settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती विश्वासणारा आज भुते काढू शकतो का?

उत्तरः


शुभवर्तमानातील आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकातील अनेक लोक भुते काढीत असत (इतर लोकांना सोडून जाण्याची भूतांना आज्ञा देणे) - शिष्य ख्रिस्ताच्या आज्ञांचा एक भाग म्हणून (मत्तय 10); आणि इतर ख्रिस्ताच्या नावाचा उपयोग करून (मार्क 9:38); परुश्यांची मुले (लूक 11:18-19); पौल (प्रेषितांची कृत्ये 16); आणि काही भुते काढणारे (प्रेषितांची कृत्ये 19:11-16).

असे दिसून येते की येशूच्या शिष्यांनी भुते काढण्याचा हेतू ख्रिस्ताचे दुरात्म्यांवर प्रभुत्व दाखविणे (लूक 10:17) आणि शिष्य त्याच्या नावाने व त्याच्या अधिकाराद्वारे कार्य करीत आहेत हे सत्यापित करणे हा होता. यामुळे त्यांचा विश्वास किंवा विश्वासाची कमतरता देखील प्रकट झाली (मत्तय 17:14-21). हे स्पष्ट होते की भुते काढण्याची ही कृती शिष्यांच्या सेवाकार्यासाठी महत्त्वपूर्ण होती. तथापि, शिष्यत्वाच्या प्रक्रियेत भुते काढण्याचा प्रत्यक्षात काय भाग होता हे अस्पष्ट आहे.

विशेष म्हणजे, दुरात्म्यांशी युद्धाच्या संदर्भात नवीन कराराच्या उत्तरार्धात बदल झालेला दिसतो. नवीन कराराच्या शिकवणींचे भाग (रोमकरांस पत्र ते यहूदाचे पत्र) दुरात्म्यांच्या कार्‍याचा उल्लेख करतात, परंतु त्यांना काढून टाकण्याच्या क्रियांची चर्चा करीत नाहीत, आणि विश्वासणार्‍याना असे करण्यास उद्युक्तही केले जात नाही. आम्हाला त्यांच्याविरुद्ध उभे ठाकण्यासाठी उरस्त्राण घालायला सांगितले आहे (इफिस 6:10-18). आम्हाला सैतानाचा प्रतिकार करण्यास सांगितले आहे (याकोब 4:7), त्याच्या बाबतीत सावध राहावयास सांगितले आहे (1 पेत्र 5:8), आणि त्याला आपल्या जीवनात जागा न देण्याविषयी सांगितले आहे (इफिस 4:27). तथापि, त्याला किंवा त्याच्या दुरात्म्यांना इतरांमधून कसे घालवायचे हे आम्हाला सांगण्यात आले नाही, किंवा आपण तसे करण्याचा विचारदेखील केला पाहिजे हे आपल्याला सांगितलेले नाही.

त्यानंतर आम्ही, पुन्हा देवाच्या कृपेने, अनीतिमान सवयी सोडून ईश्वरभक्तीच्या सवयी परिधान करतो (4:17-24)े. यात भुते काढणे समाविष्ट नाही, परंतु आपल्या मनाचे नूतनीकरण करणे समाविष्ट आहे (4:23). देवाची मुले या नात्याने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन कसे करावे यासंबंधी अनेक व्यावहारिक सूचनांनंतर, आपल्याला आठवण करून दिली जाते की एक आत्मिक युद्ध आहे. हे एका विशिष्ट उरस्त्राणाच्या मदतीने लढले जातेे जे आपल्याला दुरात्म्यांच्या जगाच्या युक्तीविरुद्ध उभे राहण्याची - त्यांस काढण्याची नाही - संधी देते (6:10). आम्ही सत्य, नीतिमत्त्व, सुवार्ता, विश्वास, तारण, देवाचे वचन आणि प्रार्थना घेऊन उभे राहतो (6:10-18).

असे दिसते की जेव्हा देवाचे वचन पूर्ण झाले तेव्हा आत्मिक जगाशी लढण्यासाठी ख्रिस्ती व्यक्तीजवळ प्रारंभिक ख्रिस्ती लोकांपेक्षा जास्त शस्त्रे प्राप्त झाली. बहुतांशी, भुते काढण्याची जागा सुवार्ताप्रसार आणि देवाच्या वचनाद्वारे शिष्यत्वाने घेतली गेली. नवीन कराराच्या आत्मिक युद्धाच्या पद्धतींमध्ये भुते काढणे समाविष्ट नाही, असे कसे करावे याविषयी निश्चित निर्देश मांडणेे कठीण आहे. जर आवश्यक असेल तर, असे दिसते की एखाद्या व्यक्तीला देवाच्या वचनाचे सत्य आणि येशू ख्रिस्ताचे नाव प्रगट करण्याद्वारे हे होते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती विश्वासणारा आज भुते काढू शकतो का?
© Copyright Got Questions Ministries