settings icon
share icon
प्रश्नः

खरंच पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे का?

उत्तरः


या प्रश्नाचे उत्तर आमच्यासाठी निश्चित करणार नाही की आपल्या जीवनात पवित्र शास्त्राची महत्वपूर्णत: कोणत्या दृष्टीकोणातून आहे. परंतू त्यांच्या संगती आमचे सार्वकालिक जीवनाच्या प्रभावाला ते निश्चित करणार आहे. जर पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे,तर त्याला आपल्या अंत:करणात ठेवा,आभ्यास करा, आज्ञापालन करा, आणि त्यावर विश्वास ठेवा, हेच देवाचे वचन आहे. तर त्याचा स्विकार करा, जर तुम्ही पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे म्हणून, स्विकारीत नाही. तर तुम्ही देवाचा नाकार करीता.

सत्य हे आहे देवाने आम्हाला पवित्र शास्त्र दिले आहे. यावरुन त्यांनी आपणावर प्रिती केल्याचे उदाहरण आहे.देव मनुष्या “संगती” सरळ भाषेत बोलतो की तो कसा आहे व आम्ही त्याच्या संगती कसे संबंध बनवू शकतो. हया देवाविषयीच्या सर्व बाबी आम्हाला माहित नसत्या जर पवित्र शास्त्र आम्हाला प्रगत झाले नसते तर पवित्र शास्त्रात देवाने स्वत: प्रगट करुन त्याच्या प्रगतीप्रमाणे, जवळ जवळ1500 वर्षामध्ये आम्हाला दिले, त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्याला जाणून घेणे गरजेचे आहे त्यामुळे तो त्याच्या संगती योग्य नाते ठेवील जर पवित्र शास्त्र खरंच देवाचे वचन आहे, तर ते विश्वासनाऱ्यांसाठी, रितीरिवाजासाठी, व त्यांच्या आदर्शासाठी ,शेवटपर्यंतचा निर्णय अधिकारी आहे.

आपण स्वत:ला हा प्रश्न विचारुया की आम्ही कसे देवाला ओळखू शकतो त्याविषयी पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे.? आणि ते फक्त चांगलेच पुस्तक नाही असे आम्हाला वाटू नये कारण पवित्र शास्त्राविषयी विशेष महत्व आहे. ते सर्व धार्मिक पुस्तकापेक्षा वेगळे आहे का? खरंच पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे का याचा काही पुरावा आहे का? या प्रश्नांना आम्ही गांभीर्याने तपासले पाहिजे.जर पवित्र शास्त्र देवाचे वचन सत्य आहे. ते ईश्वर प्रेरीत आहे. आणि विश्वास संस्कार याच्या बाबतीत पूर्ण निर्धारीत आहे. यामध्ये कोणताही संसशास्पद गोष्टी नाहीत. हे पवित्र शास्त्र देवाचे सत्य वचन आहे. हे आम्हाला पौलाने तिमथ्याला दिलेल्या आज्ञामध्ये दिसून येते. “तुला पवित्र शास्त्राची माहिती लहानपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे. प्रत्येक इश्वर प्रेरीत शास्त्र लेख सदोष, दोष दाखविणे, सुधारणुक नितीशिक्षण याकरीता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.”(2 तिमथी 3:15-17)

पवित्र शास्त्र खरंच देवाचे वचन आहे हे आतील ठिकाणी व बाहेरील ठिकाणी त्याची प्रगटीकरण होते. पवित्र शास्त्रामध्ये ते देवाच्या दैविपणाच्या गुणाविषयी साक्ष देते पवित्र शास्त्र हे त्याच्या एकत्र पणावरुन दिसून येते. पवित्र शास्त्रामध्ये सहासष्ट अलग अलग पुस्तके, तीन वेगवेगळया खंडांमध्ये,तीन वेगवेगळया भाषेत लिहिण्यात आलेले आहेत,ती लिहिण्यासाठी 1500 वर्षाचा काळ, चाळीस लेखकांच्याद्वारे लिहिण्यात आले, ते वेगवेगळे व्यवसाय करणारे होते,परंतू पवित्र शास्त्रामध्ये कुठलाही विरोधाभास दिसून येत नाही परंतू दुसऱ्या एखादया पुस्तका भिन्नतेपेक्षा अधिक शब्दांची वेगळेपणा दिसून येते. हे देवाचे शब्द आहेत. त्याला किंमत आहे. त्यासाठी देवाच्या मनुष्यांना ते त्याच्या लेखनाच्याद्वारे प्रगट करण्यात आले.

दुसरी आतील बाजु पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे, हे पाण्यासाठी त्याच्या भविष्या वाणीला आपण पाहू शकतो पवित्र शास्त्रामध्ये शेकडो भविष्यवाणीचे वर्णन केले आहे जसे की, पुष्कळ देशाच्या भविष्यवाणीचे ज्यामध्ये इस्त्रायल भविष्यातील निश्चित शहर मनुष्याचे भविष्याच्या जीवनाविषयी त्यामध्ये उल्लेख आहेत. त्याचप्रमाणे एका वयक्तीविषयी जो येणार होतो मसिहा तारणारा फक्त इस्त्राईलापुरताच मर्यादीत नव्हे तर जो कोणी त्याचवर विश्वास ठेवील त्या सर्वांसाठी तो येणार होता. अन्य धार्मिक पुस्ताकंविषयीची भविष्यवाणी किंवा अशा लोकांद्वारे करण्यात आली की, जसे नोस्त्रेदेमस ने केलेली जी की भविष्यवाणी विपरीत आहे. परंतू पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी सविस्तर व कधी न खोटी ठरणारी आहे. पवित्र शास्त्रात जुण्या करांमध्ये येशू ख्रिस्ताविषयी तीनशे वर्षे अगोदर भविष्यवाणी लिहिण्यात आली होती. फक्त त्याच्या जन्माविषयी सांगितले नव्हते तर त्याचा जन्म कोणत्या कुटूंबात होईल. तो कसे मरणार आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार हे सांगितले होते. पवित्र शास्त्रात पूर्ण झालेली भविष्यवाणी ईश्वरीय दृष्टांतानुसार संमजने या व्यतिरिक्त कुठलाही तर्क नाही कुठल्याही धार्मिक ग्रंथात अशा प्रकारची भविषवाणी सविस्तर रित्या आढळत नाही.परंतू पवित्र शास्त्रात सर्व भविष्यवाणी सविस्तर रित्या आढळते.

तिसरा पुरावा अंतर्गत आहे अधिकार आणि अद्भुत सामर्थ्य हा पुरावा पहिल्या दोन पुराव्यापेक्षा अधिक व्यक्तीगत आहे. परंतू पवित्र शास्त्र देवाच्या सामर्थ्याला दर्शविते. ते धार्मिक लेखापेक्षा अधिकार आणि शक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. की ज्याच्याद्वारे असंख्य लोकांचे जीवन अलौकीक सामर्थ्याने परिवर्तीत झाले,जे नशा करणारे होते, ते बरे झाले जे समलैंगिक होते ,त्याच्या द्वारे मोकळे झाले त्यांचा त्याग केला गेला होता, आणि मरणाच्या आधीन होते ते देवाच्या वचनाद्वारे बदलले गेले, आणि शेकडो गुन्हेगार आपल्या गुन्हेगारीपासून मागे फिरले, पवित्र शास्त्र पाप्यांना धमकावतो, पापाच्या घृणा करते, व पाप्यास प्रेमाद्वारे बदलते, पवित्र शास्त्र निश्चितच एक चैतन्य असलेली शक्ती बदलून टाकणारी शक्ती आहे. कारण ते देवाचे सत्य वचन आहे.

आजून बाहेरील बाबींच्या बाबतीत पवित्र शास्त्र प्रमाण देते की, ते देवाचे वचन आहे. त्यामध्ये पवित्र शास्त्राच्या इतिहासीकता आहे, कारण पवित्र शास्त्रात ऐतिहासीक घटनेचे वर्णन आहे सत्यपूर्ण आणि अगदी बरोबर सर्व विषयाच्या पडताळणीप्रमाणे ऐतिहासीक दस्ताऐवजाच्या पडताळणीप्रमाणे त्याचप्रमाणे पुरातन शास्त्रीय यांचे प्रमाण, लेखन ऐतिहासिक वृत्तांत यांनी वेळोवेळी ते बरोबर असल्याचे प्रमाण दिले. त्यामध्ये पुरातनतज्ञ शास्त्री आणि हस्तलेखीत प्रती यांचा पुरावा पवित्र शास्त्राला सर्वश्रेष्ठ पुस्तक संपूर्ण जगात बनविले आहे. सत्यता ही आहे की, पवित्र शास्त्र सत्य घटनांप्रती सत्य व बरोबर असे विवरण् करते. यासाठी मोठे संकेत हे आहे की, धार्मिक विषयावर तसेच सिंध्दांतावर त्याचा विचार केला जातो. त्याच्या दाव्यांना प्रमाणीत केले जाते. कारण ते पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे.

पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे याविषयी बाहय उदाहरण म्हणजे मणूष्याच्या लेखकांची श्रध्दा जसे की पहिलेच सांगितले आहे की देवाच्या लेखनाला आमच्यापर्यंत येण्यासाठी वेगवेगळया लोकांनी व्यवसायीकांनी त्याचा उपयोग करण्यात आला. त्या मनुष्यांचा जीवनाचा अभ्यास करतांना असे दिसून येते की ते विश्वास योग्य व निष्ठावाण मनुष्य होते, हे सत्य आहे की, जे काही ते विश्वास करीत होते त्याच्यासाठी अतित्रासदायक जीवन जगण्यासाठी इतके की, मरण यातना स्विकारण्यास ते तयार होत असत. यावरुन हे समजते की ते सत्य आहे. हे साधारण विश्वास योग्य व्यक्तींना मनुष्य वास्तव्यात देव त्यांच्या संगती बोलला ज्यांनी नवीन करार लिहिला व शेकडो विश्वास ठेवणारे (1करिंथ 15:6) आपल्या जीवनातील ते सत्याला जाणून आहेत. कारण त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिले आणि मरणातून जीवंत उठल्यानंतर त्याच्यासंगती वेळ घातला त्याजवर त्याच्या पुनरुथनाचा मोठा प्रभाव पडला ते भिऊन लपण्याऐवजी ते संदेशासाठी मरणास तयार झाले अशासाठी की देव त्यांना प्रगट झाला त्यांचे जीवन व मृत्यू हया सत्याला प्रमाणित करते पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे.

पवित्र शास्त्राचे शेवटेच बाहय प्रमाण हे आहे की ते कधी नष्ट झाले नाही ते देवाचे वचन होण्यामुळे त्याचे महत्व पूर्णत: असे सांगण्यात आले की ते कोणत्याही दुसऱ्या पुस्तकापेक्षा अधिक वाईट आक्रमक व नष्ट होणाऱ्या क्रियेला त्याने सहन केले आहे. सुरूवातीच्या काळात रोमी सम्राटाप्रमाणे, डायोसीलीशियन पासून साम्यवादी तानाशाहीपर्यंत आणि आजच्या आधुनिक युगात नास्तिक आणि अज्ञेयवादी पर्यंत पवित्र शास्त्राने सर्व आक्रमकता सहन केली. व त्यांच्या आक्रमकतेपुढे पवित्र शास्त्र टिकाव धरु शकला. त्यामुळे आजही संपूर्ण जगात प्रकाशित होणारे सर्वात मोठे पुस्तक आहे.

पूर्ण इतिहासात पवित्र शास्त्राला संदेहवादयांनी त्याला काल्पनिक रुपाने स्विकार केला, परंतू त्याला पुरानत्व ऐतिहासिक होण्याचा पुरावा दिला त्याच्या विरोधकांनी त्याच्या शिक्षणाला पुरातन प्रचलित म्हणून आक्रमण केले,परंतू त्याची नैतिकता त्याप्रमाणे वैधानिकता व धोरण आणि शिक्षणाचे सर्व जगात व समाजात त्याचप्रमाणे संस्कृतीमध्ये सकारातत्मक प्रभाव पाडला त्यावर आज काही लबाड शास्त्रज्ञ ,मन यज्ञाने, व राजनैतिक आंदोलनाने आक्रमकता, नेहमीच चालू ठेवली परंतू आजूनही ती प्रामाणिक आणि प्रासंगीक बनली आहे जसे की, जे लिहिले होते हे पुस्तक आहे मागील दोन हजार वर्षापासून असंख्य लोकांच्या जीवनाला संस्कृतीला परिवर्तन घडून आणणारे त्यामध्ये कुठलाही फरक पडला नाही. त्यासाठी पुष्कळ विरोधकांनी आक्रमन केले त्याला नष्ठ करुन त्याचा सन्मान कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतू या संकटामधून पवित्र शास्त्र पुर्वीप्रमाणेच बनलेले आहे कारण त्याचा मानवी जीवनात सत्यतेत प्रभाव पडला. त्याला भ्रष्ट करणाऱ्याच्या प्रयत्नांना पुष्क्ळ आक्रमकतेमधुन त्याची पवित्रता आजुनही सुरक्षित आहे कारण ते देवाचे वचन आहे. याविषयी आम्ही आश्चर्य मानू नये की, त्याच्या विरुध्द ते आक्रमक का झाले नाही ते सदैव अपरिवर्तीत सहीसलामत बनले आहे कारण सरते शेवटी येशु म्हणतो.“आकश व पृथ्वी ही नाही तशी होती परंतू माझी वचने नाही तशी होणार नाहीत.”(मार्क 13:31) हया प्रमाणाला पहिल्यानंतर कोणीही म्हणून शकतो की, पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

खरंच पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे का?
© Copyright Got Questions Ministries