settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती लोकांस त्यांच्या पापांची क्षमा मागत राहण्याची गरज आहे का?

उत्तरः


नेहमीच विचारण्यात येणारा प्रश्न आहे, “जर मी पाप केले तर काय होते, आणि परमेश्वरासमोर ते पाप कबूल करण्याची संधी मिळण्याआधी जर मला मरण आले तर?” दुसरा प्रश्न हा आहे की, ”जर मी पाप केले पण त्याविषयी विसरून गेलो आणि ते परमेश्वरासमोर कधीही कबूल करण्याची आठवण मला झाली नाही तर काय होते?” ही दोन्ही प्रश्न चुकीच्या धारणेवर आधारित आहेत. मरण्यापूर्वी विश्वासणार्यांनी आपली प्रत्येक पापे कबूल करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी पश्चाताप करणे म्हणजे तारण नव्हे. तारण यावर आधारित नाही कि विश्वासणाऱ्याने आपल्या प्रत्येक पापाची कबुली केली आहे की नाही आणि त्याबद्दल पश्चाताप केला आहे नाही. होय, आम्ही पाप केले आहे ही जाणीव होताच आपली पापे परमेश्वरासमोर आपण कबूल केली पाहिजेत. तथापि, आम्हाला नेहमीच परमेश्वराची क्षमा मागत राहण्याची गरज नाही. जेव्हा आपण तारणासाठी येशू ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवतो तेव्हा आमची सर्व पापे क्षमा केली जातात त्यात भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ लहान आणि मोठी सर्व पापे समाविष्ट आहेत. विश्वासणार्यांनी त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून सतत क्षमा मागत राहण्याची किंवा पश्चाताप करण्याची गरज नाही. येशू आमच्या सर्व पापांचा दंड देण्यासाठी मरण पावला, आणि जेव्हा त्यांची क्षमा करण्यात आली तेव्हा त्या सर्वांची क्षमा करण्यात आली (कलस्सै 1:14; प्रे कृत्ये 10:43).

आम्हास आपली पापे कबूल करावयाची आहेत: ”जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.“ (1 योहान 1:9). हे वचन आम्हाला परमेश्वरासमोर आपली पापे “कबूल करावयास” सांगते. “कबूल करण्याचा” अर्थ “सहमत होणे” आहे. जेव्हा आम्ही आपली पापे परमेश्वरासमोर कबूल करतो तेव्हा आपण परमेश्वरासोबत याबाबतीत सहमत होतो की आपण चूक केली आहे, की आपण पाप केले आहे. तो “विश्वसनीय व न्यायी” आहे या तथ्यामुळे निरंतरच्या आधारे कबूल करण्याद्वारे देव आम्हास क्षमा करतो. देव “विश्वसनीय व न्यायी” कसा आहे? तो पापांची क्षमा करण्याद्वारे विश्वसनीय आहे, जे करण्याचे त्याने त्या सर्वांना अभिवचन दिले आहे जे ख्रिस्ताला तारणारा म्हणून ग्रहण करतात. ख्रिस्ताने चुकवलेली किंमत आमच्या पापांसाठी लागू करण्याद्वारे तो न्यायी ठरतो, हे जाणून की पापांचे प्रायश्चित खरोखर घडले आहे.

त्याचवेळी, 1 योहान 1:9 वरून असे दिसून येते की क्षमा ही परमेश्वरासमोर आपली पापे कबूल करण्यावर अवलंबून आहे. ज्याक्षणी आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्याक्षणी जर आमची सर्व पापे क्षमा करण्यात आली तर हे कसे कार्य करेल? असे दिसून येते की प्रेषित योहान ज्याचे वर्णन येथे करीत आहे ती सापेक्ष किंवा तुलनात्मक क्षमा आहे. ज्याक्षणी आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्या क्षणी आमची पापे “स्थितीपरत्वे” क्षमा केली जातात. ही स्थितीपरत्वे क्षमा आमच्या तारणाची हमी आणि स्वर्गात सार्वकालिक घराचे अभिवचन देते. जेव्हा मरणानंतर आपण परमेश्वरासमोर उभे राहू तेव्हा परमेश्वर आम्हास आमच्या पापांमुळे स्वर्गात प्रवेश देण्यास नकार करणार नाही. ही स्थितीपरत्वे क्षमा आहे. सापेक्ष क्षमेची कल्पना या तत्त्वावर आधारित आहे की जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण देवास दुःख देतो आणि त्याच्या आत्म्यास खिन्न करतो (इफिस 4:30). देवाने आम्हास आम्ही करीत असलेल्या पापांची क्षमा केली आहे, तरीही ती परमेश्वरासोबत आमच्या नात्यांमध्ये अडखळण आणतात. आपल्या बापाविरुद्ध पाप करणाऱ्या लहान मुलास कुटुंब घराबाहेर पडत नाही. धार्मिक पिता आपल्या मुलांस विनाअट क्षमा करतो. त्याचवेळी जोपर्यंत त्यांचे नातेसंबंध सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत पिता आणि पुत्रामध्ये उत्तम संबंध साध्य करता येत नाहीत. असे तेव्हाच घडू शकते जेव्हा मूल आपल्या पित्यासमोर आपल्या चुका कबूल करते आणि क्षमा मागते. म्हणूनच आम्ही आपली पापे देवासमोर कबूल करतो - आपले तारण टिकवून ठेवण्यासाठी नव्हे तर, परत जो आपल्यावर प्रीती करतो आणि ज्याने आधीच आम्हाला क्षमा केली आहे त्या परमेश्वरसोबत आपली निकट सहभागिता स्थापन करण्यासाठी.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती लोकांस त्यांच्या पापांची क्षमा मागत राहण्याची गरज आहे का?
© Copyright Got Questions Ministries