settings icon
share icon
प्रश्नः

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने उदासीनता प्रतिबंधक किंवा इतर मानसिक आरोग्याची औषधे घ्यावीत का?

उत्तरः


भीतीचे हल्ले, मानसिक विकार, घृणा आणि नैराश्य लाखो लोकांना प्रभावित करतात. जरी वैद्यकीय तज्ञांचा असा विश्वास आहे की वरीलपैकी बरेच रोग एखाद्या व्यक्तीच्या मानवी मनात उद्भवतात, परंतु अशी काही वेळ असते जेव्हा रासायनिक असंतुलन कारणीभूत असते - किंवा काही वेळा जेव्हा मानवी मनात सुरू झालेल्या समस्येने रासायनिक असंतुलनास योगदान दिले आहे जे आता समस्या कायम ठेवते. तसे असल्यास, असंतुलनाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी अनेकदा औषधे लिहून दिली जातात, ज्यामुळे मानसिक आजाराच्या लक्षणांवर उपचार केले जातात. काय हे पाप आहे? नाही. देवाने मनुष्याला त्याच्या औषधाच्या ज्ञानात वाढ करण्यास अनुमती दिली आहे, ज्याचा देव नेहमीच उपचार प्रक्रियेत मदत करतो. काय बरे करण्यासाठी देवाला मानवनिर्मित औषधाची गरज आहे? नक्कीच नाही! परंतु देवाने वैद्यकशास्त्राच्या सरावाला प्रगती करण्यास परवानगी दिली आहे आणि त्याचा लाभ न घेण्याचे कोणतेही पवित्रशास्त्रासंबंधी कारण नाही.

तथापि, उपचाराच्या उद्देशाने औषध वापरणे आणि दैनंदिन जीवनासाठी औषधावर सतत अवलंबून राहणे यात एक सूक्ष्म रेख आहे. आपण देवाला महान वैद्य म्हणून ओळखले पाहिजे, आणि हे जाणून घेतले पाहिजे की फक्त खरोखर त्याच्याकडेच बरे करण्याची शक्ती आहे (योहान 4:14). आपण प्रथम आपल्या उपचारासाठी देवाकडे पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ, भीतीचे हल्ले बाबतीत, उपचारासाठी वापरली जाणारी औषधे फक्त त्या प्रमाणात वापरली जावीत ज्यामुळे ती पीडिताला भीतीचे मूळ कारण हाताळण्यास मदत करते. त्याचा वापर पीडिताला परत नियंत्रण देण्यासाठी केला पाहिजे. तथापि, बरेच रुग्ण त्यांच्या आजाराचे खरे कारण शोधण्यापासून वाचण्यासाठी औषधे घेतात; हे जबाबदारी नाकारणे, देवाच्या उपचारांना नकार देणे आणि शक्यतो इतरांना क्षमा करण्याचे स्वातंत्र्य नाकारणे किंवा आजारपणात योगदान देणारी भूतकाळातील कोणतीही माघील घटना बंद करणे असेल. मग ते पाप बनते, कारण ते स्वार्थावर आधारित आहे.

लक्षणांवर उपचार करण्यासाठी मर्यादित आधारावर औषधोपचार करून, नंतर देवाच्या वचनावर आणि एखाद्याच्या अंतःकरणात आणि मनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी शहाण्या सल्ल्यावर अवलंबून राहून, औषधांची गरज सहसा कमी होईल. [असे काही लोक आहेत ज्यांच्या शरीराला लक्षणांना दूर ठेवण्यासाठी दीर्घकाळ उदासीनता प्रतिबंधकचा वापर आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, काही इतर मानसिक विकार, जसे की द्विध्रुवीय विकार आणि स्किझोफ्रेनिया (ज्या रोगामध्ये विचार, भावना व कृती यांमध्ये फारकत पडत जाते असा मानसिक रोग), यांना दीर्घकालीन औषध वापरण्याची आवश्यकता असते, मधुमेहासाठी इन्सुलिन सारखे.] ख्रिस्तामध्ये विश्वासाणाऱ्यांची स्थितीची पुष्टी केली जाते आणि देव हृदय आणि मनाच्या त्या त्रासलेल्या भागात बरे करतो ज्यामुळे आजार होतात. उदाहरणार्थ, चिंतेला सामोरे जाताना, देवाच्या वचनाची भीती आणि विश्वासाणाऱ्यांच्या जीवनात त्याचे स्थान याबद्दल काय म्हणायचे आहे ते आपण पाहू शकतो. खालील शास्त्रवचनांचे वाचन आणि मनन करणे हा एक इलाज असू शकतो, कारण ते विश्वास देतात आणि देवाचे मूल होण्यासाठी आवश्यक असलेल्या सत्याला प्रकाशित करतात: नीतिसूत्रे 29:25; मत्तय 6:34; योहान 8:32; रोमकरांस पत्र 8:28-39; 12: 1-2; 1 करिंथ 10:13; 2 करिंथ 10:5; फिलिप्पै 4:4-9; कलस्सै 3:1-2; 2 तीमथ्य 1:6-8; इब्री 13:5-6; याकोब 1:2-4; 1 पेत्र 5:7; 2 पेत्र 1:3-4; 1 योहान 1:9; 4:18-19.

देव अलौकिक आणि चमत्कारिकरीत्या बरे करू शकतो. यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. देव औषध आणि डॉक्टरांद्वारे बरे करतो. आपणही यासाठी प्रार्थना केली पाहिजे. देवाने जरी कोणतीही दिशा घेतली, आपला अंतिम विश्वास फक्त त्याच्यावर असावा (मत्तय 9:22).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने उदासीनता प्रतिबंधक किंवा इतर मानसिक आरोग्याची औषधे घ्यावीत का?
© Copyright Got Questions Ministries