settings icon
share icon
प्रश्नः

तारण म्हणजे काय? तारणाचा ख्रिस्ती सिद्धांत काय आहे?

उत्तरः


तारण म्हणजे जोखिमेतून किंवा दुःखातून सुटका. तारणेे म्हणजे सोडविणे किंवा रक्षण करणे. या शब्दात विजय, आरोग्य किंवा संरक्षणाची कल्पना आहे. कधीकधी, बायबलमध्ये तारण पावलेले किंवा तारण या शब्दांचाऐहिक, शारीरिक सुटकेसाठी केला जातो, जसे पौलाचे तुरुंगातून सुटणे (फिलिप्पै 1:19).

बरेचदा, “तारण” हा शब्द सार्वकालिक, आत्मिक सुटकेविषयी आहे. जेव्हा पौलाने फिलिप्पियातील बंदिगृहाच्या अधिकार्याला हे सांगितले की त्याने तारण प्राप्त करण्यासाठी काय करावे, तेव्हा तो बंदिगृहाच्या अधिकार्याच्या सार्वकालिक भविष्याचा उल्लेख करीत होता (प्रेषितांची कृत्ये 16:30-31). येशूने तारण प्राप्त करण्याची बरोबरी देवाच्या राज्यात प्रवेश करण्याशी केली आहे (मत्तय 19:24-25).

आम्ही कशापासून तारण प्राप्त करतो? तारणाच्या खिस्ती शिकवणीत आपण “क्रोधापासून” वाचलो आहोत, म्हणजेच देवाच्या पापाच्या दंडापासून (रोम 5:9; 1 थेस्सल 5:9). आमच्या पापामुळे आपण देवापासून विभक्त झालो आहोत आणि पापाचा परिणाम मृत्यू आहे (रोम 6:23). बायबलमधील तारण पापाच्या परिणामापासून आपल्या सुटकेचा उल्लेख करते आणि म्हणूनच त्यात पाप दूर करण्याचा समावेश आहे.

तारण कोण करतो? केवळ देवच पाप काढून टाकू शकतो आणि पापांच्या दंडापासून आमची सुटका करू शकतो (2 तीमथ्य 1:9; तीत 3:5).

देव कसे वाचवतो? तारणाच्या ख्रिस्ती सिद्धांतानुसार, देवाने ख्रिस्ताद्वारे आमची सुटका केली आहे (योहान 3:17). विशेषतः, येशूचा वधस्तंभावर मृत्यू आणि त्यानंतरच्या पुनरुत्थानाने आम्हास तारण प्राप्त झाले (रोम 5:10; इफिस 1:7). पवित्र शास्त्र स्पष्ट सांगते की तारण म्हणजे देवाची कृपायुक्त देणगी आहे ज्यास आम्ही पात्र नाही (इफिस 2:5, 8) आणि फक्त येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे उपलब्ध आहे (प्रेषितांची कृत्ये 4:12).

आपणास तारण कसे प्राप्त होते? आम्ही विश्वासाने तारण प्राप्त केले आहे. प्रथम, आपण सुवार्ता ऐकली पाहिजे - येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थानाची चांगली बातमी (इफिस 1:3). मग, आपण विश्वास ठेवला पाहिजे - प्रभु येशूवर पूर्ण विश्वास ठेवावा (रोम 1:16). यात पश्चात्ताप, पापाविषयी आणि ख्रिस्ताविषयी मन बदलणे (प्रेषितांची कृत्ये 3:19) आणि प्रभूच्या नावाचा धावा करणे समाविष्ट आहे (रोम 10:9-10,13).

तारणाच्या ख्रिस्ती सिद्धांताची व्याख्या असेल “देवाच्या कृपेने, पापासाठी सार्वकालिक शिक्षेपासून सुटका जी त्यांना दिली जाते जे विश्वासाने पश्चात्ताप आणि प्रभु येशूवरील विश्वासाच्या देवाच्या अटींचा स्वीकार करतात.” तारण केवळ येशूमध्येच उपलब्ध आहे (योहान 14:6; प्रेषितांची कृत्ये 4:12) आणि तरतूद, हमी आणि सुरक्षिततेसाठी फक्त देवावरच अवलंबून आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

तारण म्हणजे काय? तारणाचा ख्रिस्ती सिद्धांत काय आहे?
© Copyright Got Questions Ministries