settings icon
share icon
प्रश्नः

देवाने अब्राहमला इसहाकाचा बळी देण्याची आज्ञा का दिली?

उत्तरः


अब्राहमाने त्याच्या देवाबरोबरच्या चालन्यामध्ये अनेक वेळा त्याचे पालन केले होते, परंतु उत्पत्ती 22 मधील परीक्षेपेक्षा अधिक गंभीर परीक्षा असू शकत नाही. देवाने आज्ञा केली, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर” (उत्पत्ति 22:2अ). ही एक आश्चर्यकारक विनंती होती कारण इसहाक वचनपुत्र होता. अब्राहमने कसा प्रतिसाद दिला? त्याने तत्काळ प्रतिसाद दिला. आज्ञाधारकतेसह; दुसऱ्या दिवशी पहाटे, अब्राहमने दोन सेवक, एक गाढव आणि त्याचा प्रिय मुलगा इसहाक यांच्यासह अर्पणासाठी जळाऊ लाकूड घेऊन प्रवास सुरू केला. देवाच्या गोंधळात टाकणाऱ्या आज्ञेच्या त्याच्या निर्विवाद आज्ञापालनामुळे देवाला तो गौरव मिळाला ज्याला तो पात्र आहे आणि देवाचे गौरव कसे करावे याचे हे उदाहरण आहे. जेव्हा आपण अब्राहमप्रमाणेच आज्ञा पाळतो, देवाची योजना ही सर्वोत्तम परिस्थिती आहे यावर विश्वास ठेवतो तेंव्हा आम्ही त्याचे गुणधर्म वाढवतो आणि त्याची स्तुती करतो. अब्राहमाच्या आज्ञा पाळण्याने देवाच्या सार्वभौम प्रेमाची, त्याच्या विश्वासार्हतेची आणि त्याच्या चांगुलपणाची प्रशंसा केली आणि त्याने आमच्यासाठी एक उदाहरण दिले. त्याने ओळखलेल्या देवावर त्याच्या विश्वासाने आणि प्रेमाने अब्राहमला इब्री लोकांस पत्र 11 मधील विश्वासू नायकांमध्ये ठेवले.

देव अब्राहामाच्या विश्वासाचा उपयोग त्याच्या नंतर आलेल्या सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून करतो जो तारणाचे एकमेव साधन आहे. उत्पत्ति 15:6 म्हणते, “अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला”. हे सत्य ख्रिस्ती विश्वासाचा आधार आहे, जसे रोमकरांस पत्र 4:3 आणि याकोब 2:23 मध्ये पुन्हा सांगितले आहे. अब्राहमाला जे नीतिमत्व श्रेय दिले गेले तेच नीतिमत्व आम्हाला हि श्रेय दिले जाते जेव्हा आपण विश्वासाने देवाने आपल्या पापांसाठी दिलेले बलिदान - येशू ख्रिस्त प्राप्त करतो. “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे” (2 करिंथ 5:21).

अब्राहामाची जुन्या करारातील कथा नवीन करारातील प्रायश्चित्त च्या शिकवणीचा आधार आहे, जी म्हणजे मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर प्रभु येशूचा यज्ञ अर्पण. येशू म्हणाला, अनेक शतकांनंतर, “तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला; तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला” (योहान 8:56). पवित्र शास्त्रातील खालील दोन अहवाल समांतर आहेत:

· (व 2.) “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन” देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ...” (योहान 3:16).

· “मोरियाच्या प्रदेशात जा. त्याला तिथे बलिदान दे ... ”(व. 2); असे मानले जाते की हा तो प्रदेश आहे येथे अनेक वर्षांनंतर जेथे येरुशलेम शहर बांधले गेले होते, जिथे येशूला त्या शहराच्या भिंतीबाहेर वधस्तंभावर खिळले गेले होते (इब्री 13:12).

· “त्याला होमार्पण म्हणून तेथे अर्पण कर” (व. 2); “पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला” (1 करिंथ 15:3).

· “अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली” (व. 6); येशू, “स्वतःचा वधस्तंभ घेऊन. . . ” (योहान 19:17).

· “पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” (व. 7); योहानाने म्हटले, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा”! (योहान 1:29).

· इसहाक, मुलगा, यज्ञ होण्यासाठी वडिलांच्या आज्ञाधारकतेने वागला (व. 9); येशूने प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय 26:39).

· पुनरुत्थान - इसहाक (लाक्षणिक अर्थाने) आणि येशू प्रत्यक्षात: “‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता; त्याला असे सांगितले होते की, “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” तेव्हा मेलेल्यांतूनदेखील उठवण्यास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.” (इब्री 11: 17-19); येशू, "तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्‍या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले” (1 करिंथ 15:4).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाने अब्राहमला इसहाकाचा बळी देण्याची आज्ञा का दिली?
© Copyright Got Questions Ministries