settings icon
share icon
प्रश्नः

कायदेशीरते विषयी पवित्र शास्त्राचे काय म्हणने आहे?

उत्तरः


“कायदावाद” हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळत नाही. ख्रिस्ती लोकांकडून तारण आणि आत्मिक वाढ हि दोन्ही प्राप्त करण्यासाठी कायदे आणि नियमांच्या प्रणालीवर जोर देणाऱ्या सैद्धांतिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. कायदेवादी हे कायदे आणि नियमांचे कठोर शाब्दिक पालन करण्यावर विश्वास ठेवतात आणि त्याची मागणी हि करतात. सैद्धांतिकदृष्ट्या, हि कृपेच्या विरूद्ध असलेली मूलभूत स्थिती आहे. कायदेविषयक पद धारण करणारे बहुतेक वेळा कायद्याचा खरा हेतू, विशेषत: मोशेच्या जुन्या कराराचे नियम हे आपल्याला ख्रिस्ताकडे आणण्यासाठी आपले “स्कूलमास्टर” किंवा “शिक्षक” असे होतो (गलतीकरांस पत्र 3:24) हे पाहण्यास अपयशी ठरतात.

खरे विश्वास ठेवणारे देखील कायदेशीर असू शकतात. आपल्याला एकमेकांना दया दाखवण्याची सूचना देण्यात आलेली आहे: “जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका” (रोमकरांस पत्र 14:1). दुर्दैवाने, असे लोक आहेत ज्यांना अनावश्यक मतांबद्दल इतका ठामपणे विश्वास आहे की ते इतरांना त्यांच्या संगतीतून बाहेर घालवतील, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनाची अभिव्यक्तीदेखील होऊ देत नाहीत. तीही कायदेशीरता आहे. आज बरेच विश्वास ठेवणारे पवित्र शास्त्राचे त्यांचे स्वतःचे स्पष्टीकरण आणि त्यांच्या स्वतःच्या परंपरेचे पालन करण्याच्या मागणीची चूक करतात. उदाहरणार्थ, असे लोक आहेत ज्यांना वाटते कि आत्मिक होण्यासाठी तंबाखू, मध्यपान, नृत्य, चित्रपत इत्यादी टाळणे आवश्यक आहे. सत्य हे आहे कि या गोष्टी टाळणे हि आत्मिकतेची हमी नाही.

प्रेरित पौलाने आपल्याला कायदेशीरतेबद्दल कलस्सैकरांस पत्र 2:20-23 मध्ये चेतावणी दिली आहे: “तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगात असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? म्हणजे “हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको,” अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या धिन का होता? ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंड ज्ञान म्हणतात खरे; तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.” कायद्यात राहणे नीतिमान आणि अध्यात्मिक असल्याचे दिसून येऊ शकते परंतु कायदेशीरता शेवटी देवाची उद्दीष्टे पूर्ण करण्यात अपयशी ठरते कारण ती आतील बदलापेक्षा बाहेरील कामगिरी असते.

कायदेशीरतेच्या जाळ्यात अडकण्यापासून दूर राहण्यासाठी आपण प्रेषित योहानाच्या शब्दांवर विश्वास ठेवून सुरुवात करू शकतो- कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले” (योहान 1:17), आणि आपल्या ख्रिस्ती बंधू आणि भगिनींशी दयाळूपणे वागण्याचे स्मरणार्थ ठेऊ शकतो. “दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे” (रोमकरांस पत्र 14:4). तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा टू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत” (रोमकरांस पत्र 14:10).

येथे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपण एकमेकांशी दयाळूपाने वागत असताना आणि वादग्रस्त प्रकरणांबद्दल मतभेद सहन करण्याची गरज असताना देखील आपण पाखंडी मत स्वीकारू शकत नाही. संतांना देण्यात आलेल्या सर्वादाच्या विश्वासासाठी आपण समाधानी राहण्याचे प्रोत्साहन आपणास देण्यात आले आहे (यहूदाचे पत्र 3). आपण जर हि तत्वे आठवणीत ठेवली आणि ती प्रीती आणि दयाने लागू केली तर आम्ही कायदेशीरपणा आणि पाखंडीपणा या दोन्हीपासून सुरक्षित राहू. प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत (1 योहान4:1).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

कायदेशीरते विषयी पवित्र शास्त्राचे काय म्हणने आहे?
© Copyright Got Questions Ministries