settings icon
share icon
प्रश्नः

चिंता याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

उत्तरः


पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवते की ख्रिस्ती लोकांनी काळजी करू नये. फिलिप्पैकरांस पत्र 4: 6 मध्ये आम्हाला अशी आज्ञा देण्यात आली आहे कि, “कशाविषयीही चिंताक्रांत (काळजी करू नका) होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” या शास्त्रवचनामध्ये, आपण शिकतो की आपण आपल्या सर्व गरजा आणि चिंता त्यांच्याविषयी काळजी करण्यापेक्षा देवाकडे प्रार्थनेमध्ये आणणे आवश्यक आहे. कपडे आणि अन्न यासारख्या आपल्या शारीरिक गरजांची चिंता न करण्याचे येशू आपल्याला प्रोत्साहन देतो. येशू आपल्याला आश्वासन देतो की आपला स्वर्गीय पिता आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल (मत्तय 6:25-34). त्यामुळे आम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.

चिंता करणे हा विश्वासी लोकांच्या जीवनाचा भाग नसावा, म्हणून एखाद्याने चिंतावर मात कशी करावी? 1 पेत्र 5:7 मध्ये, “त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो” असे निर्देश दिले आहेत. आपण समस्यांचे आणि ओझ्याचे ओझे उचलू नये अशी देवाची इच्छा आहे. या वचनामध्ये, देव आपल्या सर्व चिंता आणि काळजी त्याला देण्यास सांगत आहे. देवाला आपल्या समस्या का घ्यायच्या आहेत? त्याला आपली काळजी आहे म्हणून पवित्र शास्त्र असे सांगत आहे. आपल्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाला काळजी असते. त्याच्या लक्ष देण्यासाठी कोणतीही चिंता खूप मोठी किंवा खूप लहान नाही. जेव्हा आपण देवाला आपल्या समस्या देतो तेव्हा तो आपल्याला शांती देण्याचे वचन देतो जे सर्व समजुतीच्या पलीकडे आहे (फिलिप्पै 4:7).

अर्थात, ज्यांना तारणहार माहीत नाही, त्यांच्यासाठी चिंता आणि काळजी हे जीवनाचा एक भाग असेल. पण ज्यांनी त्याला आपले जीवन दिले आहे, त्यांना येशूने वचन दिले आहे कि, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय 11:28-30).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

चिंता याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries