settings icon
share icon
प्रश्नः

बायबल भ्रष्ट, बदललेले, संपादित, सुधारित करण्यात आले आहे काय किंवा त्यात छेडछाड केली गेली आहे का?

उत्तरः


जुन्या कराराची पुस्तके अंदाजे ख्रि. पू. 1400 पासून ख्रि. पू. 400 पर्यंत लिहिली गेली. नवीन कराराची पुस्तके सुमारे सन 40 पासून सन 90 पर्यंत लिहिली गेली. त्यामुळे बायबलचे पुस्तक लिहिल्या गेलेल्या 3,,4०० ते 1900 वर्षांदरम्यानचा काळ गेला आहे. यावेळी, मूळ हस्तलिखिते हरवली आहेत. ते बहुधा यापुढे अस्तित्वात नाहीत. बायबलची पुस्तके मूळतः लिहिली गेल्यापासून लेखकांनी त्यांची पुन्हा पुन्हा नकल केली आहे. प्रतींच्या प्रती बनविल्या आहेत. हे लक्षात घेता आपण आजही बायबलवर विश्वास ठेवू शकतो का?

पवित्र शास्त्र देवाच्या श्वासाने निर्मित आहे आणि म्हणून अचूक आहे (2 तीमथ्य 3:16-17; योहान 17:17). अर्थात, अचूकता केवळ मूळ हस्तलिखितांस लागू आहे, हस्तलिखितांच्या प्रतिंस नव्हे. शास्त्रवचनांच्या प्रतिकृतीबाबत लेखक कितीही सावध असले, तरीही कोणीही परिपूर्ण नाही. शतकानुशतके, शास्त्रवचनांच्या विविध प्रतींमध्ये किरकोळ फरक निर्माण झाला. यातील बहुतेक फरक म्हणजे शब्दलेखनाची रूपे (अमेरिकन शेजारी म्हणजे नेबर विरुद्ध ब्रिटिश शेजारी म्हणजे नेबरसारखे), उलटे शब्द (एक हस्तलिखित “ख्रिस्त येशू” म्हणते तर दुसरे “येशू ख्रिस्त” म्हणते) किंवा सहज चुकलेला शब्द. थोडक्यात, बायबलसंबंधी 99 टक्केपेक्षा अधिक मजकूरावर प्रश्न नाही. 1 टक्केपेक्षा कमी मजकूरांविषयी प्रश्न आहे, कोणतीही सैद्धान्तिक शिकवण किंवा आज्ञेस धोका नाही. दुसर्या शब्दांत, आज आपल्याजवळ असलेल्या बायबलच्या प्रती अचूक अर्थात प्रमादरहित आहेत. बायबल भ्रष्ट, बदललेले, संपादित, सुधारित नाही किंवा त्यात छेडछाड केलेली नाही.

कोणताही पूर्वाग्रह नसलेला दस्तावेज विद्वान हे मान्य करील की शतकांपासून बायबल उल्लेखनीयरित्या जतन केले गेले आहे. इ.स. चौदाव्या शतकातील बायबलच्या प्रती विषयवस्तूच्या बाबतीत तिसर्या शतकाच्या प्रतींच्या तुलनेत जवळजवळ समान आहेत जेव्हा मृत समुद्राच्या स्क्रोलचा शोध लागला, तेव्हा मृत समुद्री स्क्रोल पूर्वी सापडलेल्या कोणत्याही प्रतींपेक्षा शेकडो वर्ष जुने असूनही, ते जुन्या कराराच्या इतर प्राचीन प्रतींच्या किती समान आहेत हे पाहून विद्वानांना आश्चर्य वाटले. बायबलचे अनेक कठोर संशयी आणि समीक्षक हे कबूल करतात की अनेक शतकांपासून बायबलचे प्रसारण कोणत्याही प्राचीन दस्तावेजापेक्षा अधिक अचूकपणे झाले आहे.

बायबलमध्ये कोणत्याही पद्धतशीर पद्धतीने सुधारना, संपादन किंवा छेडछाड केल्याचा पुरावा नाही. बायबलसंबंधी हस्तलिखितांचा परिपूर्ण खंड देवाच्या शब्दाला विकृत करण्याचा कोणताही प्रयत्न ओळखणे सोपे करते. हस्तलिखितांमधील विसंगत मतभेदांमुळे बायबलच्या कोणत्याही मुख्य सिद्धांताविषयी संशय निर्माण करण्यात आलेला नाही.

पुन्हा, प्रश्न, आपण बायबलवर विश्वास ठेवू शकतो? अगदी! मानवांच्या अजाणतेपणाचे अपयश आणि मनुष्यांचे हेतुपुरस्सर हल्ले असूनही देवाने आपला शब्द जपला आहे. आपण पूर्ण विश्वास करू शकतो की आज आपल्याजवळ असलेले बायबल हेच मूलतः लिहिलेले बायबल आहे. बायबल हे देवाचे वचन आहे आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकतो (2 तीमथ्य 3:16; मत्तय 5:18).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल भ्रष्ट, बदललेले, संपादित, सुधारित करण्यात आले आहे काय किंवा त्यात छेडछाड केली गेली आहे का?
© Copyright Got Questions Ministries