चार आत्मिक नियम कोणते?प्रश्नः चार आत्मिक नियम कोणते?

उत्तरः
चार आत्मिक नियम हा येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यामुळे उपलब्ध झालेल्या मोक्षाची चांगली बातमी समभागी करण्याचा एक मार्ग आहे. ख्रिस्ताच्या शिकवणीमधील महत्त्वाची माहिती चार मुद्द्यांमध्ये रचण्याचा तो एक साधा मार्ग आहे.

चार आत्मिक नियमांमधील पहिला नियम आहे, ‘’भगवंत तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे एक सुंदर योजना आहे.’’ जॉन ३:१६ आम्हांला सांगतो, ‘’भगवंत जगावर एवढे प्रेम करतो की त्याने त्याचा एकमात्र पुत्र जगाला दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यामध्ये विश्वास ठेवील तो नाश पावणार नसून शाश्वत जीवन प्राप्त करील.’’ जॉन १०:१० आम्हांला येशूच्या येण्याचे कारण सांगतो, ‘’मी आलो आहे ते त्यांना जीवन मिळावे आणि ते संपूर्ण मिळावे म्हणून.’’ भगवंताच्या प्रेमापासून आम्हांला कोण अडवतो? विपुल जीवन मिळविण्यापासून आम्हांला कोण अडवतो?

चार आत्मिक नियमांमधील दूसरा नियम आहे, ‘’मानवता पापांमुळे कलंकित झाली आहे आणि त्यामुळे भगवंतापासून दुरावली आहे. ह्याच्या परिणामस्वरूप, भगवंताची आमच्या जीवनांसाठीची सुंदर योजना आम्ही जाणू शकत नाही.’’ रोमन्स ३:२३ ही माहिती ठासून सांगतो, ‘’सर्वांनीच पाप केले असून भगवंताच्या कीर्तीस कमी पडलो आहोत.’’ रोमन्स ६:२३ आम्हांला पापाचे परिणाम सांगतो, ‘‘पापाची मजुरी मृत्यु आहे.’’ भगवंताने आम्हांला निर्माण केले ते त्याची संगत धरण्यासाठी, पण, मानवतेने जगात पाप आणले, आणि त्यामुळे भगवंतापासून दुरावलो. आम्ही भगवंताशी असलेल्या त्या नात्याची नासाडी केली जे त्याने आमच्यासाठी इच्छिले होते. यावर उपाय काय?

चार आत्मिक नियमांमधील तिसरा नियम आहे, ‘’आमच्या पापांसाठी येशू ख्रिस्त हा भगवंताची एकमेव तरतूद आहे. येशू ख्रिस्ताद्वारे, आम्ही आमच्या पापांसाठी क्षमा मिळवू शकतो आणि भगवंताशी आमचे नाते योग्यरित्या पुन्हा प्रस्थापित करू शकतो.’’ रोमन्स ५:८ आम्हांला सांगतो, ‘’पण ह्यामध्ये भगवंत आम्हांवरील आपले स्वतःचे प्रेम दर्शवितोः आम्ही अजूनही जेव्हा पापी होतो, जेव्हा येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण पत्करले.’’ आमचे रक्षण होण्यासाठी आम्ही काय जाणण्याची आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे ते १ कोरिन्थियन्स १५:३-४ आम्हांला सांगते, ‘’...की पवित्र ग्रंथांप्रमाणे येशू ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी मरण पत्करले, की त्याचे दफन करण्यात आले, की पवित्र ग्रंथांप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला वर उचलण्यात आले... ’’ जॉन १४:६ मध्ये येशू स्वतःच जाहीर करतो की मोक्षप्राप्तीचा तो एकमेव मार्ग आहे, ‘‘मी मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच कोणी पित्याजवळ येऊ शकतो.’’ मोक्षप्राप्तीची ही सुंदर देणगी मी कशी प्राप्त करू शकतो?

चार आत्मिक नियमांमधील चौथा नियम आहे, ‘‘मोक्षप्राप्तीची सुंदर देणगी प्राप्त करण्यासाठी आणि भगवंताची आमच्या जीवनांसाठीची सुंदर योजना जाणण्यासाठी आमचा तारणहार म्हणून आम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवला पाहिजे.’’ जॉन १:१२ आमच्यासाठी हे सांगतो, ‘‘अजून त्या सर्वांना, ज्यांनी त्याचा स्वीकार केला, ज्यांनी त्याच्या नावात विश्वास ठेवला, त्याने भगवंताची बालके होण्याचा अधिकार दिला’’ कृती १६:३१ स्पष्टपणे सांगते, ‘‘प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवा आणि तुमचे रक्षण होईल !’’ आमचे रक्षण होऊ शकते केवळ कृपादृष्टीमुळे, केवळ श्रद्धेमुळे, केवळ येशू ख्रिस्तामध्ये (एफिसियन्स २:८-९).

जर तुमचा तारणहार म्हणून तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवायचा असेल, तर भगवंताशी पुढील शब्द बोला. हे शब्द बोलल्याने तुमचे रक्षण होणार नाही, पण येशूमध्ये विश्वास ठेवल्याने होईल. ही प्रार्थना म्हणजे केवळ भगवंतामध्ये तुमचा विश्वास व्यक्त करण्याचा आणि तुम्हाला मोक्ष देण्याबद्दल त्याला धन्यवाद देण्याचा मार्ग आहे. ‘’भगवंता, मला माहित आहे मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. पण मला पात्र असलेली शिक्षा येशू ख्रिस्ताने भोगली, जेणेकरून त्याच्यावरील श्रद्धेतून मला क्षमा मिळावी. मी मोक्षाबद्दल तुझ्यामध्ये माझी श्रद्धा ठेवतो. तुझी विलक्षण कृपादृष्टी आणि क्षमाशीलता - चिरंतन जीवनाची देणगी यासाठी तुला धन्यवाद ! आमेन !’’

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत याचार आत्मिक नियम कोणते?