settings icon
share icon
प्रश्नः

मी आताच येशुवर विश्वास ठेवला आहे- तर आता पुढे काय करु?

उत्तरः


मी आताच येशुवर विश्वास ठेवला आहे- तर आता पुढे काय करु?

अभिनंदन! तुम्ही आपल्या जीवनात परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे! तर आता आपण विचारता की, पुढे काय? तर आता मी,आपला जगीक प्रवास देवाबरोबर कसा सुरु करणार पवित्र शास्त्रावर अधारीत पाच पायऱ्या आहेत. ज्या खालील प्रमाणे आहेत. जेव्हा प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपण www.GotQuestions.org/Marathi ह्या वेब साईटवर भेट द्या .

1) तारणा विषयी खात्री करुन घ्या

I योहान 5:13 सांगते की “ सार्वकालीक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले आहे” देवाची इच्छा आहे की, तारण काय आहे हे समजून घ्यावे. व आपले तारण झाले आहे. या विषयी पूर्ण खात्री असणे गरजेचे आहे. थोडक्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपण पुढे पाहू या

अ) आपण सर्व पापी आहोत आपण सर्वानी देवाला असंतोषविले आहे (रोम 3:23)

ब) आमच्या पापामुळे आम्हाला शिक्षा होणार होती आम्ही सर्वकाळसाठी देवा पासून वेगळे व्हावे (रोम 6:23)

क) येशु ख्रिस्त वधस्तभांवर मरण पावला त्याने आमच्या पापाची शिक्षा स्वतावर घेतली (रोम 5:8,II करिथ 5:21) येशु आमच्या जागी मरण पावला जी शिक्षा आम्हाला होणार होती ती त्याने स्वतावर घेतले त्यांच्या पुन:रुत्थानावरुन् त्याने दाखवून दिले की, त्याने पापाची पूर्ण किंमत मोजली

ड) जोकोणी येशुवर विश्वास ठेवतो त्या सर्व लोकांनसाठी देवाने पापांची क्षमा व तारण ठेवली आहे. ( योहान 3:16,रोम 5:1,रोम 8:1)

हाच शुभ् संदेश तारणाचा आहे! जर आपण येशुवर विश्वास ठेवला तर आपले तारण होईल देव आमच्या पापाची क्षमा करेल व तो आपणास सोडणार व टाकणार नाही. असे त्याने अभिवचन दिले आहे. ( रोम 8:38-39,मततय 28:20) लक्षात ठेवा येशु ख्रिस्ता मध्येच आमचे तारण हे सुरक्षीत आहेत.( योहान 10:28-29) जर आम्ही येशुवर विश्वास ठेवला की, तो आमचा तारणारा आहे. तर आम्ही खात्री पूर्वक देवा संगती स्वर्गात सार्वकालीक जीवनात सदैव राहणार आहोत.

2) चांगल्या मंडळीचा शोध घ्या की ज्या ठिकानी पवित्र शास्त्राचे शिक्षण दिले जाते.

मंडळी म्हणजे फार उत्तम इमारत नाही.तर जे प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वस ठेवून एकत्र जमतात त्याला प्रथम दर्शने मंडळी म्हणतात. आता तुमचा विश्वास प्रभु येशु ख्रिस्तावर आहे. यासाठी थोडक्यात मी आपणास प्रोत्साहन देऊ इच्छीतो की, आपल्या नगरातील ख्रिस्ती येशु असणारे व पवित्र शास्त्रानुसार शिकविणारा देवाच्या सेवकाचा शोध करा. व त्यांना आपल्या विश्वासा विषयी सांगा

दुसरा उद्देश हा आहे की, मंडळी मध्ये पवित्र शास्त्राचे शिक्षण दिले जाते पवित्र शास्त्रातील वचने आमच्या जीवनात कसे लागु करण करु शकतो. पवित्र शास्त्राचा मुख्य उद्देश आम्ही आपले ख्रिस्ती जीवन सामर्थाने जगावे हे शिकवीते ( II तिमथी 3:16-17 ) या मध्ये म्हटले आहे “प्रत्येक ईश्वरप्रेरीत शास्त्रलेख, सदबोध व दोष् दाखविणे ,सुधारणूक ,नितीशिक्षण या करिता उपयोगी आहे.त्यापासून देव भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चागल्या कामास सज्ज होतो.

तिसरा उद्देश मंडळी हे पासनेचे स्थान आहे. उपासना म्हणजे देवाची अभार मानने की,त्याने आमच्या जीवनात केलेल्या कार्या बद्दल! देवाने आम्हाला तारीले देव आमच्या वर प्रेम करितो देव आमचा पुरठादार आहे. देव आमचा मार्गदर्शक आहे. देव आमच्यावर कृपा करितो. या सर्व बाबी बद्दल त्याचे उपकार मानने प्रगटी 4:11 असे म्हणते “ हे प्रभु आमच्या देवा, गौरव ,समान व सामर्थ ही तुझीच आहेत असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस कारण तू सर्वकाही उत्तपन्न केले,तुझ्या इच्छेने झाले व आस्थित्वात आले

3) देवा संगती मनन करण्यासाठी दिवसातील एक वेळ निश्चित करा

देवाच्या संगती प्रती दिवशी वेळ घालविणे फार म्हत्वाचे आहे. काही लोक असे म्हणतात ती “ शांत वेळ” असे म्हणतात काही लोक “मननाचा वेळ” असे म्हणतात कारण या वेळी आम्ही देवा पुढे त्यांच्या वचाना नूसार स्वताचे आत्मपरिक्षण करितो. काही लोक सकाळी मनन करितात काही लोक सयकाळी मनन करितात तुम्ही केव्हाही देवा संगती वेळ घालवू शकतो. वेळे विषयी काही परिणाम होत नाही.

परंतू दररोज देवा बरोबर वेळ घालविला पाहिजे देवा बरोबर कसा वेळ घालवावा

अ)प्रार्थना- प्रार्थना म्हणजे देवा संगीती संभाषण करणे देवाला आमच्या विनंत्या गरजा सांगणे व देवाकडून ह्या गोष्टीन बद्दल मार्गदर्शन देवाला विनंती करणे त्याने आमच्या गरजा पुरवाव्यात व त्यांने आमच्यावर किती प्रेम केले व सर्व चांगल्या गोष्टी माच्या जीवनात घडविल्या त्या बद्दल अभार मानू याला प्रार्थाना म्हणतात.

ब) पवित्र शास्त्र वाचने- मंडळी मध्ये, शब्बाथ शाळे मध्ये किंवा पवित्र शास्त्राच्या अभ्यासच्या वर्गा मध्ये आम्ही वैयक्तीक रित्या पवित्र शास्त्र वाचावे, कारण पवित्र शास्त्रामध्ये आमच्या जीवनाचा उन्न्तीचा मार्ग आहे.त्याच प्रमाणे यश प्राप्तीचा मार्ग आहे. म्हणून देव आम्हाला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून शिकवितो कशा प्रकारे आम्ही निर्णय घ्यावा, देवाची आमच्या जीवनात काय इच्छा आहे, आम्ही दुसऱ्याची सेवा कशी करावी. कशा प्रकारे अधात्मीक वाढ करावी. हे शिकविते पवित्र शास्त्र हे देवाचे शब्द आहे. ते आम्हाला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन देवाचे अज्ञावचन पालन केल्याने देव प्रसन्न व संतूष्ट होतो.

4) जे आम्हाला आधात्मिकतेमध्ये वाढवित आहेत त्यांच्या संगतीत आपले नाते वाढवावेत

I करिथ 15:33 मध्ये सांगितले आहे. “ फसु नका कुसंगतीने निती बिघत” पवित्र शास्त्र चेतावणी देते “वाईट” लोकांन संगती राहु नका कारण आम्ही मागील जीवनात पापात लोभा मध्ये घालविले व अशाच प्रकारचे लोक आमच्या आजू बाजूला आहेत.अशा लोकांन संगती नाते न ठेवता “बाहेर” निघा व ज्या व्यक्तीचे नाते देवा संगती योग्य आहे. अशाच व्यक्ती संगती सोबती धरा

आपल्या मंडळी मध्ये एक किंवा दोन व्यक्तीना शोधन्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला देवा मध्ये वाढविण्यास मदत करतील (इब्री 3:13,10:24) त्या मित्रांना मला मननच्या वेळी प्रामाणिक असण्यासाठी, माझ्या कृती मध्ये देवाबरोबर प्रामाणीक राहण्यासाठी मार्गदर्शन करा जे तुमचे जूने मित्र आहेत. त्यांना सोडून न देता तूम्ही येशुनवर कशा प्रकारे विश्वास ठेवला हे त्यांना सांगण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्या संगती चागले व्यहार करा त्यांच्यासाठी देवा जवळ प्रार्थना करा की,त्यांनी येशुवर विश्वास ठेवावा.

5)बाप्तिस्मा घ्या.

पुष्कळ लोकांचा बाप्तिस्माच्या संदर्भात चुकीचा समज आहे. “ बाप्तिस्मा” ह्या शब्दाचा अर्थ पाण्यात बुडविणे असा आहे.पवित्र शास्त्राच्या सिध्दांतानूसार आपण शरिरामध्ये असताना येशुवरील विश्वास व त्याच्या मागे चालण्याचा उघड रित्या निर्णय घेणे, पाण्यामध्ये बुडणे म्हणजे ख्रिस्त बरोबर पुरणे व पाण्यातून बाहेर निघणे म्हणजे ख्रिस्ता बारोबर उठणे बाप्तिस्मा घेणे हे महत्वाचे आहे. कारण हे देवाच्या आज्ञाचे पालन करण्याची पायरी आहे. जर आपण बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात तर आपल्या पाळकांना भेटा.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी आताच येशुवर विश्वास ठेवला आहे- तर आता पुढे काय करु?
© Copyright Got Questions Ministries