settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती लोकांनी मानसशास्त्रज्ञ/मानसोपचारतज्ज्ञांना भेटले पाहिजे का?

उत्तरः


मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ञ हे व्यावसायिक आहेत जे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करतात. लोक सहसा त्यांच्या भूमिकांना संभ्रमित करतात किंवा त्यांना इतर मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या, जसे मानसोपचारतज्ज्ञ, मनोविश्लेषक किंवा मानसिक आरोग्य सल्लागारांशी जोडतात. मानसिक आरोग्य व्यावसायिकांचे अनेक प्रकार आहेत ज्यांना विविध शैक्षणिक मार्गांची आवश्यकता असते आणि अनेक उपचार पद्धती वापरतात. मानसशास्त्रज्ञांना पीएच.डी. मानसशास्त्रात आणि प्रामुख्याने संशोधन करणे, महाविद्यालयीन स्तरावर शिकवणे आणि खाजगी समुपदेशन पद्धती राखणे यावर लक्ष केंद्रित करावे लागते. ते अनेक आकलनविषयक आणि भावनिक मूल्यांकनांसाठीच्या चाचणीचे देखील व्यवस्थापन करू शकतात. एक मानसोपचारतज्ज्ञ प्रत्यक्षात एक वैद्यकीय डॉक्टर आहे जो मानसिक विकारांमध्ये तज्ञ आहे. मानसोपचार तज्ञ हे एकमेव मानसिक आरोग्य व्यावसायिक आहेत जे औषध लिहून देण्यास सक्षम आहेत आणि मानसिक आरोग्यासाठी औषधोपचारात प्रशिक्षित आहेत.

जेव्हा लोकांना डिस्लेक्सिया अर्थात वाचन करण्यातकिंवा वाचायला शकिण्यात अडचण येणे, चाचणी किंवा समुपदेशनासारख्या सेवांची गरज वाटते, तेव्हा ते मानसशास्त्रज्ञांना भेटण्याचा विचार करू शकतात. सामान्यतः, लोकांना मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवण्यापूर्वी, ते लोक मानसशास्त्रज्ञ किंवा इतर समुपदेशन व्यावसायिकांना भेटतात. काही मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशनाचा सराव करतात, परंतु इतर फक्त वैद्यकीय व्यावसायिकांच्या भागीदारीत औषधांचे व्यवस्थापन आणि देखरेख करतात. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे, काही मानसशास्त्रज्ञ/मानसोपचारतज्ज्ञ ख्रिस्ती असतील आणि इतर नसतील.

ख्रिस्ती लोकांना साधारणपणे जाणून घ्यायचे आहे की पवित्र शास्त्राचा या व्यवसायांशी कसा संबंध आहे. सत्य हे आहे की पापी अर्थाने मानसशास्त्र किंवा मानसोपचार चुकीचे नाहीत. ते दोन्ही वैध आणि सहायक हेतू पूर्ण करतात. देवाने माणसाला कसे निर्माण केले, मन कसे कार्य करते, आपल्याला का वाटते आणि आपण जसे वागतो ते पूर्णपणे समजून घेण्याची क्षमता कोणत्याही मानसिक आरोग्य व्यावसायिकात नसते. मानसिक आणि भावनिक समस्यांविषयी ऐहिक, मानव-केंद्रित सिद्धांताची विपुलता असताना, या व्यवसायांमध्ये अनेक धर्मी लोक देखील सामील आहेत जे पवित्र शास्त्रासंबंधी दृष्टिकोनातून मानवी मन समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. विश्वासार्ह असल्याचा दावा करणारा, शास्त्राचे ज्ञान व्यक्त करू शकतो आणि ख्रिस्तीलोकांसाठी धर्मी चरित्र प्रदर्शित करू शकतो अशा व्यावसायिकांचा शोध घेणे सर्वोत्तम आहे. आम्हाला मिळालेला कोणताही सल्ला पवित्र शास्त्राद्वारे छाननी केला जाणे आवश्यक आहे जेणेकरून, जगातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे, आपण काय सत्य आहे आणि काय खोटे आहे हे ओळखू शकतो.

मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्यात काहीच गैर नाही. तथापि, मानसिक आरोग्य व्यावसायिक अनेक भिन्न विश्वास आणि पार्श्वभूमीतून येतात. अगदी ख्रिस्ती मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ देखील योग्य उत्तरे देण्यास असमर्थ असतील किंवा ते त्यांच्या पवित्र शास्त्रासंबंधी ज्ञानाच्या काही क्षेत्रात कमकुवत असतील. लक्षात ठेवा की देवाचे वचन हे आमचे पहिले उत्तर आहे जे आपल्याला त्रास देतात. काय उपयोगी आहे आणि काय आपली दिशाभूल करत आहे हे समजून घेण्यासाठी स्वतःला सत्याने सुसज्ज करणे महत्वाचे आहे. (इफिस 6:11-17; 1 करिंथ 2:15-16). प्रत्येक विश्वासू त्याच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि समजून घेण्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. पवित्र आत्मा शब्दाचा उपयोग आपल्याला येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित करण्यासाठी करेल, जे सर्व ख्रिस्ती लोकांसाठी अंतिम ध्येय आहे (इफिसकरांस पत्र 5:1-2; कलस्सैकरांस पत्र 3:3).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती लोकांनी मानसशास्त्रज्ञ/मानसोपचारतज्ज्ञांना भेटले पाहिजे का?
© Copyright Got Questions Ministries