष्यांना कधीच ढोंगी म्हणून संबोधले नाही. हे नाव दिशाभूल झालेल्या धार्मिक कट्टरपंथीय लोकांना देण्यात आले होते. त्याऐवजी, त्याने त्याच्या स्वतःच्या लोकांना “अनुयायी,” “बालके,” “मेंढरे,” आणि त्याची “मंडळी” असे म्हंटले. भर म्हणून, नवीन करारामध्ये ढोंगीपणाच्या पापाबद्दल चेतावणी दिलेली आहे (1 पेत्राचे पत्र 2:1), ज्याला पेत्र “खोटेपणा” असे म्हणतो. तसेच, ढोंगीपणाची दोन सुप्त उदाहरणे देखील मंडळीमध्ये नोंदवलेली आहेत. प्रेषित 5:1-10 मध्ये, दोन शिष्यांना उघड केले जे स्वतःला ते आहेत त्यापेक्षा अधिक निस्वार्थी असल्याचे भासवत होते. त्याचे परिणाम अतिशय भयंकर होते. आणि, सर्व लोकांपैकी, पेत्रावर परराष्ट्रीय विश्वासू लोकांच्या बरोबर वागणुकीमध्ये ढोंगीपणा करणाऱ्या एका गटाचे नेतृत्व करण्याचा आरोप आहे (गलतीकरांस पत्र 2:13).

नवीन कराराच्या शिकवणीवरून, आपण कमीतकमी दोन निष्कर्ष काढू शकतो. पहिला, तथाकथित ख्रिस्ती लोकांच्यामध्ये ढोंगी लोक अस्तित्वात आहेत. ते सुरवातीला उपस्थित होते, आणि येशूच्या निदन आणि गव्हाच्या दाखल्यानुसार, ते निश्चितपणे जगाच्या समाप्तीपर्यंत अस्तित्वात असतील (मत्तय 13:18-30). त्यात अधिक भर म्हणून, जर प्रेषित सुद्धा ढोंगी म्हणून अपराधी असतील, तर “सामान्य” ख्रिस्ती लोक यातून सुटतील असे कोणतेही कारण नाही. आपण नेहमी आपले स्वतःचे रक्षक असायला हवे जेणेकरून आपण या मोहात पडणार नाही (1 करिंथकरांस पत्र 10:12).

नक्कीच, प्रत्येकजण जो ख्रिस्ती होण्याचा दावा करतो तो खरा ख्रिस्ती नाही. ख्रिस्ती प्रसिद्ध लोकांपैकी कदाचित सर्व किंवा बरेचजण हे खरेतर ढोंग करणारे आणि फसवे होते. आजच्या दिवसापर्यंत, प्रख्यात ख्रिस्ती पुढारी भयानक पापामध्ये, आर्थिक आणि लैंगिक घोटाळ्यांमध्ये पडलेले आहेत आणि काहीवेळा तर त्यांनी संपूर्ण ख्रिस्ती समुदायाला ग्रस्त केलेले दिसून आले आहे. तथापि, त्यांच्यातील काहीजणांवर कार्यवाही करून आणि त्यांचा उपयोग संपूर्ण ख्रिस्ती समुदायाला कमी लेखण्यासाठी करण्याऐवजी, आपल्याला हे विचारण्याची गरज आहे की जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात ते खरेच ख्रिस्ती आहेत काय. शास्त्रातील पुष्कळ परिच्छेद याची खात्री करतात की, जे खरेच ख्रिस्ताचे आहेत ते आत्म्याची फळे स्पष्ट करतील (गलतीकरांस पत्र 5:22-23). येशूचा मत्तय 13 मधील पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत हे स्पष्ट करतो की, त्यावर विश्वास ठेवणारे सर्वच जण खरे नाहीत. खिन्नपणे, बरेचजण जे त्याचे असल्याची घोषणा करतात एक दिवस त्याला हे बोलताना ऐकून थक्क होतील की, “माला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा!” (मत्तय 7:23).

दुसरे, असे लोक जे स्वतःला आहेत त्यापेक्षा अधिक पवित्र असल्याचे भासवतात त्याने आपल्याला आश्चर्य होऊ नये, आपण असा निष्कर्ष काढू नये की मंडळी ही जवळपास संपूर्ण ढोंगी लोकांनी भरलेली आहे. कदाचित एखादा हे स्वीकारू शकतो की, आपल्यामधील सर्वजण ज्यांनी ख्रिस्ताचे नाव धारण केलेले आहे ते आपले पाप क्षमा झाल्यानंतरही पापीच राहतील. म्हणजेच, जरी आपण पापाच्या अनंतकालिक शिक्षेपासून वाचवले गेलो असलो (रोमकरांस पत्र 5:1; 6:23), तरी अद्याप आपण आपल्या जीवनातील पापाच्या उपस्थिती पासून ज्यामध्ये ढोंगीपणाच्या पापाच्या देखील समावेश आहे, त्यापासून वाचवले जाणे आणि सुटका होणे बाकी आहे (1 योहान 1:8-9). येशू ख्रिस्तावरील आपल्या जिवंत विश्वासाद्वारे, आपली अंतिम सुटका होईपर्यंत आपण सातत्याने पापावर जय मिळवू शकतो (1 योहान 5:4-5).

पवित्र शास्त्राच्या मानकाप्रमाणे परिपूर्ण जीवन जगण्यात सर्व ख्रिस्ती अपयशी ठरले आहेत. कोणताही ख्रिस्ती कधीही ख्रीस्तासारखा परिपूर्ण झालेला नाही. तथापि, असे अनेक ख्रिस्ती आहेत, जे ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि विश्वासातील दृढतेसाठी, बदलण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी अधिकाधिक पवित्र आत्म्यावर अवलंबून आहेत. असे अनेक मोठ्या संख्येने ख्रिस्ती आहेत ज्यांनी आपले जीवन कोणत्याही घोटाळ्यांविना व्यतीत केले आहे. कोणताही ख्रिस्ती परिपूर्ण नाही, परंतु या जीवनात चूक करणे आणि परिपूर्णतेकडे जाण्यास अपयशी ठरणे हे ढोंगी असण्यासारखे समान नाही.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

का सर्व ख्रिस्ती ढोंगी आहेत?
© Copyright Got Questions Ministries