settings icon
share icon
प्रश्नः

एखाद्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने विमा प्राप्त करावा का?

उत्तरः


विमा मिळवावा की नाही या प्रश्नावर ख्रिश्चन कधीकधी संघर्ष करतात -विमाधारक ख्रिस्ती विश्वासाचा अभाव दर्शवतो का? हा एक निरोगी संघर्ष आहे, आणि विश्वासणाऱ्यांनी पवित्र शास्त्राचे परीक्षण करणे आणि ते पवित्र शास्त्रासंबंधी बचाव करू शकतात असे उत्तर देणे आवश्यक आहे.

प्रथम, आपण या गोष्टीविषयी सहमत होऊया की पवित्र शास्त्रात ख्रिस्ती लोकांसाठी विम्याचा विशेष उल्लेख केला नाही. जर देवाच्या वचनामध्ये एखाद्या गोष्टीचा विशेष उल्लेख केला नसेल, तर आपणाला सर्व शास्त्राच्या शिकवणीतून तत्त्वे काढली पाहिजेत. भिन्न विश्वासणारे वेगवेगळ्या वैयक्तिक विश्वासांमध्ये पडू शकतात, आणि ते ठीक आहे. रोमकरांस पत्र 14 म्हणते की अशा परिस्थिती इतरांच्या विश्वासांचा आदर करण्याची मागणी करतात. विश्वास ठेवणाऱ्यांवर स्वतःचे मन तयार करण्याची जबाबदारी असते (रोम 14:5). वचन 23 म्हणते की आपण जे काही ठरवतो ते विश्वासावर आधारित असावे. एका ख्रिस्ती व्यक्तीचा विमा प्राप्त करणे ही दृढनिश्चयाची बाब आहे; विमा असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला वैयक्तिकरित्या खात्री असणे आवश्यक आहे की देवाला वाटते कि त्याचा विमा असावा, आणि अन्यथा विमा नसलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला वैयक्तिकरित्या खात्री पटली पाहिजे.

आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येथे काही पवित्र शास्त्रासंबंधी तत्त्वे दिली आहेत: आम्हाला आमच्या वरील अधिकाऱ्यांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे, जेव्हा आम्हाला कायद्याद्वारे विमा असणे आवश्यक असते, जसे की मोटारगाडीचे उत्तरदायित्व, तेव्हा आपण त्याचे पालन केले पाहिजे. तसेच आपल्याला आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी लागेल. अशाप्रकारे, ख्रिस्ती लोकांना त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यातील फायद्यासाठी योजना आखली पाहिजे आणि विमा असणे हा त्याचा एक भाग असू शकतो. पुढील नियोजनामध्ये कुटुंबातील सदस्याच्या अनपेक्षित लवकर मृत्यूची तयारी करणे देखील समाविष्ट असू शकते. जीवन विमाला काहीं लोकांद्वारे विश्वास किंवा पैशाच्या प्रेमाची कमतरता, किंवा विवेकी नियोजन आणि इतरांद्वारे पैशाचे सुज्ञ व्यवस्थापन म्हणून पाहिले जाऊ शकते. या क्षेत्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अटी आणि विश्वास भिन्न असू शकतात. देव नक्कीच पुढचे नियोजन करण्याचा सल्ला देतो. योसेफची कथा आणि त्याच्या बुद्धिमान योजनेने केवळ मिसरी राष्ट्रच नव्हे तर इस्राएलचे लोक आणि ख्रिस्ताचा वंशसुद्धा वाचवला (उत्पत्ति 41).

मुख्य गोष्ट अशी आहे की आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याला हाक मारली पाहिजे, विचारले पाहिजे की तो या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपल्याला काय करायला सांगेल. देव आपल्याला ज्ञान देऊ इच्छितो (याकोब 1:5). इब्री 11:6 म्हणते की विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करणे अशक्य आहे. हा खरा प्रश्न आहे: “हे माझ्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करेल का?” विचार करण्यासाठी आणखी एक वचन याकोब 4:17 आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर आपल्याला चांगले करण्याची संधी मिळाली तर आपण केलेच पाहिजे, अन्यथा आपण पाप करतो. या समस्येला संबोधित करणारे आणखी एक वचन 1 तीमथ्य 5:8 आहे, जे म्हणते की, जर आपल्याला इतरांची सेवा करायची असेल तर आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. एक ख्रिस्ती विश्वासू विमाला हे ध्येय साध्य करण्यासाठी एका साधनाच्या रुपात पाहू शकतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

एखाद्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने विमा प्राप्त करावा का?
© Copyright Got Questions Ministries