settings icon
share icon
प्रश्नः

पवित्रशास्त्र धीराबद्दल काय म्हणते?

उत्तरः


जेव्हा सर्व काही आपल्या मार्गाने चालत असते, तेव्हा धीर दाखवणे सोपे असते. धीराची खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा आपल्या हक्कांचे उल्लंघन केले जाते - जेव्हा दुसरी कार आम्हाला रहदारीमध्ये कापते; जेव्हा आम्हाला अन्यायकारक वागणूक दिली जाते; जेव्हा आमचा सहकारी आमच्या विश्वासाची थट्टा करतो. काही लोकांना असे वाटते की त्यांना चिडचिडेपणा आणि परीक्षांच्या वेळी अस्वस्थ होण्याचा अधिकार आहे. अधीरता पवित्र रागासारखी वाटते. पवित्रशास्त्र, तथापि, आत्म्याचे एक फळ म्हणून संयमाची स्तुती करते (गलती 5:22) जे ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांसाठी तयार केले जावे (1 थेस्सल. 5:14). धीर देवाच्या वेळेवर, सर्वशक्तिमानतेवर आणि प्रेमावर आपला विश्वास प्रकट करतो.

जरी बहुतेक लोक धीराला निष्क्रिय प्रतीक्षा किंवा सौम्य सहनशीलता मानतात, परंतु नवीन करारात “धैर्य” असे भाषांतर केलेले बहुतेक ग्रीक शब्द सक्रिय, मजबूत शब्द आहेत. उदाहरणार्थ, इब्री लोकांस पत्र 12:1 चा विचार करा: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे;” (एनकेजेव्ही). हळु जाणाऱ्याची निष्क्रीयपणे वाट पाहून किंवा फसवणूक करणाऱ्यांना हळुवारपणे सहन करून एखादी शर्यत होते काय? नक्कीच नाही! या वचनामध्ये “धीर” या शब्दाचा अर्थ “सहनशक्ती” असा आहे. एक ख्रिस्ती धीराने शर्यतीत धाव घेतो आणि अडचणींमध्ये टिकून राहतो. पवित्रशास्त्रामध्ये, धीर हे ध्येयाकडे जाणे, परीक्षांना तोंड देणे किंवा अपेक्षितपणे वचन पूर्ण होण्याची वाट पाहणे आहे.

संयम एका रात्रीत विकसित होत नाही. संयमाच्या विकासासाठी देवाची शक्ती आणि चांगुलपणा महत्त्वपूर्ण आहे. कलस्सैकरांस पत्र 1:11 आपल्याला सांगते की आपण त्याच्याद्वारे “महान सहनशक्ती आणि संयम” करण्यासाठी बळकट झालो आहोत, तर याकोबाचे पत्र 1:3-4 आपल्याला हे जाणून घेण्यास प्रोत्साहित करते की चाचणी हा आपला संयम पूर्ण करण्याचा मार्ग आहे. देवाच्या परिपूर्ण इच्छा आणि वेळेवर विसावा घेऊन आपला संयम आणखी विकसित आणि बळकट झाला आहे, अगदी वाईट माणसांसमोरही “जे त्यांच्या मार्गात यशस्वी होतात, जेव्हा ते त्यांच्या दुष्ट योजना राबवतात” (स्तोत्र 37:7). आमच्या संयमाला शेवटी बक्षीस मिळते “कारण प्रभूचे आगमन जवळ आहे” (याकोब 5:7-8). “ज्यांची आशा परमेश्वरावर आहे, जे त्याचा शोध घेतात त्यांच्यासाठी परमेश्वर चांगला आहे” (विलाप. 3:25).

ज्यांच्या सहनशीलतेने देवाबरोबर चालण्याची वैशिष्ट्ये दाखवली त्यांची अनेक उदाहरणे आपण पवित्रशास्त्रामध्ये पाहतो. याकोब आपल्याला संदेष्ट्यांकडे दाखवतो “दुःखाच्या वेळी सहनशीलतेचे उदाहरण म्हणून” (याकोब 5:10). तो ईयोबाचा संदर्भ देखील देतो, ज्यांच्या चिकाटीला “परमेश्वराने शेवटी काय आणले” (याकोब 5:11) द्वारे प्रतिफळ दिले गेले. अब्राहमनेही धीराने वाट पाहिली आणि “जे वचन दिले होते ते मिळवले” (इब्री 6:15). येशू सर्व गोष्टींमध्ये आमचा आदर्श आहे, आणि त्याने धीराने सहनशीलता दाखवली: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे” (इब्री. 12:2).

ख्रिस्ताचे वैशिष्ट्य असलेला संयम आपण कसा दाखवू शकतो? प्रथम, आपण देवाचे आभार मानतो. एखाद्या व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया सहसा “मी का?” असते, परंतु पवित्रशास्त्र म्हणते की देवाच्या इच्छेनुसार आनंद करा (फिलिप्पै 4:4; 1 पेत्र 1:6). दुसरे म्हणजे, आम्ही त्याच्या हेतूचा शोध ध्यावा. कधीकधी देव आपल्याला कठीण परिस्थितीत ठेवतो जेणेकरून आपण साक्षीदार होऊ शकू. इतर वेळी, तो चारित्र्याच्या पवित्रतेसाठी चाचणीला परवानगी देऊ शकतो. हे लक्षात ठेवणे की त्याचा हेतू आपल्या वाढीसाठी आहे आणि त्याचे वैभव आपल्याला परीक्षेत मदत करेल. तिसरे, आम्हाला रोमकरांस पत्र 8:28 सारखे त्याचे वचन आठवते, जे आपल्याला सांगते की, “देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” “सर्व गोष्टींमध्ये” अशा गोष्टींचा समावेश होतो ज्या आपल्या संयमाची परीक्षा करतात.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ट्रॅफिक जाममध्ये असाल, एखाद्या मित्राद्वारे विश्वासघात करण्यात आलेले असाल किंवा तुमच्या साक्षीची खिल्ली उडवली असेल, तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद द्याल? नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे अधीरता ज्यामुळे ताण, राग आणि निराशा येते. देवाची स्तुती करा की, ख्रिस्ती म्हणून, आम्ही यापुढे “नैसर्गिक प्रतिसादाच्या” बंधनात नाही कारण आपण स्वतः ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहोत (2 करिंथ 5:17). त्याऐवजी, आपल्याकडे धीराने आणि पित्याच्या सामर्थ्यावर आणि उद्देशावर पूर्ण विश्वास ठेवून प्रभूची शक्ती आहे. “म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच” (रोमकरांस पत्र 2:7).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्रशास्त्र धीराबद्दल काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries