settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती पुरातत्व - हे का महत्वाचे आहे?

उत्तरः


आर्केलॉजी अर्थात पुरातत्वशास्त्र दोन मिश्रित ग्रीक शब्दांपासून आले आहे - अर्क म्हणजे “प्राचीन” आणि लोगोस म्हणजे “ज्ञान”; अशा प्रकारे “प्राचीन बाबींचे ज्ञान किंवा अभ्यास”. एक पुरातत्त्ववेत्ता एखाद्या इंडियाना जोन्स-प्रकाराच्या व्यक्तीपेक्षा खूप जास्त आहे जो संग्रहालयात ठेवण्यासाठी जुन्या कलाकृती शोधत असतो. पुरातत्व हे एक शास्त्र आहे जे भूतकाळातील साहित्य पुनर्प्राप्त आणि दस्तऐवजीकरण करून प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करते. ख्रिस्ती पुरातत्व प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे ज्याने ख्रिस्ती आणि यहूदी धर्म आणि यहुदी आणि ख्रिस्ती संस्कृतींवर परिणाम केला आहे. ख्रिस्ती पुरातत्वशास्त्रज्ञ भूतकाळाबद्दल नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत एवढेच नाही तर ते भूतकाळाबद्दल आपल्याला आधीच माहित असलेल्या गोष्टी प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पवित्र शास्त्रालमधील लोकांच्या शिष्टाचार आणि चालीरीतींबद्दलची आपली समज वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पवित्र शास्त्रासंबंधी मजकूर आणि इतर लिखित नोंदी हे प्राचीन पवित्र शास्त्रासंबंधी लोकांच्या इतिहासाबद्दल माहितीचे सर्वात महत्वाचे भाग आहेत. पण केवळ या नोंदींनी अनेक अनुत्तरित प्रश्न सोडले आहेत. तिथेच ख्रिस्ती पुरातत्त्वशास्त्रज्ञ कामी येते. ते पवित्र शास्त्रासंबंधी कथन पुरवणारे आंशिक चित्र भरू शकतात. प्राचीन कचऱ्याचे ढिगारे आणि बेबंद शहरे उत्खनन केल्यामुळे आपणाला भूतकाळाचे संकेत मिळणारे कण आणि तुकडे मिळाले आहेत. ख्रिस्ती पुरातत्त्वशास्त्राचे ध्येय प्राचीन लोकांच्या भौतिक कलाकृतींद्वारे जुन्या आणि नवीन कराराच्या आवश्यक सत्यांची पडताळणी करणे हे आहे.

19 व्या शतकापर्यंत ख्रिस्ती पुरातत्व शास्त्रीय विषय बनले नाही. ख्रिस्ती पुरातत्त्वशास्त्राच्या इमारतीचा पाया जोहान जॉन, एडवर्ड रॉबिन्सन आणि सर फ्लिंडर्स पेट्री सारख्या पुरुषांनी घातला आहे. 20 व्या शतकात विल्यम एफ. अल्ब्राइट हे एक प्रमुख व्यक्ती बनले. पवित्र शास्त्रासंबंधी वर्णनांच्या उत्पत्ती आणि विश्वासार्हतेबद्दल समकालीन वादविवादांमध्ये ख्रिश्चन पुरातत्वशास्त्र अल्ब्राइटनेच ओढले. अल्ब्राइट आणि त्याच्या विद्यार्थ्यांनीच पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या ऐतिहासिक घटनांसाठी बरेच भौतिक पुरावे दिले. तथापि, आज असे दिसते आहे की पवित्र शास्त्राला खोटे ठरविणारे अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञ आज ते अचूक असल्याचे सिद्ध करणारे आहेत.

जगातून ख्रिस्ती धर्मावर नवीन हल्ले शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. डिस्कव्हरी चॅनेलवरील बर्‍याच कार्यक्रमांची आपल्याकडे उदाहरण आहे, जसे की “द डा विंची कोड” डॉक्युड्रामा. इतर देणग्या ख्रिस्ताच्या ऐतिहासिकतेशी संबंधित आहेत. जेम्स कॅमेरूनच्या एका कार्यक्रमामध्ये येशूची कबर आणि दफन पेटी सापडली आहे असा युक्तिवाद केला जातो. या “शोध” वरून असा निष्कर्ष काढला गेला की येशू मेलेल्यांतून उठला नाही. कार्यक्रम जे सांगण्यात अयशस्वी झाला ते म्हणजे हि पेटी अनेक वर्षांपूर्वी सापडली होती आणि ती ख्रिस्ताची दफन पेटी नसल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. हे ज्ञान ख्रिस्ती पुरातत्वशास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमातून प्राप्त झाले.प्राचीन काळातील जीवन आणि काळाबद्दल सर्वोत्तम भौतिक माहिती प्रदान करणारे हे पुरातत्व पुरावे आहेत. जेव्हा पुरातन स्थळांच्या उत्खननासाठी योग्य वैज्ञानिक पद्धती लागू केल्या जातात, तेव्हा अशी माहिती उदयास येते जी आपल्याला प्राचीन लोक आणि त्यांची संस्कृती आणि पवित्र शास्त्रासंबंधी मजकूर प्रमाणित करणारे पुरावे अधिक समजवून देते. या निष्कर्षांचे पद्धतशीर नोंद, त्यांना जगभरातील तज्ञांकडे पाठविणे ज्यामुळे आम्हाला पवित्र शास्त्राच्या काळातील लोकांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते. ख्रिस्ती पुरातत्व शास्त्र हे पवित्र शास्त्रासंबंधी कथा आणि येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा अधिक संपूर्ण बचाव सादर करण्यासाठी विद्वान वापरू शकणारे एक साधन आहे. बऱ्याचदा, आपला विश्वास इतरांना सांगताना आम्हाला विश्वास न ठेवणाऱ्यां लोकांकडून विचारले जाते की आम्हाला पावित्र शास्त्र सत्य आहे हे कसे माहीत आहे. पुष्कळ उत्तरांपैकी एक उत्तर हे आहे की, ख्रिस्ती पुरातत्वशास्त्रज्ञांच्या कार्याद्वारे पवित्र शास्त्रामधील अनेक तथ्ये सत्यापित केली गेली आहेत.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती पुरातत्व - हे का महत्वाचे आहे?
© Copyright Got Questions Ministries