settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्ती तारण गमावू शकतो का?

उत्तरः


प्रथम, खिस्ती ही संज्ञा परिभाषित करणे आवश्यक आहे. “ख्रिस्ती” अशी व्यक्ती अशी नाही की जिने प्रार्थना केली किंवा बाकांच्या रांगेतून चालून गेला किंवा ख्रिस्ती कुटुंबात लहानाचा मोठा झाला. या प्रत्येक गोष्टी खिस्ती अनुभवाचा भाग असू शकतात, परंतु त्या व्यक्तीस ख्रिस्ती बनवात नाहीत. ख्रिस्ती अशी व्यक्ती आहे जिने येशू ख्रिस्तावर एकमेव तारणारा म्हणून पूर्णपणे विश्वास ठेवला आहे आणि म्हणून त्यास पवित्र आत्मा मिळाला आहे (योहान 3:16; प्रेषितांची कृत्ये 16:31; इफिस 2:8-9).

तर, ही व्याख्या लक्षात घेता, ख्रिस्ती व्यक्ती आपले तारण गमावू शकेल काय? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित उत्तर देण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे तारणाच्या वेळी ते घडते असे बायबलमध्ये म्हटले आहे त्याचे परीक्षण करणे आणि तारण गमाविणे म्हणजे काय याचा अभ्यास करणे:

ख्रिस्ती ही एक नवीन उत्पत्ती आहे. “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे!” (2 करिंथ 5:17). ख्रिस्ती ही एखाद्या व्यक्तीची केवळ “सुधारित” आवृत्ती नसते; ख्रिस्ती संपूर्णपणे नवीन उत्पत्ती आहे. तो “ख्रिस्तामध्ये” आहे. ख्रिस्ती व्यक्तीला तारण गमावण्याकरता, नवीन उत्पत्ती नाश करावी लागेल.

ख्रिस्ती व्यक्ती मुक्तता प्राप्त आहे. “कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.” (1 पेत्र 1:18-19). सुटका पावलेला हा शब्द खरेदी केल्या जाण्याचा, किंमत देण्याचा उल्लेख करतो. आम्हास ख्रिस्ताच्या मुक्तीची किंमत देऊन विकत घेतले गेले. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने आपले तारण गमावावे यासाठी स्वतः देवाला त्या व्यक्तीची त्याने स्वतः केलेली खरेदी रद्द करावी लागेल ज्यासाठी ख्रिस्ताने आपल्या बहुमूल्य रक्ताची किंमत दिली.

ख्रिस्ती विश्वासणारा नीतिमान ठरला आहे. “ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे” (रोम 5:1). नीतिमान ठरविणे म्हणजे नीतिमान घोषित करणे. येशूला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्या सर्वजणांस देव “नीतिमान” घोषित करतो. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने तारण गमाववो म्हणून, देवाला आपले वचन परत घ्यावे लागेल आणि त्याने यापूर्वी जे जाहीर केले होते त्यास “रद्द” करावे लागेल. अपराधीपणापासून मुक्त झालेल्यांवर पुन्हा खटला भरावा लागेल आणि व त्यांस दोषी आढळावे लागेल. ईश्वरीय खंडपीठाने दिलेली शिक्षा देवास उलट करावी लागेल.

ख्रिस्ती व्यक्तीला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देण्यात आले आहे. “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान 3:16). सार्वकालिक जीवन म्हणजे देवाबरोबर स्वर्गात अनंतकाळचे जीवन जगण्याचे अभिवचन. देव वचन देतो, “विश्वास ठेवा आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल.” ख्रिस्ती व्यक्तीने तारण गमावण्यासाठी, सार्वकालिक जीवनाची नव्याने व्याख्या करावी लागेल. ख्रिस्ती व्यक्तीला सदाकाळ जगण्याचे अभिवचन दिलेले आहे. सार्वकालिक म्हणजे “शाश्वत” नाही का?

ख्रिस्ती व्यक्तीस देवाने चिन्ह दिले आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याला शिक्का मारण्यात आला आहे. “तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे” (इफिस 1:13,14). ख्रिस्ती व्यक्तीस विश्वासाच्या क्षणी देवाने चिन्हांकित केले आहे आणि आत्म्याने शिक्का मारला आहे, जो स्वर्गीय वारशाची हमी देण्यासाठी ठेव म्हणून काम करील असे वचन देण्यात आले होते. अंतिम परिणाम म्हणजे देवाच्या गौरवाची स्तुती होते. ख्रिस्ती व्यक्तीने तारण गमावण्यासाठी, देवाला चिन्ह पुसून टाकावे लागेल, आत्मा काढून घ्यावा लागेल, ठेव रद्द करावी लागेल, त्याने दिलेले अभिवचन रद्द करावे लागेल, हमी मागे घ्यावी लागेल, वारसा ठेवावा लागेल, स्तुती सोडावी लागेल, आणि त्याचे गौरव कमी करावे लागेल.

ख्रिस्ती व्यक्तीस गौरवाची हमी देण्यात आली आहे. “ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवलेय आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला” (8:30). रोम 5:1 नुसार, विश्वासाच्या क्षणी आपल्याला नीतिमत्व प्राप्त होते. रोम 8:30 नुसार, गौरव नीतिमत्वासोबत येतो. ज्यांना देव नीतिमान ठरवितो त्या सर्वांचे गौरव करण्याचे त्याने अभिवचन दिले आहे. जेव्हा ख्रिस्ती विश्वासणारे स्वर्गात परिपूर्ण पुनरुत्थित शरीर प्राप्त करतील तेव्हा हे वचन पूर्ण होईल. जर ख्रिस्ती व्यक्ती तारण गमावू शकत असेल तर रोम 8:30 हे वचन चुकत आहे, कारण ज्यांना तो आधीच ठरवितो, पाचारण करतो आणि नीतिमान ठरवितो करतो, त्यांस देव गौरवाचे आश्वासन देऊ शकत नाही. ख्रिस्ती व्यक्ती तारण गमावू शकत नाही. जर तारण गमावणे शक्य असल्यास बायबलमध्ये जे म्हटले आहे त्यापैकी बहुतेक गोष्टी ज्या आपणास ख्रिस्तास ग्रहण करतांना प्राप्त होतात त्या अवैध ठरतील. तारण ही देवाची देणगी आहे आणि देवाला आपल्या देणग्यांचा “अनुताप” होत नाही (रोम 11:29). ख्रिस्ती व्यक्तीस नव्याने उत्पन्न करता येऊ शकत नाही. सोडविण्यात आलेल्या लोकांची खरेदी रद्द केली जाऊ शकत नाही. सार्वकालिक जीवन तात्पुरते असू शकत नाही. देव त्याच्या वचनात नवीन बदल करू शकत नाही. पवित्र शास्त्र सांगते की देव खोटे बोलू शकत नाही (तीत 1:2).

ख्रिस्ती तारण गमावू शकत नाही या विश्वासावर दोन सामान्य आक्षेपांचा संबंध या अनुभवात्मक मुद्द्यांविषयी आहे: 1) पापमय, पश्चात्ताप न करता जीवन जगणाऱ्या ख्रिस्ती लोकांचे काय? 2) त्या ख्रिस्ती लोकांचे काय जे विश्वासाचा नाकार करतात आणि ख्रिस्ताला नाकारतात? या आक्षेपांविषयी समस्या हा समज आहे की जो स्वतःला खिस्ती म्हणतो तो प्रत्येकजण प्रत्यक्षात नव्याने जन्मला आहे. बायबल घोषित करते की खरा ख्रिस्ती सतत, पश्चात्ताप न करता पाप करीत राहणार नाही (1 योहान 3:9). बायबल असेही सांगते की जो कोणी विश्वास सोडतो तो हे दाखवून देतो की तो कधीही खरोखर ख्रिस्ती नव्हता (1 योहान 2:19). तो धार्मिक असू शकतो, त्याने कदाचित चांगला देखावा केला असावा, परंतु देवाच्यासामर्थ्याने त्याचा नव्याने जन्म झाला नाही. “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल” (मत्तय 7:16). देवाची मुक्तता पावलेली व्यक्ती “मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे.जो मेलेल्यांतून उठविला गेला यासाठी की आपण देवासाठी फळ देऊ.” (रोम 7:4).

कोणतीही गोष्ट देवाच्या मुलास पित्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही (रोम 8:38-39). देवाच्या हातून ख्रिस्ती व्यक्तीस काहीही दूर करू शकत नाही (योहान 10:28-29) देव सार्वकालिक जीवनाची हमी देतो आणि त्याने आपल्याला दिलेले तारण राखून ठेवतो. उत्तम मेंढपाळ हरवलेल्या मेंढराचा शोध घेतो आणि “ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो; आणि घरी येऊन मित्रांना व शेजाÚयांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’” (लूक15:5-6). कोकरू सापडले आणि मेंढपाळ आनंदाने त्याला खांद्यावर घेतो; हरवलेल्याला सुखरुप घरी परत आणण्याची जबाबदारी आमचा प्रभु घेतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्ती तारण गमावू शकतो का?
© Copyright Got Questions Ministries