settings icon
share icon
प्रश्नः

तारण प्राप्त करण्यासाठी बायबल हे त्रुटीहीन आहे हा विश्वास मी केला पाहिजे का?

उत्तरः


बायबलच्या प्रेरणेवर किंवा त्रुटीहीनतेवर विश्वास ठेवून आपले तारण झाले नाही. प्रभु येशू ख्रिस्तावर पापापासून तारणारा म्हणून विश्वास ठेवून आपले तारण झाले आहे (योहान 3:16; इफिस 2:8-9; रोम 10:9-10). त्याचवेळी, केवळ बायबलद्वारेच आपण येशू ख्रिस्त आणि आमच्या वतीने त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थानाबद्दल शिकतो (2 करिंथ 5:21; रोम 5:8). तारण प्राप्त करण्यासाठी आपल्याला बायबलमधील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज नाही - परंतु बायबलद्वारे घोषित केलेल्या येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. बायबल हे देवाचे त्रुटीहीन अचूक वचन आहे हा विश्वास आपण निश्चितच केला पाहिजे, आणि बायबल जे काही शिकविते त्या सर्व गोष्टींवर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, परंतु कधीकधी ते तारणानंतर येते, आधी नाही.

जेव्हा लोक प्रथम तारण प्राप्त करतात तेव्हा त्यांना सामान्यपणे बायबलबद्दल फारच कमी माहिती असते. तारण ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपली पापी अवस्था समजून घेण्याद्वारे प्रारंभ होते, बायबलच्या त्रुटीहीनतेबद्दल समजून घेण्याद्वारे नाही. आपले विवेक आपल्याला सांगतात की आपण आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर पवित्र परमेश्वरासमोर उभे राहू शकत नाही. आम्हाला माहित आहे की आपण ते करण्यास पुरेसे नीतिमान नाही, म्हणून आम्ही त्याच्याकडे वळतो आणि आपल्या पापाची फेड करण्यासाठी वधस्तंभावर त्याच्या पुत्राने केलेल्या बलिदानाचा स्वीकार करतो. आम्ही त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास ठेवतो. त्या क्षणापासून, आमच्याजवळ पूर्णपणे नवीन स्वभाव आहे, जो शुद्ध आणि पापाद्वारे अशुद्ध केलेला नाही. देवाचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात राहतो आणि तो आपल्यावर सार्वकालिक जीवनासाठी शिक्का लावतो. आम्ही क्षणापासून पुढे जात आहोत आणि प्रत्येक दिवस देवावर अधिकाधिक करीत आहोत प्रेम आणि त्याची आज्ञा पाळत आहोत. या “पुढे जाण्याचा” एक भाग आहे त्याच्यासोबत वाढण्यासाठी आणि त्याच्यासोबतच्या आमच्या रोजच्या जीवनात दररोज बळ प्राप्त करण्यासाठी दररोज त्याच्या वचनाचा आहार घेणे. आपल्या जीवनात हा चमत्कार करण्याचे सामथ्र्य केवळ बायबलमध्ये आहे.

बायबलमध्ये शिकविल्याप्रमाणे, जर आपण प्रभु येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या कार्यावर विश्वास ठेवला तर आपले तारण होते. जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात आणि मनावर कार्य करतो - आणि आपल्याला खात्री पटवून देते की बायबल सत्य आहे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे (2 तीमथ्य 3:16-17). जर आपल्या मनात पवित्र शास्त्राच्या त्रुटीहीनतेबद्दल शंका असतील तर, त्या हाताळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे देवाला त्याच्या वचनाबद्दल आश्वासन आणि त्याच्या वचनावरील विश्वास देण्यासाठी विनंती करणे. जे प्रामाणिकपणे आणि संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात त्यांना उत्तर देण्यासाठी तो सदैव तत्पर आहे (मत्तय 7:7-8)

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

तारण प्राप्त करण्यासाठी बायबल हे त्रुटीहीन आहे हा विश्वास मी केला पाहिजे का?
© Copyright Got Questions Ministries