settings icon
share icon
प्रश्नः

मी प्रकटीकरणाचे पुस्तक कसे समजू शकतो?

उत्तरः


बायबलच्या स्पष्टीकरणाची गुरुकिल्ली, विशेषेकरून प्रकटीकरणाच्या पुस्तकासाठी, सतत व्याख्या करणे आवश्यक आहे. हर्मेन्यूटिक्स किंवा व्याख्याशास्त्र म्हणजे व्याख्येच्या तत्त्वांचा अभ्यास. दुसर्‍या शब्दांत, या पद्धतीने आपण शास्त्राचा अर्थ लावता. पवित्र शास्त्राचे सामान्य व्याख्याशास्त्र किंवा सामान्य अर्थबोधाचा असा अर्थ आहे की जोपर्यंत वचन किंवा परिच्छेद स्पष्टपणे हे सूचित करीत नाही की लेखकाने लाक्षणिक भाषा वापरलेली नाही तोपर्यंत त्याला सामान्य अर्थानुसार समजले पाहिजे. जर वाक्याच्या सामान्य अर्थ होत असेल तर आपण इतर अर्थ शोधण्याची गरज नाही. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली लेखक जेव्हा त्या शब्दांचा किंवा वाक्यप्रचारांचा जसाच्या तसा अर्थ समजावा असा हेतू ठेवीत असेल तर शब्द किंवा वाक्यांशांचे असे अर्थ सांगून शास्त्रवचनाचे आध्यात्मिकरण करण्याची गरज नाही.

एक उदाहरण प्रकटीकरण 20 आहे. अनेक लोक हजार वर्षांच्या कालावधीतील संदर्भांना वेगवेगळे अर्थ लावतील. तरीही, या भाषेचा अर्थ असा मुळीच नाही की एक हजार वर्षांच्या संदर्भांचा अर्थ हजारो वर्षांच्या शाब्दिक समयापेक्षा वेगळा लावावा.

प्रकटीकरणाच्या पुस्तकाची एक सोपी रूपरेषा प्रकटीकरण 1:19 मध्ये आढळते. पहिल्या अध्यायात, पुनरूत्थित आणि गौरवीत ख्रिस्त योहानाशी बोलत आहे. ख्रिस्त योहानाला म्हणतो, “म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.” योहानाने आधी पाहिलेल्या गोष्टी अध्याय 1 मध्ये नोंदल्या गेल्या आहेत. “जे आहे” (ज्या योहानाच्या दिवसात होत्या) त्या अध्याय 2-3 (मंडळ्यांस लिहिलेली पत्रे) मध्ये नोंद आहेत. “जे होणार ते” (भविष्यातील गोष्टी) अध्याय 4-२२ मध्ये नोंदवलेल्या आहेत.

सर्वसाधारणपणे सांगायचे तर, प्रकटीकरणाचे अध्याय 4-18 पृथ्वीवरील लोकांवर देवाच्या न्यायनिवाड्याचे वर्णन करतात. हा न्यायनिवाडा चर्चसाठी नाही (1 थेस्सल 5:2,9). न्याय सुरू होण्याआधी, मंडळीचे उचलले जाणे किंवा रॅप्चर (1 थेस्सल 4:13-18; 1 करिंथ 15:51-52) नावाच्या घटनेद्वारे मंडळीला पृथ्वीवरून काढून टाकले जाईल. अध्याय 4-18 मध्ये “याकोबाच्या संकटाचा काळाचे” - इस्राएलसाठी त्रासदायक समयाचे (यिर्मया 30:7; दानीएल 9:12, 12:1) वर्णन केले आहे. अशी वेळही आहे जेव्हा देव अविश्वासणार्यांचा त्याच्याविरुद्ध बंड केल्याबद्दल न्याय करील.

19 व्या अध्यायात ख्रिस्ताची वधू, चर्चसह ख्रिस्ताच्या परत येण्याचे वर्णन केले आहे. तो श्वापदाचा व खोट्या संदेष्ट्याचा पराभव करतो आणि त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकतो. 20 व्या अध्यायात, ख्रिस्ताने सैतानाला बांधले आणि अधोलोकात टाकले. मग ख्रिस्त पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करेल जे 1000 वर्ष टिकेल. 1000 वर्षांच्या शेवटी, सैतानाला सोडण्यात येते आणि तो देवाविरूद्ध बंडखोरी करतो. त्याला लगेच पराभूत करण्यात येते आणि त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येते. मग शेवटचा निवाडा होतो, जेव्हा सर्व अविश्वासू लोकांचा न्याय होईल आणि त्यांनाही अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल.

अध्याय 21 आणि 22 मध्ये सार्वकालिक स्थिती म्हणून उल्लेख केलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे. या अध्यायांमध्ये देव आपल्याला त्याच्याबरोबर अनंतकाळ कसा असेल ते सांगतो. प्रकटीकरणाचे पुस्तक समजण्यासारखे आहे. जर त्याचा अर्थ पूर्णपणे रहस्यमय असता तर देवाने ते आपल्याला दिले नसते. प्रकटीकरणाचे पुस्तक समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे त्याचा शक्य तितक्या शब्दशः अर्थ लावणे - त्याचा अर्थ जो आहे ते हे पुस्तक सांगते आणि जे ते सांगते तोच त्याचा अर्थ आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी प्रकटीकरणाचे पुस्तक कसे समजू शकतो?
© Copyright Got Questions Ministries