settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिश्चन क्रूसेड्स काय होते?

उत्तरः


क्रूसेड्सने ख्रिस्ती विश्वासाच्या विरोधात काही वारंवार वितर्क दिले आहेत. काही इस्लामिक दहशतवादी अगदी असा दावा करतात की त्यांचे दहशतवादी हल्ले ख्रिस्ती लोकांनी क्रूसेड्स जे केले त्याचा बदला आहे. तर, क्रुसेड्स काय होते आणि ख्रिस्ती विश्वासासाठी त्यांना इतकी मोठी समस्या म्हणून का पाहिले जाते?

सर्वप्रथम, क्रुसेडर्स “ख्रिश्चन क्रूसेड्स” म्हणून संबोधले जाऊ नये. क्रूसेड्समध्ये सामील झालेले बहुतेक लोक दावा केला गेला असला तरी खरोखर ख्रिस्ती नव्हते. ख्रिस्ताच्या नावाचा गैरवापर आणि अनेक क्रुसेडर्सच्या कृत्यांनी निंदा केली गेली. दुसरे म्हणजे, धर्मयुद्ध अंदाजे ई.स. 1095 ते 1230 पर्यंत झाले. शेकडो वर्षांपूर्वीच्या काही ख्रिस्ती मानण्यात येणाऱ्या लोकांची अपवित्र शास्तीय कृती आजही ख्रिस्ती लोकांच्या विरोधात धरल्या जाव्यात काय?

तिसरे, असे नाही की हे पुरेसे निमित्त आहे, परंतु ख्रिस्ती धर्म हा हिंसक भूतकाळ असलेला एकमेव धर्म नाही. खरं तर, क्रूसेड्स हे मुस्लिम आक्रमणास प्रतिसाद होते जे एकेकाळी मुख्यत्वे ख्रिस्ती लोकांनी व्यापलेले होते. अंदाजे ई. स. 200 ते 900 पर्यंत, इस्रायल, यार्देन, इजिप्त, सीरिया आणि तुर्की या भूमीवर प्रामुख्याने ख्रिस्ती लोकांची वस्ती होती. एकदा इस्लाम शक्तिशाली झाला, मुस्लिमांनी या भूमीवर आक्रमण केले आणि क्रूरपणे अत्याचार केले, गुलाम केले, हद्दपार केले आणि अगदी त्या देशांमध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांची हत्या केली. प्रतिसादात, रोमन कॅथोलिक चर्च आणि युरोपमधील “ख्रिस्ती” राजे/सम्राटांनी मुस्लिमांनी घेतलेली जमीन परत मिळवण्याचे आदेश दिले. अनेक नामधारी ख्रिस्ती लोकांनी क्रूसेड्समध्ये केलेल्या कृती अजूनही निंदनीय आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने जमीन जिंकणे, नागरिकांची हत्या करणे आणि शहरे नष्ट करणे यासाठी कोणतेही पवित्र शास्त्रसंबंधी औचित्य नाही. त्याच वेळी, इस्लाम हा एक धर्म नाही जो या प्रकरणांमध्ये निर्दोष स्थितीतून बोलू शकतो.

थोडक्यात, 11व्या शतकाच्या माध्यमातून 13व्या शतकाच्या मध्ये पूर्व प्रदेशात मुस्लिम लोकांकडून जिंकला गेलेल्या जमिनीवर हक्क गाजवण्याचा क्रूसेड्सचा प्रयत्न होता . क्रूसेड्स क्रूर आणि वाईट होते. बर्‍याच लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. जर त्यांनी नकार दिला तर त्यांना फाशी देण्यात आली. ख्रिस्ताच्या नावाने युद्ध आणि हिंसेद्वारे जमीन जिंकण्याची कल्पना पूर्णपणे अपवित्र शास्त्रीय आहे. क्रुसेड्समध्ये झालेल्या बर्‍याच कृती ख्रिती विश्वासासाठी असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे विरोधी होत्या.

जेव्हा क्रुसेड्सच्या परिणामी ख्रिस्ती विश्वासावर नास्तिक, अज्ञेयवादी, संशयवादी आणि इतर धर्माच्या लोकांनी हल्ला केला तेव्हा आपण कसा प्रतिसाद देऊ शकतो? आम्ही खालील मार्गांनी प्रतिसाद देऊ शकतो: 1) 900+ वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांच्या कृतींसाठी तुम्हाला जबाबदार धरायचे आहे का? 2) तुमच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकाच्या कृतींसाठी तुम्हाला जबाबदार धरण्याची इच्छा आहे का? क्रुसेड्ससाठी सर्व ख्रिस्ती धर्माला दोष देण्याचा प्रयत्न करणे सर्व मुस्लिमांना इस्लामिक दहशतवादासाठी दोष देण्यासारखे आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिश्चन क्रूसेड्स काय होते?
© Copyright Got Questions Ministries