settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती नैतिकता अर्थात ख्रिस्टीअन एथीक्स म्हणजे काय?

उत्तरः


कलस्सैकरांस पत्र 3:1-6 मध्ये ख्रिस्ती नैतिकतेला चांगल्या प्रकारे सरांशीत केले आहे: “म्हणून, तुम्ही ख्रीस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रीस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. जेंव्हा ख्रिस्त, जो तुमचे जीवन आहे प्रगट केला जाईल, तेंव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे स्वभाव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो.”

“काय करावे” आणि “काय करू नये” या सूचीव्यतिरिक्त पवित्र शास्त्र आपल्याला कसे जगावे याबद्दल विस्तृतमध्ये सूचना देते. ख्रिस्ती जीवन कसे जगावे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला केवळ पवित्र शास्त्च गरजेचे आहे. तथापि, आपल्या जीवनात आपण ज्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करतो त्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही. तर मग आपण सामना करत असलेल्या सर्व नैतिक पेचप्रसंगांसाठी हे कसे पूरक आहे? येथे मग ख्रिस्ती नैतिकता अर्थात ख्रिस्टीअन एथीक्स उपयोगाला येते.

विज्ञान नीतिशास्त्राची “नैतिक मुल्यांचा संच, नैतिकतेचा अभ्यास” अशी व्याख्या करते. म्हणून ख्रिस्ती नैतिकता हे ख्रिस्ती विश्वास ज्याद्वारे आपण कार्य करतो त्याच्याद्वारे साध्य केलेली मुल्ये असली पाहिजेत. जरी देवाचे वचन आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीबद्दल स्पष्टपणे माहिती देत नाही, तरी त्याची मुल्ये आपल्याला अशी मानके देतात त्याद्वारे आपण अशा परिस्थितीत कसे वागले पाहिजे जिथे कोणतेही स्पष्ट निर्देश नसतात हे कळते.

उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र अवैध औषधांच्या वापराबद्दल स्पष्टपणे काहीही सांगत नाही, तरीही वचनांमधून शिकलेल्या मूल्यांच्या आधारे, आपल्याला हे माहित आहे की हे चुकीचे आहे. एक गोष्ट म्हणजे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि त्याद्वारे आपण देवाचे गौरव केले पहिजे (1 करिंथकरांस पत्र 6:19-20). मादक पदार्थ आपल्या शरीरावर काय परिणाम करतात हे माहित असूनसुद्धा—ते आपल्या वेगवेगळ्या अवयवांना नुकसान पोहोचवतात—आपल्याला माहित आहे की त्यांचा वापर करून आपण पवित्र आत्म्याच्या मंदिराचा नाश करतो. हे निश्चितच देवाला गौरवणारे नाही. पवित्रशास्त्र आपल्याला हे सुद्धा सांगते की देवाने नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या अधीन आपण राहिले पाहिजे (रोमकरांस पत्र 13:1). अवैध प्रकारची औषधे देऊन, त्यांचा वापर करून आपण अधिकाऱ्यांच्या अधीन नाही तर त्यांच्याविरुद्ध बंड करतो. याचा अर्थ असा आहे का की अवैध औषधांना वैध केल्यानंतर त्यांचा वापर योग्य आहे? पहिल्या मूल्याचे उल्लंघन केल्याशिवास हे शक्य नाही

शास्त्रवचनातील मुल्यांचा वापर करून, ख्रिस्ती लोक कोणत्याही परिस्थितीसाठी नैतिक मार्ग ठरवू शकतात. काही प्रकरणात हे सोपे असू शकते, जसे की ख्रिस्ती जीवनाबद्दलचे नियम कलस्सैकरांस पत्राच्या 3 ऱ्या अधिकारात आपल्याला मिळतात. इतर प्रकरणात आपल्याला थोडे अधिक खोलवर जाण्याची गरज आहे. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे देवाच्या वचनांना घेऊन प्रार्थना करणे. पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये वास करतो आणि त्याच्या कार्याचा एक भाग म्हणजे कसे जगावे हे आपल्याला शिकवणे: “तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल.” (योहान 14:26). “तुम्हाविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हमध्ये राहतो, तेंव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक—तो सत्य आहे, खोटा नाही—तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा” (1 योहान 2:27). म्हणून, जेंव्हा आपण वचनांना घेऊन प्रार्थना करतो, तेंव्हा पवित्र आत्मा आपले मार्गदर्शन करतो आणि आपल्याला शिकवतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना तो आपल्याला दाखवेल.

जरी देवाचे वचन आपण सामना करत असलेल्या प्रत्येक परिस्थितीबद्दल सांगत नसले, तरीही ते ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी संपूर्ण पुरेसे आहे. बऱ्याच गोष्टींसाठी, आपण पवित्र शास्त्र काय सांगते हे पाहून त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करू शकतो. नैतिक प्रश्नांमध्ये जेथे शास्त्रवचन स्पष्ट सूचना देत नाहीत, त्यावेळी आपल्याला त्या परिस्थितीमध्ये लागू होणाऱ्या मुल्यांचा आधार घेतला पाहिजे. आपल्याला त्याच्या वचनांना घेऊन प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या आत्म्यासाठी स्वतःला मोकळे केले पाहिजे. आपण ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या तत्त्वांचा अंगीकार केला पाहिजे हे पवित्र शास्त्रातून शोधण्यास पवित्र आत्मा आपणाला शिकविल आणि आपले मार्गदर्शन करील.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती नैतिकता अर्थात ख्रिस्टीअन एथीक्स म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries