प्रश्नः
बायबलनुसार विभक्तता म्हणजे काय?
उत्तरः
बायबलनुसार विभक्तता ही मान्यता आहे की परमेश्वराने विश्वासणार्यास जगातून बाहेर बोलाविले आहे आणि पापमय संस्कृतीमध्ये व्यक्तिगत आणि सामुहिक शुद्धतेसाठी पाचारण केले आहे. बायबलनुसार विभक्ततेचा दोन क्षेत्रात विचार केला जातो: व्यक्तिगत आणि सामुहिक शुद्धता.
व्यक्तिगत विभक्ततेमध्ये व्यवहाराचा धार्मिकतापूर्ण मानकाप्रत व्यक्तिगत समर्पणाचा समावेश होतो. दानीएल व्यक्तिगत विभक्ततेचे पालन करीत असे जेव्हा त्याने ”राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला“ (दानीएल 1:8). त्याने स्वतःस बायबलनुसार अलिप्त केले होते कारण त्याचा आदर्श मोशेच्या नियमशास्त्रातील परमेश्वराच्या प्रकटीकरणावर आधारित होता.
व्यक्तिगत विभक्तीकरणाचे आधुनिक उदाहरण म्हणजे अशा जेवणावळीचे निमंत्रण नाकारण्याचा निर्णय घेणे जेथे मद्य दिले जाते. अशा निर्णय मोहास बळी पडण्यापासून वाचण्यासाठी केला जातो (रोम. 13:14), “वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर” राहणे (1 थिस्सल. 5:22), किंवा आपल्या वैय्यक्तिक विश्वासानुसार वागणे (रोम. 14:5).
बायबल स्पष्टपणे शिकवते की परमेश्वराच्या लोकांनी जगापासून अलिप्त राहिले पाहिजे. “देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा तुम्ही विश्वास न ठेवणार्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? ‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’ म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो” (2 करिंथ. 6:14-17; तसेच 1 पेत्र 1:14-16 पाहा).
मंडळीच्या विभक्ततेत इतर संस्थांशी त्यांच्या ईश्वरविज्ञानांवर किंवा चालीरितींवर आधारित असलेल्या तिच्या संबंधापासून वेगळे होण्याचा मंडळीचा निर्णय समाविष्ट आहे, “चर्च” किंवा “मंडळी” या शब्दांतच वेगळेपणा किंवा अलिप्तता सूचित होते, हा शब्द इक्लेसिया या ग्रीक शब्दावरून आला आहे ज्याच्या अर्थ आहे “बाहेर बोलाविण्यात आलेली मंडळी.“ पर्गम येथील मंडळीस लिहिलेल्या येशूच्या पत्रात, त्याने खोटे सिद्धांत शिकविणार्यास सहन न करण्याविरूद्ध ताकीद दिली आहे (प्रकटी. 2:14-15). मंडळीस अलिप्त राहावयाचे आहे, खोट्या शिकवणींशी संबंध तोडावयाचा आहे. मंडळीच्या विभक्ततेचे आधुनिक उदाहरण धर्मत्यागाशी मंडळी जोडणार्या मंडळयîच्या सार्वत्रिक युतीविरूद्ध मंडळीचे पाऊल उचलणे होय.
बायबलनुसार विभक्ततेसाठी हे जरूरी नाही की ख्रिस्ती विश्वासणार्यानी अविश्वासणार्याशी कुठलाही संबंध ठेवता कामा नये. येशूप्रमाणे, आपण पापात सहभागी न होता पापी लोकांशी मैत्री केली पाहिजे (लूक 7:34). पौल विभक्ततेचा एक समतोल दृष्टीकोन व्यक्त करतो : “तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते; तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही, कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल” (1 करिंथ. 5:9-10). दुसर्या शब्दात, आपण या जगात आहोत, पण या जगाचे नाही.
आम्ही जगाला आपला प्रकाश कमी करण्याची संधी न देता जगाचा प्रकाश बनले पाहिजे. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा” (मत्तय 5:14-16).
English
बायबलनुसार विभक्तता म्हणजे काय?