प्रश्नः
ख्रिस्ती व्यक्ती श्रापित होऊ शकतो का? देव विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर श्राप देऊ देईल का?
उत्तरः
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की “भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही” (नीतिसूत्रे 26:2 ब). याचा अर्थ असा की मूर्ख शापांचा काहीही परिणाम होत नाही. देव आपल्या मुलांना शाप देऊ देत नाही. देव सार्वभौम आहे. ज्याला देवाने आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आहे त्याला शाप देण्याची शक्ती कोणाकडे नाही. देव हा एकमेव आहे जो शिक्षा देऊ शकतो.
पवित्र शास्त्रामधील “मंत्र” चे नेहमीच नकारात्मक वर्णन केले जाते. अनुवाद 18:10-11 अशी संख्या सांगतात ज्यांनी “परमेश्वराला घृणास्पद” जसे की मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार (मृतांशी सल्लामसलत करणे) अशा इतर कृती करतात. मीका 5:12 म्हणते की देव चेतके आणि मांत्रिकांचा नाश करेल. प्रकटीकरण 18 जादूचे वर्णन फसवणूकीचा एक भाग म्हणून करते जे ख्रिस्तविरोधी आणि त्याच्या “मोठी बाबेल नगरी” (व. 21-24) द्वारे वापरले जाईल. शेवटच्या वेळेची फसवणूक इतकी मोठी असेल की देवाने आमचे रक्षण केले नाही तर निवडलेले लोकही फसतील (मत्तय 24:24), देव सैतान, ख्रिस्तविरोधी आणि त्यांचे अनुसरण करणाऱ्यांना पूर्णपणे नष्ट करेल (प्रकटीकरण अध्याय 19-20).
ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्तामध्ये नवीन व्यक्ती म्हणून पुन्हा जन्माला आले आहेत (2 करिंथ 5:17), आणि आम्ही पवित्र आत्म्याच्या सतत उपस्थितीत आहोत जो आपल्यामध्ये राहतो आणि ज्याच्या संरक्षणाखाली आपण अस्तित्वात आहोत (रोमन्स 8:11). आम्हाला कोणीही आमच्यावर कोणत्याही प्रकारचे मंत्र टाकण्याची चिंता करण्याची गरज नाही. जादुगार, जादूटोणा, मंत्र आणि शापांचा आपल्यावर कोणताही अधिकार नाही कारण ते सैतानाकडून आले आहेत आणि आम्हाला माहित आहे की “जो तुमच्यामध्ये आहे [ख्रिस्त] तो जगात असलेल्या [सैतान] पेक्षा मोठा आहे” (1 योहान 4:4). देवाने त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि आपण निर्भयपणे देवाची उपासना करण्यास मुक्त झालो आहोत (योहान 8:36). “परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?” (स्तोत्रसंहिता 27:1).
English
ख्रिस्ती व्यक्ती श्रापित होऊ शकतो का? देव विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर श्राप देऊ देईल का?